व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या देवाविषयी

खऱ्‍या देवाविषयी

येशू काय शिकवतो

खऱ्‍या देवाविषयी

देवाला नाव आहे का?

देवाला एक नाव आहे असे येशूने शिकवले. येशू म्हणाला: “ह्‍यास्तव तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) बायबलमध्ये ते नाव यहोवा असल्याचे सांगितले आहे. (स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.) आपल्या शिष्यांच्या संदर्भात बोलताना येशूने प्रार्थनेत आपल्या पित्याला असे म्हटले: “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे.”—योहान १७:२६.

यहोवा कोण आहे?

येशूने यहोवाला “एकच खरा देव” असे संबोधले कारण यहोवा निर्माणकर्ता आहे. (योहान १७:३) येशू म्हणाला: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली.” (मत्तय १९:४) येशूने असेही म्हटले: “देव आत्मा आहे.” (योहान ४:२४) म्हणून आपण देवाला पाहू शकत नाही.—निर्गम ३३:१७-२०.

देव आपल्याकडून काय अपेक्षितो?

सर्वात मोठी आज्ञा कोणती, असे कोणीतरी येशूला विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले: “पहिली ही की, हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्‍वर हा अनन्य परमेश्‍वर आहे; आणि तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर.”—मार्क १२:२८-३१.

आपले देवावर प्रेम आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

येशूने म्हटले: “मी पित्यावर प्रीति करितो.” येशूने हे प्रेम कसे दाखवले? त्याने म्हटले: “पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे [मी] करितो.” (योहान १४:३१) त्याने असेही म्हटले: “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ८:२९) देवाविषयी शिकण्याद्वारे आपण त्याला संतुष्ट करू शकतो. आपल्या शिष्यांविषयी प्रार्थना करताना येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला . . . त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३; १ तीमथ्य २:४.

आपण देवाविषयी कसे शिकू शकतो?

देवाविषयी शिकण्याचा एक मार्ग म्हणजे त्याने बनवलेल्या वस्तुंचे परीक्षण करणे. उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारांत साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो; तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?” पक्ष्यांचे निरीक्षण करण्यास सांगून येशू आपल्याला काय शिकवू इच्छितो? शारीरिक गरजांविषयी चिंता करून आपण देवाची सेवा करण्याचे सोडून देऊ नये, हे येशू आपल्याला शिकवू इच्छितो.—मत्तय ६:२६-३३.

यहोवाला जाणण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या वचनाचा अर्थात बायबलचा अभ्यास करणे. येशूने शास्त्रवचनांना “देवाचे वचन” म्हटले. (लूक ८:२१) येशूने असेही म्हटले: “तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७; २ पेत्र १:२०, २१.

येशूने लोकांना यहोवाबद्दलचे सत्य शिकून घेण्यास मदत केली. त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याच्याविषयी असे म्हटले: “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” (लूक २४:३२) देवाबद्दल आपल्याला आणखी शिकायचे असेल तर आपण नम्र व शिकून घेण्यास तयार असले पाहिजे. येशू म्हणाला: “तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.”—मत्तय १८:३.

देवाबद्दलचे ज्ञान घेतल्यामुळे आनंद का मिळतो?

सुखी होण्याकरता जीवनाचा उद्देश काय आहे हे समजून घेण्याची मानवाला गरज असते आणि देव ही गरज पूर्ण करतो. येशूने म्हटले: “ज्यांना आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव आहे ते धन्य.” (मत्तय ५:३, NW) जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे हे यहोवा आपल्याला शिकवतो. “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”—लूक ११:२८; यशया ११:९. (w०८ २/१)

अधिक माहितीकरता बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाचा पहिला अध्याय पाहा *

[तळटीप]

^ परि. 17 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[१२ पानांवरील चित्र]

“मी तुझे नाव त्यांस कळविले आहे”—योहान १७:२६

[१२, १३ पानांवरील चित्रे]

सृष्टीतून व बायबलमधून आपण यहोवाविषयी शिकू शकतो