व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

लेवीय पुस्तकाच्या २५ व्या अध्यायात उल्लेख केलेल्या योबेलवर्षाची व्यवस्था कशाची पूर्वझलक होती?

मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा देण्यात आली होती, की “सातव्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बाथ असावा.” त्या वर्षाच्या संबंधाने इस्राएलांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “त्यावर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळ्याची छाटणी करू नये. आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत; देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे.” (लेवीय २५:४, ५) अशाप्रकारे, प्रत्येक सातवे वर्ष देशासाठी शब्बाथ वर्ष असणार होते. आणि सातव्या शब्बाथ वर्षानंतरचे प्रत्येक ५० वे वर्ष योबेल असणार होते. त्या वर्षी काय होणार होते?

यहोवाने मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला सांगितले: “त्या पन्‍नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवाशी मुक्‍त झाल्याची घोषणा करावी; ह्‍या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; ह्‍या वर्षी तुम्ही आपआपल्या वतनात व आपआपल्या कुटुंबात परत जावे हे पन्‍नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेहि तोडू नयेत.” (लेवीय २५:१०, ११) योबेल म्हणजे भूमीसाठी लागोपाठ दुसरे शब्बाथ वर्ष. परंतु देशातील रहिवाशांना या वर्षी मुक्‍ती मिळणार होती. दास म्हणून विकल्या गेलेल्या यहुदी व्यक्‍तीला या वर्षी मुक्‍त करावयाचे होते. वाडवडिलांकडून मिळालेला जमीनजुमला एखाद्या व्यक्‍तीला जर विकावा लागला असेल तर तो त्याला पुन्हा परत केला जायचा होता. योबेलवर्ष, प्राचीन इस्राएलांसाठी पुनःस्थापनेचे व मुक्‍तीचे वर्ष होते. ख्रिश्‍चनांसाठी ही कशाची पूर्वझलक होती?

पहिला मनुष्य आदाम याने मानवजातीला पापाच्या दास्यत्वात आणले. पापाच्या जंजाळातून मानवजातीला मुक्‍त करण्यासाठी यहोवाने येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाची व्यवस्था केली. * (मत्तय २०:२८; योहान ३:१६; १ योहान २:१, २) पापाच्या नियमापासून ख्रिश्‍चनांना केव्हा मुक्‍ती मिळते? अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना उद्देशून प्रेषित पौलाने असे म्हटले: “ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्‍यांच्या नियमापासून मुक्‍त केले आहे.” (रोमकर ८:२) स्वर्गीय जीवनाची आशा बाळगणाऱ्‍यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केले जाते तेव्हा ही मुक्‍ती मिळते. त्यांची शरीरे अद्याप पापी व अपरिपूर्ण असूनही देव त्यांना धार्मिक घोषित करतो आणि आपले आध्यात्मिक पुत्र म्हणून त्यांना दत्तक घेतो. (रोमकर ३:२४; ८:१६, १७) अभिषिक्‍तांसाठी गट या नात्याने, ख्रिस्ती योबेलवर्ष पेन्टेकॉस्टच्या सा.यु. ३३ साली सुरू झाले.

पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांबद्दल’ काय? (योहान १०:१६) दुसऱ्‍या मेंढरांसाठी ख्रिस्ताची हजार वर्षीय राजवट पुनःस्थापनेचा व मुक्‍तीचा काळ असेल. या हजार वर्षांच्या योबेलवर्षादरम्यान येशू विश्‍वासू मानवजातीला आपल्या खंडणी बलिदानाचे फायदे लागू करील आणि पापाच्या परिणामांपासून त्यांना मुक्‍त करेल. (प्रकटीकरण २१:३, ४) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या अंताला मानवजात परिपूर्ण होईल आणि वारशाने मिळालेल्या पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्‍त होईल. (रोमकर ८:२१) हे पूर्ण झाल्यावर ख्रिस्ती योबेलवर्ष समाप्त होईल.

[तळटीप]

^ परि. 5 वास्तविक पाहता, येशूला “धरून नेलेल्यांस मुक्‍तता,” घोषित करण्यासाठी पाठवले होते. (यशया ६१:१-७; लूक ४:१६-२१) त्याने एका आध्यात्मिक मुक्‍तीची घोषणा केली.

[२६ पानांवरील चित्र]

हजार वर्षांचे योबेलवर्ष ‘दुसऱ्‍या मेंढरांसाठी’ पुनःस्थापनेचा व मुक्‍तीचा काळ असेल