व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाचे नवीन सदस्य

नियमन मंडळाचे नवीन सदस्य

नियमन मंडळाचे नवीन सदस्य

बुधवार, ऑगस्ट २४, २००५ रोजी सकाळी संयुक्‍त राष्ट्रे व कॅनडा येथील बेथेल कुटुंबानी, एक आनंदाची बातमी ऐकली. ब्रुकलिनहून व्हिडिओवरून हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला होता. ती बातमी अशी होती, की सप्टेंबर १, २००५ पासून जेफरी डब्ल्यू. जॅक्सन आणि ॲन्थनी मॉरिस तिसरे, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात कार्य करतील.

बंधू जॅक्सन यांनी ऑस्ट्रेलियातील द्वीप राज्य असलेल्या टास्मानियात १९७१ सालच्या फेब्रुवारीत पायनियरींग सुरू केली होती. १९७४ सालच्या जूनमध्ये त्यांनी जेनेट (जेनी) हिच्याबरोबर विवाह केला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना खास पायनियर म्हणून सेवा करण्यास नेमण्यात आले. १९७९ पासून २००३ पर्यंत दोघा पतीपत्नीने तुवालू, सामोआ आणि फिजी या दक्षिण पॅसेफिकमधील द्वीप राष्ट्रांत मिशनरी म्हणून सेवा केली. द्वीपांवर असताना, बंधू व भगिनी जॅक्सन यांनी बायबल साहित्याच्या भाषांतर कार्याला मोलाचा हातभार लावला. १९९२ साली बंधू जॅक्सन यांनी सामोआतील शाखा दफ्तरात शाखा समितीत कार्य केले आणि १९९६ पासून फिजीतील शाखा समितीत सेवा केली. २००३ सालच्या एप्रिल महिन्यात ते व त्यांची पत्नी संयुक्‍त राष्ट्रातील बेथेल कुटुंबाचे सदस्य बनले आणि भाषांतर सेवा विभागात कार्य करू लागले. त्यानंतर लगेच, बंधू जॅक्सन यांना नियमन मंडळाच्या शिक्षण समितीचे मदतनीस बनवण्यात आले.

बंधू मॉरीस यांनी देखील १९७१ साली संयुक्‍त संस्थानात पायनियर सेवा सुरू केली. त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात त्यांचा सूझनशी विवाह झाला आणि पुढील चार वर्षांपर्यंत, म्हणजे त्यांचा पहिला मुलगा जेसी ह्‍याचा जन्म होईपर्यंत पायनियरींग केली. कालांतराने त्यांना दुसरा मुलगा झाला, पॉल. बंधू मॉरीस यांनी सामान्य पायनियर म्हणून १९७९ साली पुन्हा पूर्ण वेळेची सेवा सुरू केली. दोघे मुले शाळेत जाऊ लागल्यावर त्यांच्या पत्नीने देखील त्यांच्याबरोबर पायनियरींग सुरू केली. संयुक्‍त संस्थानाच्या ऱ्‍होड द्वीप व उत्तर कॅरोलिना येथे संपूर्ण कुटुंबाने अधिक गरज असलेल्या ठिकाणी सेवा केली. उत्तर कॅरोलिना येथे असताना बंधू मॉरिस यांनी बदली विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केली आणि त्यांच्या मुलांनी सामान्य पायनियरींग सुरू केली. जेसी व पॉल एकोणीस वर्षांचे झाल्यावर त्यांना संयुक्‍त संस्थानांतील शाखा दफ्तरात सेवा करण्याचे आमंत्रण मिळाले. बंधू मॉरिस यांनी विभागीय कार्य चालू केले होते. मग, २००२ साली त्यांना व सूझनला बेथेलला येण्याचे आमंत्रण मिळाले. ऑगस्ट १ तारखेला त्यांनी आपली नवीन नेमणूक सुरू केली. बंधू मॉरिस यांनी पॅटरसन येथील सेवा विभागात काम केले आणि नंतर नियमन मंडळाच्या सेवा समितीचे मदतनीस म्हणून कार्य केले.

या दोन नव्या सदस्यांच्या व्यतिरिक्‍त नियमन मंडळात, सी. डब्ल्यू. बार्बर; जे. ई. बार; एस. एफ. हर्ड; एम. एस. लेट; जी. लॉश; टी. जॅरझ; जी. एच. पियर्स; ए. डी. श्रोडर; डी. एच. स्प्लेन; आणि डी. सिडलिक यांचाही समावेश आहे. नियमन मंडळाचे सर्व सदस्य अभिषिक्‍त ख्रिस्ती आहेत. (w०६ ३/१५)