व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मूल्यवान रक्‍ताने” सुटका होते

“मूल्यवान रक्‍ताने” सुटका होते

“आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे”

“मूल्यवान रक्‍ताने” सुटका होते

यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या परिपूर्ण मानवी जीवनाचे खंडणी म्हणून बलिदान देण्याकरता त्याला या पृथ्वीवर पाठवण्याद्वारे सर्वात महान प्रेम व्यक्‍त केले आहे. आपण पापी मानव असल्यामुळे आपल्याला मुक्‍ततेची किंवा सुटकेची नितांत गरज आहे. कारण कोणत्याही अपरिपूर्ण मनुष्याला “आपल्या भावाला मुक्‍त करिता येत नाही; किंवा . . . त्याने सर्वदा जगावे, . . . म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही.” (स्तोत्र ४९:६-९) देवाने “आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे,” याबद्दल आपण देवाचे किती आभारी आहोत.—योहान ३:१६.

खंडणी आपली सुटका कशी करते? यहोवा देवाने दाखवलेल्या या प्रेमळ कार्यामुळे आपल्याला कोणत्या चार मार्गांनी मुक्‍तता मिळते त्यावर विचार करू या.

खंडणी आपली सुटका करते

पहिला मार्ग म्हणजे, येशूचे बलिदान वारशाने मिळालेल्या पापापासून आपली सुटका करू शकते. आपल्या सर्वांचा पापातच जन्म झाला आहे. होय, यहोवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याआधीच आपण पापी आहोत. ते कसे? रोमकर ५:१२ म्हणते: “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले.” पापी आदामाची संतती या नात्याने आपल्याला देखील त्याची अपरिपूर्णता वारशाने मिळाली आहे. परंतु, आपल्या वतीने खंडणी देण्यात आली असल्यामुळे वारशाने मिळालेल्या पापापासून आपली सुटका शक्य होते. (रोमकर ५:१६) येशूने “प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव” घेतला; आदामाच्या संततीच्या वतीने पापाचे परिणाम स्वतः भोगले.—इब्री लोकांस २:९; २ करिंथकर ५:२१; १ पेत्र २:२४.

दुसरा मार्ग, खंडणी आपली पापाच्या प्राणघातक परिणामांपासून सुटका करू शकते. “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) पापाची शिक्षा मृत्यू आहे. देवाच्या पुत्राने आपल्या बलिदानरूपी मृत्यूद्वारे आज्ञाधारक मानवजातीसाठी सार्वकालिक जीवन शक्य करून दिले. होय, त्यामुळे “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही.”—योहान ३:३६.

आपण देवाच्या पुत्रावर विश्‍वास ठेवला तरच आपण पापाच्या परिणामांपासून सुटका मिळवू शकतो, याची नोंद घ्या. यामध्ये आपल्या जीवनात बदल करून ते देवाच्या इच्छेच्या सामंजस्यात आणणे समाविष्ट आहे. आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे मार्गाक्रमण करत असू तर ते आपण सोडून दिले पाहिजे आणि देव ज्याने संतुष्ट होतो अशाप्रकारे जगले पाहिजे. “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा” असे प्रेषित पौलाने म्हटले.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.

तिसरा मार्ग, येशूने दिलेल्या बलिदानामुळे, अपराधी विवेकापासून आपली सुटका होते. यहोवाला समर्पण करून त्याच्या पुत्राचे बाप्तिस्मा प्राप्त शिष्य बनणाऱ्‍या सर्वांना सांत्वन मिळते. (मत्तय ११:२८-३०) आपण अपरिपूर्ण असलो तरी, शुध्द विवेकाने देवाची सेवा करण्यात आपल्याला आनंद मिळतो. (१ तीमथ्य ३:९; १ पेत्र ३:२१) आपण आपले पाप कबूल करतो आणि पापी मार्गाक्रमण सोडून देतो तेव्हा आपल्याला दया दाखवली जाते आणि आपल्याला अस्वस्थ करणाऱ्‍या विवेकापासून आपली सुटका होते.—नीतिसूत्रे २८:१३.

साहाय्य व आशा

चवथा व शेवटला मार्ग म्हणजे, खंडणीवर विश्‍वास ठेवल्याने, देवासमोरील भूमिकेच्या संबंधाने आपल्या मनात असलेल्या भीतीपासून आपली सुटका होते. प्रेषित योहानाने लिहिले: “जर कोणी पाप केले, तर . . . जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.” (१ योहान २:१) कैवारी या नात्याने येशूच्या भूमिकेविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “ह्‍याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.” (इब्री लोकांस ७:२५) जोपर्यंत आपल्यात पापाचे लवलेश आहे तोपर्यंत आपल्याला देवासमोर उचित भूमिका राखण्यास मदत मिळण्याकरता महायाजक येशू ख्रिस्त याच्या सेवांची गरज लागेल. महायाजक या नात्याने येशू ख्रिस्ताने आपल्याकरता काय केले आहे?

सा.यु. ३३ मध्ये येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर ४० दिवसांनंतर तो स्वर्गात गेला. तेथे त्याने आपल्या ‘मूल्यवान रक्‍ताचे’ मोल देवाला सादर केले. यामुळे, येशू लवकरच आज्ञाधारक मानवजातीची पाप आणि मृत्यूपासून सुटका करेल. * (१ पेत्र १:१८, १९) तेव्हा, येशू ख्रिस्त आपल्या प्रेमास व आज्ञाधारकतेस पात्र आहे, असे वाटत नाही का तुम्हाला?

तसेच, यहोवा देवही आपल्या प्रेमास व आज्ञाधारकतेस पात्र आहे. त्याने “खंडणी भरून . . . मुक्‍ति” देण्याची प्रेमळ तरतूद केली. (१ करिंथकर १:३०) त्यामुळे आता आपण जगत असलेले जीवन तसेच आपण अनुभवणार आहोत ते सार्वकालिक जीवन यांचे श्रेय केवळ त्यालाच जाते. यास्तव, ‘मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा’ मानण्यासाठी आपल्याकडे भरपूर कारण आहे.—प्रेषितांची कृत्ये ५:२९. (w०६ ३/१५)

[तळटीप]

^ परि. 12 यहोवाच्या साक्षीदारांचे २००६ कॅलेंडर, मार्च/एप्रिल पाहा.

[१९ पानांवरील चौकट/चित्रे]

तुम्हाला माहीत होते का?

• येशू जैतुनाच्या डोंगरावरून स्वर्गात गेला. —प्रेषितांची कृत्ये १:९, १२.

• केवळ येशूच्या विश्‍वासू प्रेषितांनीच त्याचे स्वर्गारोहण पाहिले.—प्रेषितांची कृत्ये १:२, ११-१३.