व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

येशूने प्रार्थना करताना यहोवाला “अब्बा, बापा” असे का संबोधले?

अब्बा या अरामी भाषेतील शब्दाचा अर्थ “बाप्पा” किंवा “हे पित्या” असा होतो. शास्त्रवचनात तीनदा आलेला हा शब्द प्रार्थना करताना स्वर्गीय पिता यहोवा याच्या संबंधाने वापरण्यात आलेला आहे. या शब्दाचा अर्थ काय होतो?

द इन्टरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एनसायक्लोपिडीया म्हणते: “येशूच्या काळी बोलीभाषेत अब्बा ही संज्ञा घनिष्ठ नातेसंबंधाला किंवा मुलांना आपल्या वडिलांबद्दल असलेल्या आदरास सूचित करत असे.” मुले आपल्या वडिलांना सहसा याच शब्दाने हाक मारायचे व हाच शब्द पहिला बोलायला शिकायचे. आपल्या पित्याला कळवळून प्रार्थना करताना येशूने हा शब्द वापरला होता. गेथशेमाने बागेत त्याच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी यहोवाला केलेल्या प्रार्थनेत येशूने त्याला उद्देशून “अब्बा, बापा” म्हटले होते.—मार्क १४:३६.

वरील एनसायक्लोपिडीया पुढे सांगते: “ग्रीक-रोमन काळात यहुदी साहित्यात देवाला अब्बा म्हणून संबोधलेले बिलकूल सापडत नाही कारण अशा प्रकारच्या जवळिकीने देवाला संबोधने अनादरणीय समजले जात असे. पण येशूने . . . प्रार्थनेत हा शब्द वापरून त्याचा देवाशी किती घनिष्ठ नातेसंबंध होता याची आणखी पुष्टी दिली.” “अब्बा” या शब्दाचे शास्त्रवचनात आलेले इतर दोन उल्लेख प्रेषित पौलाच्या लिखाणात वाचायला मिळतात. यावरून हे सिद्ध होते की पहिल्या शतकातील ख्रिस्ती देखील हा शब्द आपल्या प्रार्थनेत वापरत होते.—रोमकर ८:१५; गलतीकर ४:६. (w०९ ४/१)