व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘नेमलेला समय’ जवळ आला आहे

‘नेमलेला समय’ जवळ आला आहे

‘नेमलेला समय’ जवळ आला आहे

संदेष्टा हबक्कूकसारखीच येशूच्या शिष्यांनाही दुःखाचा अंत झालेला पाहण्याची उत्कंठा होती. देवाचे राज्य पृथ्वीवरील सर्व गोष्टी सुरळीत करेल हे समजल्यावर त्यांनी येशूला विचारले: “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या [राज्य अधिकारात] येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” (मत्तय २४:३) या प्रश्‍नाचे उत्तर देताना येशूने सांगितले की फक्‍त यहोवा देवालाच ती नियुक्‍त वेळ माहीत आहे जेव्हा त्याचे राज्य या संपूर्ण पृथ्वीवर सत्ता चालवेल. (मत्तय २४:३६; मार्क १३:३२) तरीही येशू व त्याच्या शिष्यांनी काही अशा घटनांबद्दल सांगितले होते ज्यांवरून तो नेमलेला समय जवळ असल्याचे कळते.—उजवीकडील चौकोन पाहा.

या गोष्टी आज सगळीकडेच दिसून येतात नाही का? जगभरात एक शैक्षणिक कार्य केले जाईल असेही येशूने भाकीत केले होते. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

आज नेमके तेच घडत आहे. यहोवाचे साक्षीदार आज हे काम करत आहेत. जवळ जवळ २३६ देशात ७० लाखांपेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार लोकांना देवाचे राज्य काय साध्य करील ते सांगत आहेत. दुःख व वेदना काढून टाकण्याची इच्छा असणाऱ्‍या देवाच्या धार्मिक स्तरांनुसार आपल्या जीवनात बदल करण्यासाठी ते लोकांना मदतही करत आहेत. देवाच्या राज्याबद्दल शिकत राहा आणि दुःख नसलेल्या जगात कायम जगण्याची आशा मिळवा. (w०९-E १२/०१)

[८ पानांवरील चौकट]

आपण शेवटल्या दिवसात जगत आहोत हे दाखवणारी बायबलमधील वचने

मत्तय २४:६, ७; प्रकटीकरण ६:४

• मोठ्या प्रमाणावर युद्धे

मत्तय २४:७; मार्क १३:८

• मोठे भूकंप

• अन्‍नाचा तुटवडा

लूक २१:११; प्रकटीकरण ६:८

• साथींचे रोग

मत्तय २४:१२

• अनीती वाढणे

• प्रेम आटणे

प्रकटीकरण ११:१८

• पृथ्वीची नासाडी

२ तीमथ्य ३:२

• पैशाची हाव

• पालकांची आज्ञा न मानणे

• अत्यंत स्वार्थीपणा

२ तीमथ्य ३:३

• ममताहीन

• शांतताद्वेषी

• समाजातील प्रत्येक स्तरात असंयम

• चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणे

२ तीमथ्य ३:४

• देवावर प्रेम करण्यापेक्षा सुख-विलासाची आवड धरणारे

२ तीमथ्य ३:५

• ख्रिस्ती असल्याचा दांभिकपणे दावा करणे

मत्तय २४:५, ११; मार्क १३:६

• अनेक खोटे संदेष्टे उठतील

मत्तय २४:९; लूक २१:१२

• खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ

मत्तय २४:३९

• बायबलमधील इशाऱ्‍याकडे लोक लक्ष देणार नाहीत

[८ पानांवरील चित्र]

जगभरात यहोवाचे साक्षीदार इतरांना देवाच्या राज्याबद्दल शिकवत आहेत