व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतर धर्मांविषयी चौकशी करावी का?

इतर धर्मांविषयी चौकशी करावी का?

इतर धर्मांविषयी चौकशी करावी का?

“मी जवळजवळ एक वर्ष ख्रिस्ती सभांना जात होतो आणि इतरांना देवाच्या राज्याविषयी सांगत होतो. मग मी रेडिओवरचे धार्मिक कार्यक्रम ऐकू लागलो आणि टीव्हीवरून धार्मिक प्रवक्‍त्‌यांची प्रवचने ऐकू लागलो. या कार्यक्रमांमुळे इतर धर्माच्या लोकांविषयी मला अधिक चांगलं जाणून घेता येईल असं मला वाटत होतं. त्यांच्या शिकवणी बायबलनुसार नाहीत हे मला ठाऊक होतं. तरीपण त्याविषयी जाणण्याची मला जिज्ञासा होती,” असे दक्षिण अमेरिकेतील एक यहोवाचा साक्षीदार, मिगेल म्हणतो.

त्याच देशात, होर्हे देखील खऱ्‍या उपासनेविषयी लोकांना फार आवेशाने शिकवत होता. तरीपण कालांतराने तोही रेडिओ आणि टीव्हीवरील धार्मिक कार्यक्रम ऐकू लागला. तो म्हणायचा, “इतरांचा काय विश्‍वास आहे हे आपल्याला माहीत असायला हवं.” परंतु, खोट्या शिकवणी आपण ऐकत राहिलो तर त्याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो याची कल्पना आहे का, असे विचारल्यावर तो म्हणायचा: “बायबलमधील सत्य माहीत असलेल्या व्यक्‍तीचा विश्‍वास कशानेही डळमळू शकत नाही.” या उदाहरणांवरून एक महत्त्वाचा प्रश्‍न उभा राहतो: इतरांचे धार्मिक विश्‍वास जाणून घ्यायची आपल्याला गरज आहे का?

खरा ख्रिस्ती धर्म ओळखणे

प्रेषितांचा मृत्यू झाल्यावर, नकली ख्रिस्ती धर्मातून निर्माण होणाऱ्‍या नवनवीन पंथांमुळे खऱ्‍या उपासनेत भेसळ झाली. हे घडणार असल्याचे येशूला आधीच ठाऊक होते आणि म्हणून खरा ख्रिस्ती धर्म कोणता आणि नकली ख्रिस्ती धर्मातील वेगवेगळे प्रकार कोणते हे ओळखण्यासाठी त्याने एक मार्ग दाखवला. सर्वात आधी त्याने असा इशारा दिला: “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.” मग तो म्हणाला: “तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१५-२३) येशूचे खरे शिष्य मात्र त्याच्या शिकवणींचे पालन करतात आणि त्यांच्या चांगल्या फळांवरून त्यांना सहजपणे ओळखताही येऊ शकते. येशूने स्वतः केल्याप्रमाणे ते लोकांना भेटून त्यांना शास्त्रवचनांमधून देवाच्या राज्याविषयी माहिती देतात. येशूचे अनुकरण करून ते जगाचे राजकारण आणि सामाजिक झगडे यांपासून दूर राहतात. बायबल हे देवाचे वचन आहे असे ते स्वीकारतात आणि त्यात सत्य आहे असे मानतात. ते देवाचे नाव जाहीर करतात. शिवाय, प्रीतीसंबंधी देवाने दिलेली शिकवण अनुसरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ते युद्धांमध्ये भाग घेत नाहीत. उलट, ते एकमेकांना बंधूसमान वागवतात.—लूक ४:४३; १०:१-९; योहान १३:३४, ३५; १७:१६, १७, २६.

शास्त्रवचनात सांगितल्यानुसार, “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद” ओळखता येऊ शकतो. (मलाखी ३:१८) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे, आजच्या खऱ्‍या उपासकांच्या आचार-विचारांमध्ये आणि कृतीत एकता आहे. (इफिसकर ४:४-६) खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख पटल्यावर, इतरांच्या विश्‍वासांविषयी जाणून घ्यायची किंवा जिज्ञासू असण्याची काय गरज आहे?

