व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आठवणीत ठेवण्याचा दिवस

आठवणीत ठेवण्याचा दिवस

आठवणीत ठेवण्याचा दिवस

मानवी इतिहासाला कलाटणी देणारा दिवस. मानवजातीकरता जणू एक नवीन पहाट. इतिहासातील इतर कोणत्याही दिवसाचा मानवजातीच्या भविष्यावर इतका परिणाम झाला नसेल. या दिवशी येशूने पृथ्वीवर येण्याचा त्याचा उद्देश पूर्णत्वास नेला. वधस्तंभावर खिळलेले असताना त्याने शेवटचा श्‍वास घेऊन म्हटले: “पूर्ण झाले आहे.” (योहान १९:३०) येशू कशासाठी आला होता?

बायबल म्हणते, “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८) मानवजातीला वारशात मिळालेल्या पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळावी म्हणून येशूने आपले जीवन अर्पण केले. होय, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) येशूचे बलिदान ही केवढी मोलवान तरतूद!

येशूच्या मृत्यूचा दिवस आणखी एका कारणासाठी संस्मरणीय आहे. त्या दिवशी देवाच्या पुत्राने आपल्या प्रेषितांना विश्‍वासू राहण्यासाठी मदतदायी ठरणारे महत्त्वाचे धडे दिले होते. त्याचे ते शेवटचे संभाषण त्याच्या शिष्यांकरता किती हृदयस्पर्शी ठरले असेल! त्याच्या शिकवणी काय होत्या? येशूने त्यांना शिकवलेल्या गोष्टींचा आपण लाभ कसा मिळवू शकतो? या प्रश्‍नांची चर्चा पुढील लेखात केली जाईल.