व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• पेत्र समुद्रात बुडू लागला तेव्हा येशूने त्याला वाचवले, यावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

एखाद्या बांधवात विश्‍वासाचा अभाव असल्याचे आढळले तर आपण मदतीचा हात देऊन त्याचा विश्‍वास दृढ करण्यास त्याला साहाय्य करू शकतो.—९/१५, पृष्ठ ८.

• आपली सुटका करण्यासाठी यहोवाला कोणती किंमत मोजावी लागली?

अब्राहामाने आपल्या पुत्राला अर्पण करण्याची तयारी दाखवली, यावरून यहोवा भविष्यात किती मोठा त्याग करणार होता हे दिसून आले. आपल्या पुत्राला छळले गेले, त्याची थट्टा करण्यात आली आणि शेवटी त्याला गुन्हेगार ठरवून जिवे मारण्यात आले हे पाहून यहोवाला नक्कीच खूप दुःख झाले असेल, पण त्याने ते सर्व सहन केले.—९/१५, पृष्ठे २८-२९.

नीतिसूत्रे २४:२७ या वचनातून ‘घर बांधण्याविषयी’ कोणता धडा शिकायला मिळतो?

लग्नाचा विचार करणाऱ्‍या मनुष्याने लग्नासोबत येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पेलण्यासाठी आधी पुरेशी तयारी केली पाहिजे. यात कुटुंबाचे पालनपोषण करण्यासोबतच कुटुंबात आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत पुढाकार घेण्यासाठी स्वतःला तयार करणे देखील समाविष्ट आहे.—१०/१५, पृष्ठ १२.

• सौजन्याच्या बाबतीत यहोवा आणि येशू यांनी कशा प्रकारे उत्तम उदाहरण मांडले?

यहोवा सबंध विश्‍वाचा सार्वभौम अधिपती असूनही तो मानवांशी अतिशय प्रेमळपणे व आदराने वागतो. बायबलच्या मूळ लेखांनुसार यहोवा देवाने अब्राहाम आणि मोशे या दोघांशीही बोलताना “कृपया” या अर्थाचा एक इब्री शब्द वापरला होता. (उत्प. १३:१४; निर्ग. ४:६) तसेच, देव मानवांचे ऐकून घेण्यास तयार असतो. (उत्प. १८:२३-३२) येशूने देखील अशीच मनोवृत्ती दाखवली. लोकांना मदत करण्यास तो नेहमी उत्सुक होता आणि बरेचदा तर त्याने लोकांना नावाने संबोधून त्यांच्याबद्दल आदर दाखवला.—११/१५, पृष्ठ २५.