व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीला केवळ देवच वाचवू शकतो

पृथ्वीला केवळ देवच वाचवू शकतो

पृथ्वीला केवळ देवच वाचवू शकतो

“चकचकीत निळसर पांढरा रत्न.” अशा शब्दात खगोलशास्त्रज्ञ एडगर मिशेल यांनी काळ्याभोर अंतराळात असलेल्या आपल्या पृथ्वीचे वर्णन केले.

पृथ्वीला मानवाच्या वास्तव्यासाठी बनवण्यास देवाने बरीच तयारी केली. तिला बनवून झाल्यावर देवदूतांनी “जयजयकार केला.” (ईयोब ३८:७) या ग्रहावरील चमत्कारीक गोष्टींचे परीक्षण केल्यावर आपणही देवाचे जयजयकार करू. आपल्या पर्यावरणात अशा अनेक क्लिष्ट प्रक्रिया आहेत ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन टिकून राहते. यातील एक प्रक्रिया आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. या प्रक्रियेत वनस्पती, सूर्यप्रकाशाचा उपयोग करून हवेतील कार्बन डायऑक्साईड व पाण्याच्या साहाय्याने अन्‍न तयार करतात. या प्रक्रियेतून ऑक्सिजन बाहेर पडतो जो सर्व सजीवांना म्हणजे आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्‍यक आहे.

बायबल दाखवते की देवाने या पृथ्वीची देखभाल करण्याची जबाबदारी मानवावर सोपवली होती. (उत्पत्ति १:२८; २:१५) पण, पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मानवाची प्रवृत्ती योग्य असणे आवश्‍यक होते. म्हणजे त्याने पृथ्वीवर प्रेम करायचे होते. ती अशीच सुंदर राहावी म्हणून त्याला मनापासून वाटायला हवे होते. पण मनुष्याला तर इच्छा स्वातंत्र्य बहाल करण्यात आले होते. त्यामुळे तो पृथ्वीचे एकतर संरक्षण करण्याची निवड करू शकत होता, किंवा तिची नासाडी करण्याची निवड करू शकत होता. त्याने अगदी हीच निवड केली. मनुष्याच्या या निष्काळजीपणाचे व लोभाचे परिणाम विनाशकारी ठरले आहेत.

यापैकीचे काही विनाशकारी परिणाम पुढीप्रमाणे आहेत: (१) बेसुमार जंगलतोडीमुळे पृथ्वीला कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे शक्य होत नाही. यामुळे हवामानाच्या संतुलनात बिघाड होण्याची शक्यता आहे. (२) कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे, पर्यावरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्‍या तसेच पीकांच्या परागणास आवश्‍यक असलेल्या कीटकांचा नाश होत आहे. (३) समुद्र व नद्यांतील अतिमच्छिमारीमुळे आणि प्रदुषणामुळे माशांच्या संख्येत कमालीचा घट होत आहे. (४) पृथ्वीवरील नैसर्गिक खजिन्यांच्या लोभिष्ट उपसामुळे पुढील पिढ्यांसाठी काही उरणार नाही व यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग देखील तेजीने होत आहे असे म्हटले जाते. हिमनद्यांचे आटणे व आर्टिक तसेच अंटार्टिक मधील हिमनगांचे एकमेकांपासून विलग होऊन वितळणे हा ग्लोबल वॉर्मिंगचा एक पुरावा असल्याचे काही पर्यावरणवादी म्हणतात.

नैसर्गिक आपत्तींत वाढ होत असल्यामुळे कदाचित काही जण म्हणतील, की पृथ्वी आता प्रतिकार करत आहे, म्हणूनच मनुष्यावर दुःखद परिस्थिती ओढवत आहे. देवाने आपल्याला त्याच्या मालकीच्या पृथ्वीवर फुकट राहण्याची परवानगी दिली आहे. (उत्पत्ति १:२६-२९) पण सध्या जगात होत असलेल्या घटनांवरून तर स्पष्ट दिसत आहे, की पुष्कळ लोकांना या सुंदर घराची देखभाल करण्याची इच्छा नाही. त्याऐवजी ते स्वतःच्याच स्वार्थी इच्छा व आकांक्षा पुऱ्‍या करण्यात गुरफटले आहेत. खरे तर ते एक वाईट भाडेकरू ठरले आहेत. प्रकटीकरण ११:१८ मध्ये भाकीत केल्यानुसार ते “पृथ्वीची नासाडी” करत आहेत.

बायबलची भविष्यवाणी दाखवते की पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवणाऱ्‍या पर्यावरणाचा निर्माणकर्ता सर्वशक्‍तिमान यहोवा देव, वाईट भाडेकरूंची लवकरच “हाकालपट्टी” करणार आहे. (सफन्या १:१४; प्रकटीकरण १९:११-१५) मानवाने या पृथ्वीचा संपूर्ण नाश करण्याआधीच देव कार्य करणार आहे. * (मत्तय २४:४४) होय, पृथ्वीला फक्‍त देवच वाचवू शकतो. (w०९ १/१)

[तळटीप]

^ आपल्या काळाच्या निकडीविषयी सविस्तर माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले जागृत राहा! हे माहितीपत्रक पाहा.