व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आणखी माहिती​—क

आपल्याला शिकवायला आवडतात अशी सत्यं

आपल्याला शिकवायला आवडतात अशी सत्यं

येशूने म्हटलं होतं की प्रामाणिक मनाचे लोक, सत्य ऐकल्यावर लगेच ओळखतील की हेच सत्य आहे. (योहा. १०:४, २७) त्यामुळे लोकांशी बोलताना आपण नेहमी बायबलमधल्या साध्यासोप्या शिकवणींबद्दल सांगितलं पाहिजे. बायबलमधली एखादी शिकवण सांगण्यासाठी तुम्ही अशी सुरुवात करू शकता: “तुम्हाला माहितीए का . . . ?” किंवा एखादं सत्य सांगून शेवटी असं विचारू शकता, “. . . असं कधी तुम्ही ऐकलंय का?” मग त्या विषयाबद्दलचं एखादं वचन वापरून ते सत्य समजावून सांगा. अशा प्रकारे आपण जर बायबलमधल्या सत्याचं बी समोरच्याच्या मनात पेरलं, तर देव ते वाढवू शकतो!​—१ करिंथ. ३:६, ७.

 आपलं भविष्य

  1. १. आज जे काही घडतंय आणि लोक जसं वागत आहेत त्यावरून कळतं की लवकरच एक मोठा बदल होणार आहे.​—मत्त. २४:३, ७, ८; लूक २१:१०, ११; २ तीम. ३:१-५.

  2. २. पृथ्वीचा कधीच नाश होणार नाही.​—स्तो. १०४:५; उप. १:४.

  3. ३. पृथ्वीवर पुन्हा कधीच प्रदूषण नसेल.​—यश. ३५:१, २; प्रकटी. ११:१८.

  4. ४. आपण कधीच आजारी पडणार नाही.​—यश. ३३:२४; ३५:५, ६.

  5. ५. आपल्याला या पृथ्वीवर कायम राहता येईल.​—स्तो. ३७:२९; मत्त. ५:५.

 कुटुंब

  1. ६. पती “जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम” केलं पाहिजे.​—इफिस. ५:३३; कलस्सै. ३:१९.

  2. ७. पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर केला पाहिजे.​—इफिस. ५:३३; कलस्सै. ३:१८.

  3. ८. पती-पत्नीने एकमेकांना विश्‍वासू राहिलं पाहिजे.​—मला. २:१६; मत्त. १९:४-६, ९; इब्री १३:४.

  4. ९. जी मुलं आईवडिलांचा आदर करतात आणि त्यांचं ऐकतात त्यांचं पुढे भलंच होतं.​—नीति. १:८, ९; इफिस. ६:१-३.

NASA, ESA and the Hubble Heritage Team (STScI/​AURA)-ESA/​Hubble Collaboration. Licensed under CC BY 4.0. Source.

 देव

  1. १०. देवाला एक नाव आहे.​—स्तो. ८३:१८; यिर्म. १०:१०.

  2. ११. देवाने आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिलाय.​—२ तीम. ३:१६, १७; २ पेत्र १:२०, २१.

  3. १२. देव कधीच भेदभाव करत नाही.​—अनु. १०:१७; प्रे. कार्यं १०:३४, ३५.

  4. १३. देवाला आपल्याला मदत करायची इच्छा आहे.​—स्तो. ४६:१; १४५:१८, १९.

 प्रार्थना

  1. १४. आपण देवाला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं.​—स्तो. ६२:८; ६५:२; १ पेत्र ५:७.

  2. १५. प्रार्थना कशी करायची हे बायबलमध्ये सांगितलंय.​—मत्त. ६:७-१३; लूक ११:१-४.

  3. १६. आपण नेहमी देवाला प्रार्थना केली पाहिजे.​—मत्त. ७:७, ८; १ थेस्सलनी. ५:१७.

 येशू

  1. १७. येशू एक महान शिक्षक होता आणि त्याचा सल्ला आजही उपयोगाचा आहे.​—मत्त. ६:१४, १५, ३४; ७:१२.

  2. १८. आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यांबद्दल येशूने आधीच सांगितलं होतं.​—मत्त. २४:३, ७, ८, १४; लूक २१:१०, ११.

  3. १९. येशू देवाचा मुलगा आहे.​—मत्त. १६:१६; योहा. ३:१६; १ योहा. ४:१५.

  4. २०. येशू सर्वशक्‍तिमान देव नाही.​—योहा. १४:२८; १ करिंथ. ११:३.

Based on NASA/​Visible Earth imagery

 देवाचं राज्य

  1. २१. देवाचं राज्य हे स्वर्गातलं एक खरोखरचं सरकार आहे.​—दानी. २:४४; ७:१३, १४; मत्त. ६:९, १०; प्रकटी. ११:१५.

  2. २२. देवाचं राज्य मानवी सरकारांची जागा घेईल.​—स्तो. २:७-९; दानी. २:४४.

  3. २३. माणसांच्या सगळ्या समस्यांवरचा एकमेव उपाय म्हणजे देवाचं राज्य.​—स्तो. ३७:१०, ११; ४६:९; यश. ६५:२१-२३.

 दुःख

  1. २४. देव आपल्याला दुःख देत नाही.​—अनु. ३२:४; याको. १:१३.

  2. २५. या जगावर सैतान राज्य करतोय.​—लूक ४:५, ६; १ योहा. ५:१९.

  3. २६. देवाला तुमचं दुःख कळतं आणि ते दूर करायची त्याची इच्छा आहे.​—स्तो. ३४:१७-१९; यश. ४१:१०, १३.

  4. २७. देव लवकरच सगळं दुःख काढून टाकणार आहे.​—यश. ६५:१७; प्रकटी. २१:३, ४.

 मृत्यू

  1. २८. मेलेल्या लोकांना कसलीच जाणीव नसते; त्यांना कोणत्याच वेदना होत नाहीत.​—उप. ९:५; योहा. ११:११-१४.

  2. २९. मेलेले लोक आपल्याला मदत करू शकत नाहीत किंवा आपलं नुकसानही करू शकत नाहीत.​—स्तो. १४६:४; उप. ९:६, १०.

  3. ३०. आपण ज्यांना गमावलंय त्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल.​—ईयो. १४:१३-१५; योहा. ५:२८, २९; प्रे. कार्यं २४:१५.

  4. ३१. देव मृत्यू कायमचा काढून टाकेल.​—प्रकटी. २१:३, ४; यश. २५:८.

 धर्म

  1. ३२. सगळेच धर्म देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत.​—यिर्म. ७:११; मत्त. ७:१३, १४, २१-२३.

  2. ३३. देवाला ढोंगीपणा आवडत नाही.​—यश. २९:१३; मीखा ३:११; मार्क ७:६-८.

  3. ३४. निःस्वार्थ प्रेम हीच खऱ्‍या धर्माची ओळख आहे.​—मीखा ४:३; योहा. १३:३४, ३५.