व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘नाजूक पात्राचे’ मूल्य

‘नाजूक पात्राचे’ मूल्य

‘नाजूक पात्राचे’ मूल्य

“नवऱ्‍यांनो, त्याचप्रमाणे तुम्ही [आपल्या पत्नींबरोबर] सुज्ञतेने राहा; बायको अधिक नाजूक पात्र आहे; . . . असे समजून तुम्ही त्यांना मान द्या.” (१ पेत्र ३:७, पं.र.भा.) हे शास्त्रवचन स्त्रीला “नाजूक पात्र” संबोधून कोणत्याही मार्गाने कमी लेखते का? मूळ ईश्‍वरप्रेरित लेखकाला काय म्हणायचे होते, हे आपण पाहू या.

“मान” असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक नामाचा अर्थ “किंमत, मूल्य, . . . आदर” असा होतो. त्यामुळे, एका ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीला कोमलतेने वागवले पाहिजे; ती एखाद्या नाजूक, मौल्यवान पात्रासारखी आहे असे समजले पाहिजे. यामुळे तिला मुळीच कमी लेखले जात नाही. टिफनी लोटस लॅम्पचा विचार करा. या सुरेख लॅम्पला खरोखरच अतिशय नाजूक म्हणता येते. पण, त्याच्या नाजूकपणामुळे त्याचे मूल्य कमी होते का? मुळीच नाही! सन १९९७ मध्ये, एका लिलावात मूळ टिफनी लोटस लॅम्प २८ लाख डॉलरला विकला गेला! त्याच्या नाजूकपणामुळे त्याचे मूल्य कमी झाले नाही, उलट वाढले.

तसेच, स्त्रीला एका नाजूक पात्राप्रमाणे मान दिल्याने तिचे मूल्य कमी होत नाही किंवा तिचा अनादर होत नाही. आपल्या पत्नीबरोबर ‘सुज्ञतेने वागणे’ याचा अर्थ पतीने तिची शक्‍ती, तिची मर्यादा, तिच्या आवडी-निवडी, तिचे दृष्टिकोन, तिच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. पत्नीची काळजी घेणारा पती, त्याच्या आणि तिच्या व्यक्‍तिमत्त्वात असलेले फरक ओळखून त्याप्रमाणे तिच्याशी व्यवहार करतो. प्रत्येक गोष्टीत तो तिचा विचार करतो जेणेकरून ‘त्याच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.’ (१ पेत्र ३:७) स्त्रियांमध्ये विशेषकरून असलेल्या सद्‌गुणांचा पती जर आदर करत नसेल तर तो देवाबरोबरील आपला नातेसंबंध धोक्यात आणत आहे. देवाचे वचन स्त्रियांना तुच्छ लेखत नाही, हे स्पष्ट आहे. उलट ते त्यांचा आदर करते. त्यांना मान देते. (w०६ ५/१५)

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Christie’s Images Limited १९९७