व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहोवाच्या साक्षीदारांनी, साक्षीदार नसलेल्या नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या विवाह समारंभाला जाणे उचित आहे का?

विवाह सोहळे आनंदाचे प्रसंग असतात आणि ख्रिस्ती जनही या आनंदात सामील होऊ इच्छितात, ही समजण्याजोगी गोष्ट आहे. अर्थात, लहान मुलांना आमंत्रण दिले जाते तेव्हा त्यांनी याबाबतीत आपल्या आईवडिलांचे म्हणणे ऐकावे. (इफिसकर ६:१-३) परंतु, यहोवाचा साक्षीदार नसलेला एक मनुष्य, साक्षीदार असलेल्या आपल्या पत्नीला त्याच्याबरोबर चर्चमध्ये होणाऱ्‍या विवाहसमारंभाला येण्यास सांगतो तेव्हा काय? त्या प्रसंगाशी संबंधित असलेल्या कोणत्याही धार्मिक कृत्यात भाग न घेता केवळ एक उपस्थित म्हणून जाण्यात काही गैर नाही म्हणून कदाचित तिला तिचा विवेक अनुमती देईल.

तेव्हा, एखाद्या विशिष्ट विवाह सोहळ्याला जायचे की नाही हा सर्वस्वी व्यक्‍तिगत प्रश्‍न आहे. परंतु, प्रत्येक ख्रिश्‍चनाने, आपल्याला यहोवाला उत्तर द्यायचे आहे या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे व गैरसाक्षीदारांच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्याआधी अनेक शास्त्रवचनीय तत्त्वांचा विचार केला पाहिजे.

ख्रिस्ती व्यक्‍तीने नेहमी देवाची संमती मिळवण्याचा आधी विचार केला पाहिजे. येशूने म्हटले: “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) त्यामुळे यहोवाचे साक्षीदार इतर धार्मिक कार्यांत जसे की बायबल सत्याच्या विरोधात असलेल्या प्रार्थनांमध्ये, प्रथांमध्ये किंवा विधींमध्ये भाग घेत नाहीत.—२ करिंथकर ६:१४-१७.

एक ख्रिस्ती व्यक्‍ती, तिच्या निर्णयाचा इतरांवर कसा परिणाम होईल, याचाही विचार करेल. तुम्ही जर उपस्थित राहण्याचे ठरवत असाल तर, विवाहसोहळ्याच्या कार्यात तुम्ही भाग घेत नाही म्हणून तुमचे नातेवाईक तुमच्यावर नाराज तर होणार नाहीत? सहउपासकांवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे, याचाही विचार केला पाहिजे. (रोमकर १४:१३) साक्षीदार नसलेल्यांच्या विवाहसोहळ्याला जाण्यात काही गैर नाही असे तुम्हाला अथवा तुमच्या घरातील इतर सदस्यांना वाटत असले तरी, तुमच्या आध्यात्मिक बंधूभगिनींवर याचा उलट परिणाम होऊ शकेल का? यामुळे काहींच्या विवेकाला ठेच पोहचण्याची शक्यता आहे का?

साक्षीदार नसलेल्या नातेवाईकांच्या विवाहसोहळ्यांच्या प्रसंगी तुम्ही कधीकधी कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर वधू अथवा वराच्या बाजूने उभे राहण्यास सांगण्यात आले तर? तुमचा विवाह सोबती साक्षीदार नसेल आणि विवाहसोहळ्यात पूर्णपणे भाग घेऊ इच्छित असेल तर? विवाहसोहळा एका वकिलापुढे अथवा सरकारी अधिकाऱ्‍यापुढे पार पडणार असेल तर, त्या प्रसंगी केवळ कायदेशीररीत्या साक्षीदार म्हणून उपस्थित राहणे इतकेच समाविष्ट नसेल.

पण, एखाद्या मंदिरात होणाऱ्‍या अथवा पाळक चालवणार असलेल्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिल्याने आणखी काही प्रश्‍न उद्‌भवू शकतात. आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार वागण्याकरता व तुम्हाला तुमच्या धार्मिक विश्‍वासांशी हातमिळवणी करावी लागणार नाही असे प्रसंग किंवा मग, विवाह मंडळीला आवडणार नाही असे काहीतरी करण्याचे टाळण्याकरता तुम्ही अशा विवाहसोहळ्यांना न गेलेलेच बरे असे ठरवाल. (नीतिसूत्रे २२:३) विवाहसोहळ्याच्या आधीच तुमच्या बायबल आधारित विश्‍वासाचे स्पष्टीकरण देऊन व कोणकोणत्या गोष्टीत तुम्ही भाग घेऊ शकता/घेऊ शकत नाही अथवा पर्यायी कार्य सुचवून तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा पुष्कळ ताण कमी करू शकाल.

सर्व गोष्टींचा चहुकडून विचार करून, काही ख्रिस्ती असे ठरवतील, की साक्षीदार नसलेल्या विवाहसोहळ्याला केवळ पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यात काही गैर नाही. पण जर एका ख्रिश्‍चनाला असे वाटेल, की अशा विवाहसोहळ्याला उपस्थित राहिल्याने त्याला देवाच्या तत्त्वांची हातमिळवणी करण्याचा मोह होऊ शकतो तर त्यात संभाव्य लाभांपेक्षा संभाव्य धोकेच जास्त आहेत, असा विचार करेल. तो जर विवाहसोहळ्याला न जाता फक्‍त त्यानंतरच्या कार्यात आमंत्रित पाहुणा म्हणून जाण्याचे ठरवत असेल तर त्याने ‘सर्व काही देवाच्या गौरवासाठी’ करण्याचा निश्‍चय केला पाहिजे. (१ करिंथकर १०:३१) हे निर्णय घेताना “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) यास्तव, तुम्ही जोही निर्णय घ्याल तो घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ती ही, की यहोवा देवासमोर शुद्ध विवेक ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. (w०७ ११/१५)