व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आताच समय अनुकूल आहे”

“आताच समय अनुकूल आहे”

“आताच समय अनुकूल आहे”

“पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.”—२ करिंथ. ६:२.

१. आपण केलेच पाहिजे असे सगळ्यात महत्त्वाचे काम कोणते हे ओळखणे का जरुरीचे आहे?

 “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.” (उप. ३:१) कोणतेही चांगले काम करण्यासाठी, मग ते शेतकाम असो, प्रवास असो, व्यापार असो अथवा इतरांशी बोलणे असो त्यासाठी सगळ्यात उचित वेळ कोणती हे ओळखणे किती महत्त्वाचे आहे याविषयी शलमोन लिहित होता. पण त्यासोबतच, आपण केलेच पाहिजे असे सगळ्यात महत्त्वाचे काम कोणते हेदेखील ओळखणे जरुरीचे आहे. दुसऱ्‍या शब्दांत, जीवनात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो हे आपल्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट असले पाहिजे.

२. येशू पृथ्वीवर असताना त्याला त्याच्या काळाची अचूक जाण होती हे आपण कशावरून म्हणू शकतो?

आपण कोणत्या काळात जगत आहोत व आपण काय केले पाहिजे याची पृथ्वीवर असताना येशूला अचूक जाण होती. जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे ही गोष्ट त्याच्या नजरेसमोर अगदी स्पष्ट होती. त्यामुळे, त्याला याची जाणीव होती, की दीर्घ काळापासून वाट पाहत असलेल्या मशीहासंबंधित अनेक भविष्यवाण्यांच्या पूर्णतेची वेळ जवळ आली आहे. (१ पेत्र १:११; प्रकटी. १९:१०) प्रतिज्ञात मशीहा म्हणून लोकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी त्याला बरेच काम करायचे होते. त्याला राज्याच्या सत्याविषयी पूर्णपणे साक्ष द्यायची होती आणि भविष्यात देवाच्या राज्यात त्याच्यासोबत राज्य करणाऱ्‍या सहवारसांना गोळा करायचे होते. तसेच, जी ख्रिस्ती मंडळी पुढे प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य पृथ्वीच्या शेवटापर्यंत नेणार होती तिचा पायाही त्याला घालायचा होता.—मार्क १:१५.

३. काळाच्या जाणिवेने येशूच्या कार्यावर कोणता प्रभाव पाडला?

काळाच्या या जाणिवेने येशूच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला. त्यामुळे त्याला देवाची इच्छा आवेशाने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” (लूक १०:२; मला. ४:५, ६) येशूने आधी १२ आणि नंतर ७० शिष्यांना निवडले, त्यांना विशिष्ट सूचना दिल्या आणि या उत्तेजनात्मक संदेशाचा प्रचार करण्यास पाठवले: “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” खुद्द येशूविषयी आपण असे वाचतो: “[त्याने] आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरात शिकवावयास व उपदेश करावयास गेला.”—मत्त. १०:५-७; ११:१; लूक १०:१.

४. पौलाने कोणत्या मार्गाने येशू ख्रिस्ताचे अनुकरण केले?

येशूने आवेश आणि भक्‍ती याबाबतीत आपल्या अनुयायांसमोर एक परिपूर्ण आदर्श मांडला. याच गोष्टीकडे प्रेषित पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांचे लक्ष वेधले. त्याने त्यांना आर्जवले: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथ. ११:१) पौलाने कोणत्या मार्गाने ख्रिस्ताचे अनुकरण केले? प्रामुख्याने, सुवार्तेचा प्रचार करण्यात कोणतीही कसूर न करण्याद्वारे. पौलाने मंडळ्यांना लिहिलेल्या पत्रांत आपल्याला असे वाक्यांश वाचायला मिळतात: “आस्थेविषयी मंद असू नका,” “प्रभूची सेवा करा,” “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” व ‘जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.’ (रोम. १२:११; १ करिंथ. १५:५८; कलस्सै. ३:२३) पौल दिमिष्काच्या वाटेवरून जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दिलेले दर्शन तो केव्हाही विसरला नाही. तसेच, “परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे,” असे पौलाविषयी येशूने म्हटलेले शब्द, शिष्य हनन्याने पौलाला सांगितले असावेत. हे शब्ददेखील पौल कधीच विसरला नसेल.—प्रे. कृत्ये ९:१५; रोम. १:१, ५; गलती. १:१६.

