व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कप्पुदुकिया—जेथे लोक वाऱ्‍यापावसाने कोरलेल्या घरात राहतात

कप्पुदुकिया—जेथे लोक वाऱ्‍यापावसाने कोरलेल्या घरात राहतात

कप्पुदुकिया—जेथे लोक वाऱ्‍यापावसाने कोरलेल्या घरात राहतात

प्रेषित पेत्र कप्पुदुकियाविषयी बोलला. त्याने आपले पहिले ईश्‍वरप्रेरित पत्र, काही अंशी ‘कप्पुदुकिया ह्‍यांत पांगलेल्यांना’ व इतरांना उद्देशून लिहिले. (१ पेत्र १:१) कप्पुदुकिया कोणत्या प्रकारचा प्रदेश होता? या प्रदेशातील लोक दगडांत कोरलेल्या घरात का राहत असत? ते ख्रिस्ती धर्माच्या संपर्कात कसे आले?

“आम्ही चालत चालत अचानक सुळक्यांच्या व दगडी खांब असलेल्या जंगलात आलो,” असे ब्रिटिश प्रवासी डब्ल्यू. एफ. आईन्सवर्थ यांनी म्हटले; १८४० च्या दशकात त्यांनी कप्पुदुकियाला भेट दिली होती. तुर्कस्तानातील या भागाला भेट देणारे आधुनिक दिवसांतील लोकही हे अनोखे दृश्‍य पाहून चकित होतात. कप्पुदुकी खोऱ्‍यात दाटीवाटीने उभ्या असलेल्या मूक सैनिकांप्रमाणे या दगडी “मूर्ती” दिसतात. ३० मीटर किंवा त्याहीपेक्षा अधिक उंच असलेले काही सुळके तर अजस्र धुराड्यांप्रमाणे आकाशाकडे झेप घेत आहेत असे वाटते. आणि काही उंच सुळके आईस्क्रीम कोनसारखे, शंकुस्तंभांप्रमाणे किंवा भूछत्रांप्रमाणे दिसतात.

दिवसाच्या वेगवेगळ्या समयी यांच्यावर पडणाऱ्‍या सूर्यकिरणांमुळे हे सुळके विविध रंग धारण करतात तेव्हा ते अतिशय देखणे दिसतात! पहाटे ते सौम्य गुलाबी रंगाचे दिसतात. दुपारी हस्तदंती रंगाचे आणि सूर्य मावळत असताना सोनेरी रंगाचे दिसतात. हे ‘सुळक्यांचे व दगडी खांब असलेले जंगल’ कसे तयार झाले? आणि या भागात राहणाऱ्‍या लोकांनी यांच्यात आपली घरे का केली?

वारा आणि पाण्याने कोरलेली घरे

कप्पुदुकिया, आशिया व युरोपला जोडणारा दुवा अर्थात ॲनाटोलियन पेनिनसुला याच्या अगदी मध्यभागी आहे. येथे दोन ज्वालामुखी नसते तर हा भाग एक पठार असता. हजारो वर्षांपूर्वी या ज्वालामुखींतून निघालेल्या लाव्हा रसातून वाहत आलेल्या दोन प्रकारच्या खडकांनी अर्थात कठीण बासॉल्ट आणि मऊ टुफा अर्थात निवून घट्ट झालेल्या राखेमुळे तयार झालेल्या पांढऱ्‍या खडकाने हा प्रदेश झाकला गेला.

नद्या, पाऊस, वारा यामुळे मऊ टुफा झिजत गेला आणि तेथे दऱ्‍या तयार झाल्या. कालांतराने, या दऱ्‍यांच्या किनाऱ्‍यावर असलेल्या काही सुळक्यांमध्ये भेगा पडून तेथे अनेक दगडी कोन तयार झाले; निसर्गाने कोरलेल्या या मूर्तींच्या प्रदेशासारखा दुसरा प्रदेश पृथ्वीच्या पाठीवर आणखी कोठेही आढळत नाही. काही दगडी कोन तर मधमाशीच्या पोळ्यासारखे दिसू लागले. स्थानीय रहिवाशांनी हे मऊ खडक कोरून त्यात खोल्या तयार केल्या आणि जसजसे कुटुंब वाढत गेले तसतसे आणखी खोल्या तयार केल्या. त्यांना या खोल्या उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात गरम वाटू लागल्या.

