व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“कदाचित माझी वेळ आली नव्हती”

“कदाचित माझी वेळ आली नव्हती”

“कदाचित माझी वेळ आली नव्हती”

केरकचरा वाहून नेणाऱ्‍या एका अवजड ट्रकच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रक थेट फूटपाथवर चढला. ट्रक फूटपाथवरून चाललेल्या एका जोडप्याला व एका २३ वर्षीय तरुणाला जाऊन धडकला. न्यू यॉर्क सिटी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, या अपघातात ते जोडपे जागीच ठार झाले व तो युवक बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यानंतर झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला तेव्हा, “देवा मला मदत कर. एवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो, यावर माझा विश्‍वासच बसत नाही. कदाचित माझी वेळ आली नव्हती,” असे उद्‌गार त्याने काढले.

अशा गोष्टी अनेकदा तुमच्या ऐकण्यात आल्या असतील. एखाद्या संकटातून एक व्यक्‍ती मरता मरता वाचते तेव्हा लोक सहसा “तिची वेळ आली नव्हती” असे म्हणतात. पण, एखाद्या क्षुल्लक गोष्टीचे निमित्त होऊन त्यात एखाद्याचा जीव जातो तेव्हा, “त्याची वेळ आली होती” किंवा “ईश्‍वराचीच इच्छा होती” असे लोक म्हणतात. जीवनात घडणाऱ्‍या चांगल्यावाईट गोष्टींसाठी लोक नशिबाला, भाग्याला, नियतीला अथवा देवाला जबाबदार ठरवत असले तरी त्या सर्वांमागचे त्यांचे मत एकच असते. ते म्हणजे, जीवनात घडणारी प्रत्येक घटना आणि तिचे परिणाम पूर्वनियोजित असल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. लोकांची ही विचारधारा, केवळ मृत्यू अथवा अपघात होतो तेव्हाच पाहायला मिळते असे नाही. शिवाय, या विचारधारेचा उगम आपल्याच दिवसांत किंवा आपल्याच काळात झाला असेही नाही.

उदाहरणार्थ, प्राचीन बॅबिलोनी लोकांचा असा विश्‍वास होता, की मानवी जीवनातील सर्व घडामोडी ग्रहताऱ्‍यांच्या हालचालींनुसार घडतात. त्यामुळे ते शकून किंवा राशी पाहण्यासाठी आकाशात पाहत असत. ग्रीक आणि रोमी लोक भाग्य देवतेची उपासना करायचे. त्यांच्या मते लोकांचे नशीब ठरवण्याची या देवतेत इतकी शक्‍ती होती, की काही वेळा झ्यूस आणि ज्युपिटर या त्यांच्या प्रमुख दैवतांची शक्‍तीही तिच्यापुढे फिकी पडायची.

पूर्वेकडील हिंदू व बौद्ध धर्माच्या लोकांचा असा विश्‍वास आहे, की गेल्या जन्मी तुम्ही जी कर्मे करता, त्यांची फळे तुम्ही या जन्मी भोगता. आणि या जन्माच्या कर्मांची फळे तुम्ही पुढच्या जन्मी भोगता. इतर धर्मांसोबतच ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक चर्चेस देखील, जीवन दैवलिखित असते हा सिद्धान्त मानतात.

आधुनिक व सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्‍या या युगातसुद्धा पुष्कळ लोक अजूनही असे मानतात, की जीवनातील त्यांची परिस्थिती, जीवनात त्यांना जे काही भोगावे लागते ते आणि त्यांच्या जीवनाचा अंत नशिबात लिहिल्याप्रमाणेच होत असल्यामुळे त्यात त्यांना फारसे काही बदल करता येत नाहीत. तुम्हालाही असेच वाटते का? जीवनातील घडामोडी, यशापयश आणि अगदी जीवन-मरणसुद्धा खरोखरच पूर्वनियोजित आहे का? तुमच्या जीवनावर नशिबाचे वर्चस्व आहे का? या प्रश्‍नांची बायबल काय उत्तरे देते ते आपण पाहू या. (w०९ ३/१)

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Ken Murray/New York Daily News