“आताच समय अनुकूल आहे”

५. कोणत्या गोष्टीमुळे पौलाला आपले सेवाकार्य आवेशाने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली?

प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक वाचताना एक गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे, पौलाने आपले सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि आवेश. (प्रे. कृत्ये १३:९, १०; १७:१६, १७; १८:५) पौल ज्या काळात जगत होता त्या काळाचे महत्त्व त्याने ओळखले होते. त्याने म्हटले: “पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.” (२ करिंथ. ६:२) बॅबिलोनमधील बंदीवानांसाठी सा.यु.पू. ५३७ चा काळ, आपल्या मायदेशी परतण्यास अनुकूल होता. (यश. ४९:८, ९) पण, “आताच समय अनुकूल आहे,” असे पौलाने म्हटले तेव्हा तो कोणत्या गोष्टीविषयी बोलत होता? मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेतल्यास तो कशाविषयी बोलत होता हे आपण समजू शकतो.

६, ७. आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कोणता मोठा बहुमान बहाल करण्यात आला आहे, आणि त्यांच्यासोबतीने कोण कार्य करत आहेत?

पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात, त्याला व त्याच्या सहविश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना बहाल केलेल्या एका मोठ्या बहुमानाचा उल्लेख केला. (२ करिंथकर ५:१८-२० वाचा.) त्यांना एका खास उद्देशासाठी बोलावण्यात आले होते असे त्याने म्हटले. त्यांना “समेटाची सेवा” करण्यासाठी म्हणजे “देवाबरोबर समेट” करण्याची लोकांना विनंती करण्यासाठी बोलावण्यात आले होते. “देवाबरोबर समेट” करणे याचा अर्थ, पुन्हा एकदा देवाबरोबर मैत्रीचे किंवा सलोख्याचे नातेसंबंध जोडणे.

एदेन बागेतील बंडाळीनंतर संपूर्ण मानवजात यहोवापासून दुरावली आहे. (रोम. ३:१०, २३) परिणामस्वरूप, सर्वसामान्य मानवजात दुःख आणि मृत्यूकडे नेणाऱ्‍या आध्यात्मिक अंधारात बुडाली आहे. पौलाने लिहिले: “आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोम. ८:२२) असे असले तरी देवाने, लोकांना आर्जवण्यासाठी, अक्षरशः “विनंती” करण्यासाठी पावले उचलली आहेत. लोकांना विनंती करण्याचे हे कार्य, त्या काळी पौलावर व त्याच्या सहविश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर सोपवण्यात आले होते. तो ‘अनुकूल समय,’ येशूवर विश्‍वास प्रदर्शित करणाऱ्‍यांसाठी “तारणाचा दिवस” ठरणार होता. आजही सर्व अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांच्यासह कार्य करणारे त्यांचे साथीदार असलेली “दुसरी मेंढरे” सध्या उपलब्ध असलेल्या ‘अनुकूल समयाचा’ फायदा घेण्याचे आमंत्रण लोकांना देत आहेत.—योहा. १०:१६.

८. देवाबरोबर समेट करण्याचे आमंत्रण आणखी कोणत्या गोष्टीमुळे अधिकच उल्लेखनीय ठरते?

