व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आणखी माहिती​—ग

कायम जीवनाचा आनंद घ्या!  वापरून बायबल अभ्यास कसा करायचा?

कायम जीवनाचा आनंद घ्या!  वापरून बायबल अभ्यास कसा करायचा?

आपल्या भावांनी भरपूर प्रार्थना आणि संशोधन करून कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे प्रकाशन तयार केलंय. या प्रकाशनाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी पुढे दिलेल्या पद्धतीचा वापर करून बायबल अभ्यास घ्या.

अभ्यासाच्या आधी

  1. १. चांगली तयारी करा. तयारी करताना आपल्या विद्यार्थ्याची गरज, परिस्थिती आणि तो काय मानतो याचा विचार करा. त्याला कोणता मुद्दा खासकरून समजायला किंवा त्याप्रमाणे जीवनात बदल करायला मदत लागेल याचा आधीच विचार करा. “हेसुद्धा पाहा” यातल्या माहितीमुळे तुमच्या विद्यार्थ्याला कशी मदत होऊ शकते याचा विचार करा, आणि गरज पडली तर अभ्यासाच्या वेळी ती माहिती वापरा.

अभ्यास करताना

  1. २. विद्यार्थ्याची हरकत नसेल, तर अभ्यासाच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रार्थना करा.

  2. ३. स्वतःच जास्त बोलू नका. प्रकाशनातल्या माहितीवर जास्त लक्ष द्या आणि विद्यार्थ्याला बोलू द्या.

  3. ४. प्रकाशनातल्या एखाद्या नवीन भागाची सुरुवात करताना, “याकडे खास लक्ष द्या” यातली वाक्यं वाचा, आणि त्या भागातल्या काही धड्यांच्या विषयांचा उल्लेख करा.

  4. ५. एखादा भाग संपवताना त्याच्या “उजळणी” भागावर चर्चा करा. यामुळे शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्याच्या लक्षात राहतील.

  5. ६. आपल्या विद्यार्थ्यासोबत प्रत्येक धड्याचा अभ्यास करताना:

    1. क. माहिती वाचा.

    2. ख. “वाचा” असा उल्लेख केलेली सगळी वचनं वाचा.

    3. ग. गरज असेल तर उल्लेख केलेली इतर शास्त्रवचनंही वाचा.

    4. घ. “व्हिडिओ पाहा” म्हटलेले सगळे व्हिडिओ दाखवा (तुम्हाला शक्य असेल तर).

    5. च. विद्यार्थ्याला धड्यातला प्रत्येक प्रश्‍न विचारा.

    6. छ. “आणखी जाणून घेऊ या” या भागातल्या चित्राकडे विद्यार्थ्याचं लक्ष वेधा आणि त्याबद्दल त्याला काय वाटतं ते विचारा.

    7. ज. विद्यार्थ्याने कितपत प्रगती केली आहे हे त्याला समजावं म्हणून “ध्येय” या चौकटीचा वापर करा. तुम्ही त्याला तिथे उल्लेख केलेलं ध्येय ठेवायचं किंवा दुसरं एखादं ध्येय ठेवायचं, किंवा मग दोन्ही ध्येयं ठेवायचं प्रोत्साहन देऊ शकता.

    8. झ. धड्याची तयारी करताना “हेसुद्धा पाहा” या भागातला कोणता लेख किंवा व्हिडिओ खास आवडला हे विद्यार्थ्याला विचारा.

    9. ट. प्रत्येक वेळी एक धडा पूर्ण करायचा प्रयत्न करा.

अभ्यासानंतर

  1. ७. विद्यार्थ्याचा विचार करत राहा. त्याने प्रगती करत राहावी आणि त्याला आणखी मदत कशी करावी हे तुम्हाला समजावं म्हणून यहोवाला प्रार्थना करा.