व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला नाव आहे का?

देवाला नाव आहे का?

देवाला नाव आहे का?

लोक देत असलेली सर्वसामान्य उत्तरे:

“त्याचे नाव प्रभू आहे.”

“देवाला विशिष्ट असे नाव नसते, आपण कोणत्याही नावाने त्याचा धावा करू शकतो.”

येशूने काय म्हटले?

“तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) देवाला नाव आहे, असा येशूचा विश्‍वास होता.

“मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन; ह्‍यासाठी की, जी प्रीति तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.” (योहान १७:२६) येशूने देवाचे नाव इतरांना सांगितले.

▪ “परमेश्‍वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.” (लूक १३:३५; स्तोत्र ११८:२६) येशूने देवाच्या नावाचा उपयोग केला.

देव स्वतः आपल्याला त्याचे नाव सांगतो. तो म्हणतो “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.” * (यशया ४२:८, पं.र.भा.) मराठीत परिचित असलेले यहोवा हे नाव, देवाने स्वतःला दिलेल्या हिब्रू नावाचे रूप आहे. तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की बायबलच्या प्राचीन हस्तलिखितात या अद्वितीय हिब्रू नावाचा हजारो वेळा उल्लेख आढळतो. खरे पाहता, बायबलमध्ये दिलेल्या इतर कुठल्याही नावापेक्षा देवाचे हे नाव अनेकदा त्यात आढळते.

काही लोक “देवाचे काय नाव आहे,” असे विचारल्यावर “प्रभू” असे म्हणतील. हे उत्तर, “कोण निवडून आलं?” असे विचारल्यावर “उमेदवार” असे उत्तर दिल्यासारखे आहे. हे विचारलेल्या प्रश्‍नाचे नेमके उत्तर नाही. कारण “प्रभू” आणि “उमेदवार” ही नावे नाहीत.

देवाने आपल्याला त्याचे नाव का सांगितले आहे? आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे ओळखता यावे म्हणून देवाने आपल्याला त्याचे नाव सांगितले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीला परिस्थितीनुसार, सर, बॉस, बाबा किंवा आजोबा म्हटले जाते. या पदव्या त्या व्यक्‍तीविषयी थोडीफार माहिती देतात. पण केवळ त्या व्यक्‍तीच्या नावावरून आपल्याला तिच्याविषयी माहीत असलेल्या सर्व गोष्टी आठवतात. अशाच रीतीने, प्रभू, सर्वशक्‍तिमान, पिता आणि निर्माणकर्ता या पदव्या देवाच्या वेगवेगळ्या कार्यांविषयी सांगतात. पण केवळ यहोवा या त्याच्या व्यक्‍तिगत नावावरूनच आपल्याला त्याच्याविषयी माहीत असलेल्या सर्व गोष्टी आठवतात. पण मग तुम्हाला देवाचे नावच माहीत नसले तर तुम्ही त्याला कसे जाणू शकता?

देवाचे नाव केवळ माहीत असून चालणार नाही तर त्याचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. का? कारण बायबल आपल्याला सांगते, “जो कोणी प्रभुचे [“यहोवाचे,” समास] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”—प्रेषितांची कृत्ये २:२१, पं.र.भा.; योएल २:३२, पं.र.भा. (w०९ २/१)

[तळटीप]

^ देवाच्या नावाचा अर्थ तसेच काही बायबल अनुवादांमध्ये ते का सापडत नाही याच्या स्पष्टीकरणाकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील १९५-१९७ पृष्ठे पाहा.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

एखाद्या व्यक्‍तीला परिस्थितीनुसार, सर, बॉस, बाबा किंवा आजोबा म्हटले जाते. पण केवळ त्या व्यक्‍तीच्या नावावरून आपल्याला तिच्याविषयी माहीत असलेल्या सर्व गोष्टी आठवतात