देवाबरोबर समेट करण्याचे हे आमंत्रण आणखी एका गोष्टीमुळे अधिकच उल्लेखनीय ठरते. ते म्हणजे, मानवांनी स्वतः एदेन बागेत बंडाळी करून देवासोबतचा आपला नातेसंबंध तोडून टाकला असला, तरी तो पुन्हा जोडण्यासाठी खुद्द देवानेच पुढाकार घेतला. (१ योहा. ४:१०, १९) त्याने काय केले? याचे उत्तर पौल देतो: “जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले.”—२ करिंथ. ५:१९; यश. ५५:६.

९. देवाने दाखवलेल्या दयेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी पौलाने काय केले?

यहोवाने खंडणी बलिदानाची तरतूद करण्याद्वारे, खंडणीवर विश्‍वास प्रदर्शित करणाऱ्‍यांच्या पातकांची क्षमा होणे व त्याच्यासोबत पुन्हा एकदा मैत्रीचा किंवा सलोख्याचा नातेसंबंध जोडणे शक्य केले. याशिवाय, वेळ आहे तोपर्यंत सर्व लोकांना त्याच्यासोबत शांती प्रस्थापित करण्याचा आर्जव करण्यासाठी त्याने आपले प्रतिनिधी पाठवले. (१ तीमथ्य २:३-६ वाचा.) देवाची इच्छा काय आहे आणि आपण कोणत्या काळात जगत आहोत हे ओळखून पौलाने “समेटाची सेवा” करण्यात स्वतःला झोकून दिले. आजही यहोवाची तीच इच्छा आहे. आजसुद्धा तो त्याच्यापासून दुरावलेल्या मानवजातीला त्याच्याशी समेट करण्याचे आमंत्रण देतो. “आताच समय अनुकूल आहे” व “आताच तारणाचा दिवस आहे” हे पौलाचे शब्द आपल्या काळालादेखील लागू होतात. खरोखर, यहोवा किती दयाळू व कृपाळू देव आहे!—निर्ग. ३४:६, ७.

देवाची कृपा “व्यर्थ होऊ देऊ” नका

१०. गतकाळातील व आधुनिक काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी ‘तारणाच्या दिवसाचा’ काय अर्थ होतो?

१० देवाने त्याच्यासोबत समेट करण्याचे आमंत्रण देऊन दाखवलेल्या कृपेचा सर्वात प्रथम लाभ झाला तो ‘ख्रिस्ताच्या ठायी असलेल्यांना.’ (२ करिंथ. ५:१७, १८) त्यांच्यासाठी “तारणाचा दिवस” सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुरू झाला. तेव्हापासून, अशांवर “समेटाचे वचन” घोषित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आजही अभिषिक्‍त शेषजन ही “समेटाची सेवा” करत आहेत. त्यांना माहीत आहे, की प्रेषित योहानाने पाहिलेल्या भविष्यसूचक दृष्टान्तातील चार देवदूत, ‘पृथ्वीवरून वारा वाहू नये व कोणत्याहि झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत आहेत.’ त्यावरून, “तारणाचा दिवस” व ‘अनुकूल समय’ अद्यापही चालू आहे हे दिसून येते. (प्रकटी. ७:१-३) याच कारणामुळे, २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून अभिषिक्‍त शेषजन पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मोठ्या आवेशाने “समेटाची सेवा” करत आले आहेत.

११, १२. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना काळाची जाणीव होती हे त्यांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला कसे दाखवून दिले? (पृष्ठ १५ वरील चित्र पाहा.)

११ उदाहरणार्थ, जेहोवाज व्हिटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंग्डम या पुस्तकात सांगितल्यानुसार, २० व्या शतकाच्या सुरुवातीला “सी. टी. रस्सल यांचा व त्यांच्या साथीदारांचा असा ठाम विश्‍वास होता की ते कापणीच्या काळात जगत आहेत व खोट्या धर्मातून मुक्‍त करणाऱ्‍या सत्याबद्दल लोकांना सांगणे आवश्‍यक आहे.” याबद्दल त्यांनी काय केले? आपण कापणीच्या काळात किंवा ‘अनुकूल समयात’ जगत आहोत हे ओळखून या बांधवांनी लोकांना केवळ एखाद्या प्रार्थना सभेला येण्याचे आमंत्रण देण्यात समाधान मानले नाही. कारण हेच तर ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक कितीतरी काळापासून करत होते. त्याऐवजी, ते अभिषिक्‍त ख्रिस्ती सुवार्तेचा प्रसार करण्याचे इतर नवनवीन व्यावहारिक मार्ग शोधू लागले. त्यांपैकी एक म्हणजे, आपल्या कार्याचा आणखी विस्तार करण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे उपयोग केला.