खोट्या शिक्षकांपासून सावधान

बायबलमधील सत्य शिकल्यावरही खोट्या शिकवणींमुळे आध्यात्मिक भेसळ होण्याचा धोका आहे, ही गोष्ट बायबल नाकारत नाही. प्रेषित पौलाने असा इशारा दिला: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) किती उचित वर्णन! तुम्हाला उचलून नेणाऱ्‍या व खाऊन टाकणाऱ्‍या पशूंसारखे हे खोटे शिक्षक फार धोकादायक असू शकतात.

पौलाने इतरांच्या विश्‍वासाचे निरीक्षण केले होते ही गोष्ट खरी आहे. कारण एकदा त्याने आपल्या भाषणाची सुरवात अशी केली: “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तु पाहतांना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली.” (प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३) परंतु याचा अर्थ असा होत नाही, की पौल तत्त्वज्ञानावर आधारलेली ग्रीक प्रवक्‍त्‌यांची प्रवचने नियमितपणे ऐकत होता.

खोट्या धर्मांचा उगम आणि त्यांचे विश्‍वास यांच्याविषयी थोडीबहुत माहिती करून घेणे वेगळे आणि नियमितपणे त्या आत्मसात करत राहणे वेगळे आहे. * यहोवाने त्याच्या वचनातील शिकवणी देण्याकरता ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ नेमला आहे. (मत्तय ४:४; २४:४५) स्वतः पौलाने असे लिहिले: “‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याहि मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवितो काय?’”—१ करिंथकर १०:२०-२२.

काही खोटे शिक्षक एकेकाळी कदाचित खरे ख्रिस्ती असतील. परंतु कालांतराने त्यांनी सत्य सोडून चुकीच्या गोष्टी स्वीकारल्या असतील. (यहूदा ४, ११) याचे नवल वाटायचे कारण नाही. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या गटाला सूचित करणाऱ्‍या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी’ बोलून झाल्यावर येशूने ‘दुष्ट दासाबद्दल’ सांगितले. “धनी यायला विलंब लागेल” अशी तक्रार करून तो आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागतो. (मत्तय २४:४८, ४९) सहसा, या व्यक्‍तींचे आणि त्यांच्या अनुयायांचे काही वेगळे असे स्पष्ट सिद्धान्त नसतात; ते फक्‍त इतरांचा विश्‍वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविषयी प्रेषित योहानाने असे लिहिले: “हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हांकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका.”—२ योहान १०; २ करिंथकर ११:३, ४, १३-१५.

सत्याच्या शोधात असलेले प्रामाणिक लोक वेगवेगळ्या धर्मांचे नीट परीक्षण करतात हे उचितच आहे. कारण कालांतराने, सत्याचा शोध घेणाऱ्‍या प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्‍तींना देव आशीर्वादित करील. ईश्‍वरी बुद्धीविषयी बायबल म्हणते: “जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर . . . देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” (नीतिसूत्रे २:४, ५) देवाचे हे ज्ञान आपल्याला बायबलमधून आणि ख्रिस्ती मंडळीतून मिळते. शिवाय त्या ज्ञानानुसार चालणाऱ्‍यांना यहोवा कसा आशीर्वाद देतो हे देखील आपल्याला ठाऊक आहे. या सर्व गोष्टी पाहून खरे ख्रिस्ती, खोट्या धार्मिक शिकवणी ऐकत राहत नाहीत.—२ तीमथ्य ३:१४.

[तळटीप]

^ परि. 10 वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या देवाचा मानवजातीने केलेला शोध (इंग्रजी) या पुस्तकात जगाच्या अनेक धर्मांची पार्श्‍वभूमी आणि त्यांच्या शिकवणी याविषयी मूलभूत माहिती दिली आहे.