व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपले नशीब आधीपासूनच ठरलेले असते का?

आपले नशीब आधीपासूनच ठरलेले असते का?

वाचक विचारतात

आपले नशीब आधीपासूनच ठरलेले असते का?

आपण कधी मरणार हे आधीपासूनच ठरलेले असते असे काही म्हणतात. देव स्वतः आपल्या मरणाची वेळ ठरवतो असे इतरांचे म्हणणे आहे. शिवाय जीवनात घडणाऱ्‍या घटना अटळ असतात, असाही लोक विचार करतात. याबद्दल तुमचेही मत असेच आहे का?

तुम्ही कदाचित स्वतःला खालील प्रश्‍न विचारू शकता: ‘जर आपण काहीही केले तरी आपले नशीब बदलणार नसेल, जे काही होते ते आधीच देवाने किंवा नशीबाने ठरवले आहे तर मग प्रार्थना करायची काय गरज आहे? जर आपले नशीब आधीपासूनच ठरलेले आहे तर मग आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी का घेतो? गाडीत बसल्यावर सीटबेल्ट का लावतो? शिवाय मद्यपान करून गाडी चालवायचे का टाळतो?’

बायबल अशी बेफिकीर मनोवृत्ती मुळीच खपवून घेत नाही. सर्व गोष्टी नशीबावर सोडण्यापेक्षा बायबलने इस्त्राएली लोकांना सुरक्षितेची जाणीव बाळगण्याची आज्ञा दिली. उदाहरणार्थ, त्यांना आपल्या घराच्या सपाट छप्परांवर कठडा बांधण्याची आज्ञा दिली होती. छप्परावरून कोणी अपघाताने खाली पडू नये म्हणून ही आज्ञा दिली होती. जर एखाद्याचा मृत्यू छप्परावरून खाली पडून व्हावा असे त्याच्या नशीबातच आहे तर देवाने ही आज्ञा का दिली असती?—अनुवाद २२:८.

काही जणांचा मृत्यू नैसर्गिक संकटांमुळे किंवा काही दुःखद अनियंत्रित घटनांमुळे होतो तेव्हा काय? त्यांचे ‘मरण त्याच दिवशी’ ठरले होते का? नाही, बायबलचा एक लेखक राजा शलमोनाने सांगितले: “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) त्यामुळे घडणाऱ्‍या घटना कितीही विचित्र किंवा अशक्य वाटत असल्या तरी त्या आधीपासूनच ठरवलेल्या नसतात.

काहींना शलमोनाचे हे विधान आधीच्या त्याच्या विधानाच्या विरुद्ध वाटेल. त्याने म्हटले होते: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय व मृत्युसमय . . . असतो.” (उपदेशक ३:१, २) इथे शलमोन नशीबाबद्दल बोलत होता का? या शब्दांचे आपण बारकाईने परीक्षण करून पाहू या.

जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो असे शलमोन म्हणत नव्हता. उलट जीवनातील इतर गोष्टींप्रमाणे जन्म आणि मृत्यूचे सुद्धा चक्र सुरूच राहते. जीवनात चढ-उतार होत राहतात. शलमोन म्हणतो: “रडण्याचा समय व हसण्याचा समय असतो.” अशा प्रकारच्या सतत व अनपेक्षितपणे घडणाऱ्‍या घटना म्हणजे ‘भूतलावरील प्रत्येक कार्य’ जीवनात घडत असते, असे शलमोनाने म्हटले. (उपदेशक ३:१-८; ९:११, १२) त्यामुळे शलमोनाच्या म्हणण्याचे सार हेच होते की जीवनाच्या रोजच्या कार्यात आपण इतके गढून जाऊ नये की ज्यामुळे आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याचा विसर पडेल.—उपदेशक १२:१, १३.

आपल्या निर्माणकर्त्याचा जीवन व मृत्यूवर संपूर्ण अधिकार असला तरी तो आपले नशीब ठरवत नाही. देव आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा देतो असे बायबल सांगते. पण ही आशा आपण स्वीकारावी अशी सक्‍ती तो आपल्याला करत नाही. याउलट त्याचे वचन म्हणते: “ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.”—प्रकटीकरण २२:१७.

होय, आपल्या सर्वांची ते ‘जीवनाचे पाणी घेण्याची’ इच्छा असली पाहिजे. त्यामुळे, आपले भविष्य नशीबावर अवलंबून नाही. आपल्या निर्णयांचा, मनोवृत्तीचा व कार्यांचा आपल्या भविष्यावर परिणाम होतो. (w०९ ४/१)