व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्माणकर्त्याकडून एक शाश्‍वत भेट

निर्माणकर्त्याकडून एक शाश्‍वत भेट

निर्माणकर्त्याकडून एक शाश्‍वत भेट

शास्त्रज्ञ मानतात, की कोणत्याही ग्रहावर जीवनासाठी विशिष्ट घटक आवश्‍यक आहेत. तर, या घटकांचा बायबलच्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात एकतर उल्लेख करण्यात आला आहे किंवा असे सूचित करण्यात आले आहे, हे आश्‍चर्याचे नाही का? हे कोणते घटक आहेत?

जीवनाची भरभराट होण्याकरता मुबलक प्रमाणात पाणी असले पाहिजे. याचा उल्लेख उत्पत्ति १:२ मध्ये करण्यात आला आहे. पाणी हे द्रव्यरुपात टिकून राहण्याकरता ग्रहावरील तापमान उचित असावयास हवे. यासाठी ग्रह सूर्यापासून योग्य अंतरावर असला पाहिजे. उत्पत्तिचा अहवाल वारंवार, सूर्य आणि पृथ्वीवर त्याचा काय परिणाम होतो, ते दाखवतो.

ग्रहावर मनुष्यवस्ती हवी असेल तर ग्रहाचे वातावरण, विशिष्ट वायुंचे मिश्रण आवश्‍यक आहे. या महत्त्वपूर्ण पैलूचा उल्लेख उत्पत्ति १:६-८ मध्ये करण्यात आला आहे. उत्पत्ति १:११, १२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, दाट वनस्पतींमुळे भरपूर ऑक्सीजन तयार होतो. ज्या ग्रहावर नानाविध प्राणी जीवांची वाढ झाली पाहिजे त्या ग्रहावर कोरडी, उत्पादनशील जमीन हवी. आणि याविषयीचे वर्णन उत्पत्ति १:९-१२ मध्ये करण्यात आले आहे. आणि सरतेशेवटी, ग्रहावर सौम्य हवामान राहावे म्हणून, ग्रह एका उचित कोनात झुकलेला हवा आणि योग्य ठिकाणी स्थिर हवा. पृथ्वीच्या बाबतीत पाहता, हे आपल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्‍तीने साध्य होते. चंद्राचे अस्तित्व आणि त्याचे काही फायदे यांच्याविषयी उत्पत्ति १:१४, १६ मध्ये वर्णन करण्यात आले आहे.

प्राचीन लेखक मोशे, आधुनिक विज्ञानाचे कसलेही ज्ञान नसताना वरील घटकांचा उल्लेख कसा करू शकला? या घटकांचे महत्त्व समजण्याची अनोखी कुवत केवळ त्याच्याकडेच होती आणि त्याच्या बरोबरीच्या लोकांकडे नव्हती का? खरे तर, मोशेला स्वर्गाच्या व पृथ्वीच्या निर्माणकर्त्याने हा वृत्तांत लिहिण्याची प्रेरणा दिली होती. त्यामुळेच, उत्पत्तिचा अहवाल वैज्ञानिकरीत्या इतका अचूक आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे.

विश्‍वात आपल्या सभोवती आपण पाहत असलेल्या अजब सृष्टीमागे एक उद्देश आहे, असे बायबल ठासून सांगते. स्तोत्र ११५:१६ मध्ये म्हटले आहे: “स्वर्ग तर परमेश्‍वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.” आणखी एका स्तोत्रात असे म्हटले आहे, की त्याने ‘पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहे की ती कधीहि ढळणार नाही.’ (स्तोत्र १०४:५) हे विश्‍व आणि आपला सुंदर पृथ्वीग्रह निर्माणकर्त्याने विचारपूर्वक रचून निर्माण केला आहे तर मग, यांना टिकून ठेवण्याचे सामर्थ्य देखील त्याच्याजवळ निश्‍चित्तच आहे, असा आपण विश्‍वास करू शकतो. याचा अर्थ आपण एका अभिवचनाची पूर्णता निश्‍चित होईल ही खात्री बाळगू शकतो. हे अभिवचन असे आहे: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) म्हणूनच, देवाने ‘पृथ्वी निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही तर तिजवर [कायमस्वरुपी] लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.’ अशा लोकांची वस्ती की जे त्याच्या सृष्टीची कदर करतील.—यशया ४५:१८.

शास्त्रवचनांनुसार येशू या पृथ्वीवर, आपल्याला देवाबद्दल आणि आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवन बहाल करण्याचा देवाचा जो उद्देश आहे हे शिकवण्यासाठी आला. (योहान ३:१६) आपल्याला ही खात्री देण्यात आली आहे, की लवकरच देव “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करणार आहे व सर्व राष्ट्रांतील शांती-प्रिय मानव जे बचावाकरता त्याने केलेल्या तरतूदीचा स्वीकार करतात ते वाचणार आहेत. (प्रकटीकरण ७:९, १४; ११:१८) मानव जेव्हा सदासर्वकाळ देवाच्या चमत्कारिक सृष्टीचा शोध लावत राहतील आणि तिचा उपभोग घेत राहतील, तेव्हाचे जीवन किती अद्‌भुत असेल!—उपदेशक ३:११; रोमकर ८:२१. (w०७ २/१५)

[८ पानांवरील चित्राचे श्रेय]

NASA photo