व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे चमत्कार—खरे होते की काल्पनिक?

येशूचे चमत्कार—खरे होते की काल्पनिक?

येशूचे चमत्कारखरे होते की काल्पनिक?

“लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणिले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालविली व सर्व दुखणाइतांना बरे केले.” (मत्तय ८:१६) “त्याने [येशूने] उठून वाऱ्‍याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले.” (मार्क ४:३९) या विधानांविषयी तुम्हाला काय वाटते? ते प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे असे तुम्हाला वाटते की, केवळ रूपककथा अथवा काल्पनिक कथा आहेत असे वाटते?

येशूचे चमत्कार खरे होते याविषयी आज अनेकजण गंभीर शंका व्यक्‍त करतात. टेलेस्कोप आणि मायस्क्रोस्कोप, अंतराळ शोध आणि जननिक अभियांत्रिकीच्या या युगात, चमत्कार आणि अलौकिक घटनांवर लोकांचा विश्‍वास नाही.

काहींना वाटते की, चमत्कारांचे अहवाल काल्पनिक किंवा रूपककथा आहेत. “खऱ्‍या” येशूचा शोध लावण्याचा दावा करत असलेल्या एका पुस्तकाच्या लेखकानुसार, ख्रिस्ताचे चमत्कार म्हणजे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे निव्वळ “व्यापारी साधन” आहे.

इतरांच्या मते, येशूचे चमत्कार वगैरे काही नव्हते; ती सर्व धडधडीत लबाडी होती. काही वेळा येशूलाच सरळ ठकबाज ठरवले जाते. सा.यु. दुसऱ्‍या शतकातील जस्टिन मार्टर यांच्यानुसार, येशूची टीका करणाऱ्‍या लोकांनी “त्याला जादूगार आणि लोकांना ठकवणारा असे म्हणण्यासही कमीजास्त केले नाही.” काहीजण म्हणतात की, येशू “यहुदी संदेष्टा नव्हता तर जादूगार होता, त्याला गैरख्रिस्ती मंदिरातून प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्याने चमत्कार केले.”

अशक्यतेची व्याख्या

तुम्हाला वाटेल की, लोक चमत्कारांवर विश्‍वास करत नाहीत याचे एक मूलभूत कारण या सर्व शंकांमधून निष्पन्‍न होते. अलौकिक शक्‍तींमुळे हे चमत्कार घडतात हा विचार पचवणे त्यांना कठीण वाटते, इतकेच नव्हे तर अशक्य वाटते. “चमत्कार घडतच नाहीत—बस्स,” असे स्वतःला अज्ञेयवादी म्हणणाऱ्‍या एका तरुणाने म्हटले. त्यानंतर त्याने १८ व्या शतकातील स्कॉटिश तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्‍यूम यांचे शब्द उद्धृत केले, ज्यांनी असे लिहिले: “चमत्कार म्हणजे निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन.”

परंतु, एखादी विशिष्ट क्रिया घडूच शकत नाही असे निश्‍चितपणे सांगताना अनेकजण सावधगिरी बाळगतील. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यानुसार चमत्कार म्हणजे “निसर्गाच्या ज्ञात नियमांतून स्पष्ट न करता येणारा प्रसंग.” या व्याख्येनुसार, केवळ एका शतकाआधी, अंतराळ प्रवास, वायरलेस माध्यमातून संपर्क साधणे आणि उपग्रह प्रवास हे बहुतेकांना “चमत्कार” वाटले असते. आपल्या आताच्या ज्ञानाच्या आधारे चमत्कारांचे स्पष्टीकरण देता येत नाही म्हणून ते घडतच नाहीत असे ठामपणे म्हणणे उचित ठरणार नाही.

त्यामुळे आपण येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारांसाठी शास्त्रवचनात असलेल्या काही पुराव्यांचे परीक्षण केल्यास आपल्याला काय सापडेल? येशूचे चमत्कार खरे आहेत की काल्पनिक आहेत?