व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव एक व्यक्‍ती आहे का?

देव एक व्यक्‍ती आहे का?

देव एक व्यक्‍ती आहे का?

लोक देत असलेली सर्वसामान्य उत्तरे:

“तो सगळीकडे आहे, तो चराचरात आहे. तो वायूसारखा आहे.”

“तो व्यक्‍ती नसून बुद्धिमान किंवा निराकार शक्‍ती आहे.”

येशूने काय म्हटले?

“माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत.” (योहान १४:२) देव एका लाक्षणिक घरात राहातो, असे येशूने म्हटले.

“मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.” (योहान १६:२८) देव एक वास्तविक व्यक्‍ती आहे व तो विशिष्ट ठिकाणी राहतो असा येशूचा विश्‍वास होता.

येशूने देव निराकार शक्‍ती असल्याचे कधीही म्हटले नाही. याउलट तो देवाबरोबर बोलला आणि त्याने त्याला प्रार्थनाही केली. यहोवा त्याचा स्वर्गीय पिता असल्याचा त्याने अनेकदा उल्लेख केला. स्वर्गीय पिता म्हणण्याद्वारे त्याने यहोवाबरोबरील त्याचा घनिष्ट संबंध असल्याचे दाखवून दिले.—मत्तय ६:१४, २६, ३२.

“देव आत्मा आहे” व “देवाला कोणीहि कधीच पाहिले नाही” हे मान्य आहे. (योहान १:१८; ४:२४) पण याचा अर्थ त्याला कोणताही आकार नाही किंवा त्याला शरीर नाही, असा होत नाही. बायबल सांगते की “जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरहि आहे.” (१ करिंथकर १५:४४) म्हणजे, यहोवाला आध्यात्मिक अर्थात आत्मिक शरीर आहे का?

होय. येशूचे पुनरूत्थान झाल्यावर तो “आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” (इब्री लोकांस ९:२४) हे वचन आपल्याला देवाविषयी दोन महत्त्वपूर्ण गोष्टी सांगते. पहिली गोष्ट, देवाचे एक वस्तीस्थान आहे. दुसरी गोष्ट, देव जर सर्वव्यापी असलेली निराकार शक्‍ती आहे तर येशू “देवासमोर” कसा काय उभा राहिला असता? यावरून हे स्पष्ट कळते, की देव एक व्यक्‍ती आहे.

पण मग देवाला सगळीकडच्या गोष्टींवर नियंत्रण करणे कसे शक्य होते? देव त्याचा पवित्र आत्मा किंवा कार्यकारी शक्‍ती विश्‍वामध्ये कोठेही पाठवू शकतो. ज्याप्रमाणे वडील आपल्या लहान मुलाला मदत करण्याकरता आपल्या हाताचा उपयोग करतात त्याचप्रमाणे यहोवा आपले उद्देश साध्य करण्यासाठी आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग करतो.—स्तोत्र १०४:३०; १३९:७.

देव एक आत्मिक व्यक्‍ती असल्यामुळे त्याला व्यक्‍तिमत्त्व आहे म्हणजे त्याला आवडी-निवडी आहेत. इतकेच नव्हे तर त्याला भावना देखील आहेत. बायबल सांगते की त्याला लोकांबद्दल प्रेम वाटते, त्याला स्वतःच्या कामाचा आनंद वाटतो, त्याला मूर्तीपूजेचा वीट आहे व दुष्टाई पाहून त्याला वाईट वाटते. (उत्पत्ति ६:६; अनुवाद १६:२२; १ राजे १०:९; स्तोत्र १०४:३१) पहिले तीमथ्य १:११ मध्ये त्याला “धन्यवादित देव” अर्थात आनंदी देव म्हटले आहे. म्हणूनच तर येशूने असे म्हटले, की या देवावर आपण संपूर्ण अंतःकरणाने प्रेम करण्यास शिकू शकतो.—मार्क १२:३०. * (w०९ २/१)

[तळटीप]

^ या विषयावरील अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय १ पाहा.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

आपल्या हाताचा उपयोग करणाऱ्‍या पित्याप्रमाणे देव आपले उद्देश पूर्ण करण्याकरता आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग करतो