व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू होतो त्याच्या पुनरुत्थानाची काही आशा आहे का?

मानवांचे जीवन गर्भधारणेपासून सुरू होते. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर मरण पावलेल्या व्यक्‍तींचे पुनरुत्थान करण्यास यहोवा समर्थ आहे. कारण, त्याला “सर्व काही शक्य आहे.” पण, आईच्या गर्भातच मृत्यू झालेल्या बाळाचे पुनरुत्थान यहोवा करेल की नाही याबद्दल बायबलमध्ये थेटपणे काहीही सांगितलेले नाही.—४/१५, पृष्ठे १२, १३.

• मुंग्या, रॉक बॅजर, टोळ आणि पाली यांचे परीक्षण केल्याने आपल्याला काय शिकता येईल?

या चार प्राण्यांमध्ये उपजत बुद्धी असल्याचे दिसून येते. त्यावरून देवाची बुद्धी किती अगम्य आहे याची प्रचिती येते. (नीति. ३०:२४-२८)—४/१५, पृष्ठे १६-१९.

• कधीकधी शांत राहणे योग्य आहे असे बायबल का म्हणते?

बायबलमधून दिसते की शांत राहणे हे आदराचे लक्षण आहे, त्यामुळे मनन करण्यास आपल्याला साहाय्य होते, तसेच शांत राहिल्याने आपली सुज्ञता व शहाणपणा दिसून येतो. (स्तो. ३७:७; ६३:६; नीति. ११:१२)—५/१५, पृष्ठे ३-५.

• यहूदाच्या किती राजांनी देवाच्या मंदिरासाठी उल्लेखनीय आवेश दाखवला?

दक्षिणेकडील यहूदाच्या राज्यावर १९ राजांनी राज्य केले होते. आणि त्यांपैकी चार राजांचा देवाच्या मंदिरासाठी असलेला आवेश उल्लेखनीय होता. आसा, यहोशाफाट, हिज्कीया आणि योशीया हे ते चार राजे होते.—६/१५, पृष्ठे ७-११.

• आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यात पृथ्वीवर असलेले सर्वच अभिषिक्‍त ख्रिश्‍चन सहभाग घेतात का?

नाही. देवाच्या आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आलेले सर्व जण विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाचा भाग आहेत, पण आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यावर नियमन मंडळ देखरेख करते.—६/१५, पृष्ठे २२-२४.

• लोकांप्रती येशूने दाखवलेल्या प्रेमामुळे तो धार्मिक पुढाऱ्‍यांपेक्षा वेगळा होता असे का म्हणता येईल?

लोकांप्रती प्रेम दाखवण्याऐवजी धार्मिक पुढारी त्यांना पाण्यात पाहत असत. शिवाय, देवावरही त्यांचे प्रेम नव्हते. येशूचे देवावर प्रेम होते आणि त्याला लोकांचा कळवळा आला. (मत्त. ९:३६) त्याला लोकांबद्दल प्रेम व सहानुभूती होती आणि तो त्यांच्याशी दयाळूपणे वागला.—७/१५, पृष्ठ १५.