अनेक संस्कृतींचा संगम होणाऱ्‍या ठिकाणी वस्ती

कप्पुदुकियातील गुहेत राहणाऱ्‍या लोकांनी, अनेक संस्कृतींचा संगम होतो त्या ठिकाणी वस्ती केली नसती तर, बाहेरच्या जगाशी त्यांचा फार कमी संपर्क असता. रोमन साम्राज्याला चीनशी जोडणारा ६,५०० किलोमीटरचा व्यापारी मार्ग अर्थात रेशीम मार्ग कप्पुदुकियातून जात असे. व्यापाऱ्‍यांशिवाय, पर्शियन, ग्रीक, रोमी सैन्य देखील या मार्गावरून जात असत. या प्रवाशांनी आपल्याबरोबर नवीन धार्मिक विश्‍वास आणले.

सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकापर्यंत, कप्पुदुकियात यहुदी लोक वस्ती करू लागले होते. आणि या भागातले यहुदी, सा.यु. ३३ साली जेरुसलेममध्ये उपस्थित होते. तेथे ते पेंटेकॉस्टचा सण साजरा करायला आले होते. म्हणून पवित्र आत्मा ओतल्यानंतर प्रेषित पेत्र कप्पुदुकियाच्या यहुद्यांना प्रचार करू शकला. (प्रेषितांची कृत्ये २:१-९) असे दिसते, की काहींनी त्याचा संदेश स्वीकारला आणि माघारी जाताना हा नवीन विश्‍वास सोबत नेला. म्हणूनच पेत्राने आपल्या पहिल्या पत्रात कप्पुदुकियाच्या ख्रिश्‍चनांचा उल्लेख केला.

परंतु, काळाच्या ओघात, कप्पुदुकियातील ख्रिश्‍चनांवर खोट्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडू लागला. चवथ्या शतकातील तीन प्रमुख कप्पुदुकी चर्च नेत्यांनी तर, शास्त्रवचनात नसलेल्या त्रैक्याच्या शिकवणीचे जोरदार समर्थन केले. नेझिएनससचा ग्रेगरी, बेसिल थोर आणि त्याचा भाऊ निसाचा ग्रेगरी हे ते तीन समर्थक होते.

बेसिल थोरने तर साधूंसारखी जीवनशैली जगण्याचे उत्तेजन दिले. त्याने सुचवलेल्या जीवनशैलीसाठी, दगडात कोरलेल्या गुहा अर्थात कप्पुदुकी लोकांची घरे अगदी उत्तम होती. ही शिक्षा स्वीकारणाऱ्‍यांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसे काही मोठमोठ्या गुहांमध्ये अख्खेच्या अख्खे चर्च बांधण्यात आले. तेराव्या शतकापर्यंत, सुमारे तीनशे चर्च दगडात कोरण्यात आले होते. यांपैकी बरेच चर्च आजपर्यंत टिकून आहेत.

आज, हे चर्च आणि मठ निर्जन असले तरी, स्थानीय लोकांची जीवनशैली मात्र इतक्या शतकांपासून जास्त बदलली नाही. पुष्कळ गुहांमध्ये आजही लोक राहतात. कप्पुदुकियाच्या कल्पक रहिवाशांनी निर्सगाने आकार दिलेल्या गुहांना आपली घरे कशी बनवली याचे, कप्पुदुकिया पाहायला येणाऱ्‍या बहुतेक लोकांना आश्‍चर्य व्यक्‍त केल्याशिवाय राहवत नाही.

[२४, २५ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

कप्पुदुकिया

चीन (कॅथे)