व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भविष्यात काय राखून ठेवले आहे?

भविष्यात काय राखून ठेवले आहे?

भविष्यात काय राखून ठेवले आहे?

या प्रश्‍नाचे उत्तर शोधून काढणे महत्त्वाचे का आहे? एखादी व्यक्‍ती भविष्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहते, त्याचा वर्तमानातील तिच्या वागणुकीवर प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ, भविष्यात कसलीही आशा नसलेल्या लोकांची अशी मनोवृत्ती असू शकेल: “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.” (१ करिंथकर १५:३२) या मनोवृत्तीमुळे लोक सहसा खादाडपणा व दारूबाजीसारख्या गोष्टींकडे वळतात. ते चिंताग्रस्त होतात; त्यांना मनाची खरी शांती नसते.

पण, भविष्य सर्वस्वी मानवाच्या हातात सोडून दिल्यास, भविष्यात कसलीही आशा राहणार नाही, हेही तितकेच खरे. कारण आज पृथ्वीची हवा, पाणी, जमीन मोठ्या प्रमाणावर प्रदूषित केली जात आहे. आण्विक युद्ध आणि दहशतवादी हल्ल्यांची भीती देखील वाढतच चालली आहे. संपूर्ण जगातील कोट्यवधी लोकांवर रोगराईचे व दारिद्र्‌याचे सावट पसरले आहे. हे सगळे असूनही भविष्याबद्दल आशा बाळगण्यास उचित कारणे आहेत.

भविष्यात नेमके काय होणार आहे हे मानवाला सांगता येत नाही. परंतु यहोवा देव स्वतःविषयी असे म्हणतो: “मी प्रारंभापासूनच शेवट कळवितो, आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत त्या मी प्राचीन काळापासून दाखवतो.” (यशया ४६:१०, पं.र.भा.) भविष्यात काय राखून ठेवले आहे याबद्दल यहोवा काय सांगतो?

बायबल काय शिकवते

यहोवा देव पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीवनाचा नाश होऊ देणार नाही. खरे तर बायबल असे वचन देते, की देव “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील. (प्रकटीकरण ११:१८) यहोवा देव आपल्या राज्याद्वारे म्हणजेच स्वर्गीय सरकाराद्वारे पृथ्वीवरून दुष्टाई काढून टाकेल आणि पृथ्वीवरील परिस्थिती त्याच्या मूळ उद्देशानुसार करेल. (उत्पत्ति १:२६-३१; २:८, ९; मत्तय ६:९, १०) पुढील बायबल वचने आपल्याला भविष्याची एक झलक दाखवतात. या वचनांत अशा घटनांचे वर्णन आहे ज्यांचा पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्‍तीवर लवकरच प्रभाव पडणार आहे.

स्तोत्र ४६:८, ९“या, परमेश्‍वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; रथ अग्नीत जाळून टाकितो.”

यशया ३५:५, ६“तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.”

यशया ६५:२१, २२. “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”

दानीएल २:४४. “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”

योहान ५:२८, २९. “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”

प्रकटीकरण २१:३, ४“देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”

बायबलमधील उत्तराने खरी मनःशांती मिळते

वर सांगितलेल्या गोष्टी सुरुवातीला कदाचित आपल्याला अशक्य वाटतील. पण ही अभिवचने मनुष्याने नव्हे तर देवाने दिली आहेत. आणि यहोवा “देव खोटे बोलत नाही.”—तीत १:२, ईझी टू रीड व्हर्शन.

देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवायला व त्याच्या नियमांनुसार जगायला तुम्ही शिकलात तर वाइटातल्या वाईट परिस्थितीतही तुम्ही तुमची मनःशांती टिकवून ठेवू शकाल. युद्ध, दारिद्र्‌य, आजारपण, म्हातारपणामुळे येणाऱ्‍या समस्या किंवा मृत्यूची भीतीसुद्धा तुमच्यापासून तुमची मनःशांती कायमची हिरावून घेऊ शकणार नाही. का नाही? कारण, देवाच्या राज्यात ही सर्व दुःखे कायमची नाहीशी होतील याची तुम्हाला खात्री असेल.

भविष्याबद्दलची अशी पक्की आशा मिळवण्याकरता तुम्ही काय केले पाहिजे? “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून” घेतले पाहिजे आणि आपल्या मनोवृत्तीत बदल केला पाहिजे. (रोमकर १२:२) पण बायबलमधील अभिवचने भरवशालायक आहेत याबद्दल तुम्हाला कदाचित आणखी खात्री करून घ्यावी लागेल. यासंबंधीची माहिती मिळवण्याकरता तुम्ही जो प्रयत्न कराल तो वाया जाणार नाही. यातून तुम्हाला जी मनःशांती मिळेल ती इतर कोणत्याही गोष्टीतून मिळणार नाही. (w०८ २/१)

[८, ९ पानांवरील चित्रे]

भविष्याविषयी बायबल काय शिकवते?

यशया ३५:५

यशया ३५:६

योहान ५:२८, २९