१२ राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी, आवेशी सेवकांच्या या लहान गटाने हस्तपत्रिका, पॅम्फलेट्‌स, मासिके व पुस्तके यांचा उपयोग केला. त्यांनी अनेक उपदेश व लेख लिहिले आणि हजारो वृत्तपत्रांमधून ते प्रकाशित केले. याशिवाय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेडिओवरून त्यांनी आध्यात्मिक कार्यक्रम प्रसारित केले. चित्रपट उद्योगाने जनतेसाठी आवाजासहित चित्रपट प्रदर्शित करण्याच्या कितीतरी आधी त्यांनी चलचित्रांची निर्मिती केली व ध्वनिमुद्रणाशी सांगड घालून त्यांचा उपयोग केला. त्यांनी दाखवलेल्या या ज्वलंत आवेशाचा काय परिणाम झाला? ‘देवाबरोबर समेट करा,’ या संदेशाला आज सुमारे ७० लाख लोकांनी प्रतिसाद दिला आहे व तोच संदेश ते आता इतरांना घोषित करत आहेत. खरोखर, यहोवाच्या त्या सुरुवातीच्या सेवकांसमोर अनेक अडथळे आले, तरी आवेशाच्या बाबतीत त्यांनी किती उत्तम उदाहरण मांडले!

१३. देवाच्या कोणत्या उद्देशाकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे?

१३ “आताच समय अनुकूल आहे,” असे जे पौलाने म्हटले ते आजही लागू होते. आपण यहोवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे आणि आपल्याला समेटाचा संदेश ऐकण्याची व तो स्वीकारण्याची संधी देण्यात आली आहे याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. पण, तेवढ्यावरच समाधान न मानता आपण पौलाच्या पुढील शब्दांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे: ‘आम्ही विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.’ (२ करिंथ. ६:१) देवाच्या कृपेचा उद्देश, ख्रिस्ताच्या द्वारे “स्वतःबरोबर जगाचा समेट” करणे हा आहे.—२ करिंथ. ५:१९.

१४. आज अनेक देशांमध्ये काय पाहायला मिळते?

१४ सैतानाने बहुतेक लोकांची मने आंधळी केली असल्यामुळे, ते अजूनही देवापासून दुरावलेले आहेत व देवाच्या कृपेचा उद्देश काय आहे याबाबतीत ते अज्ञानी आहेत. (२ करिंथ. ४:३, ४; १ योहा. ५:१९) पण, दिवसेंदिवस ढासळत चाललेली जगाची परिस्थिती लोक पाहतात आणि आज मानवजात देवापासून दुरावलेली असल्यामुळे जगात इतकी दुष्टाई व दुःख आहे हे आपण लोकांना सांगतो तेव्हा ते सकारात्मक प्रतिसाद देतात. ज्या देशांतील बहुतेक लोक पूर्वी आपल्या प्रचार कार्याला थंड प्रतिसाद देत होते तेदेखील आता सुवार्तेचा संदेश स्वीकारत आहेत व देवाबरोबर समेट करण्यास पावले उचलत आहेत. तर मग, ‘देवाबरोबर समेट करा’ या विनंतीची पूर्वीपेक्षा अधिक आवेशाने घोषणा करण्याची हीच वेळ आहे याची जाणीव आपण बाळगतो का?

१५. लोकांना केवळ बरे वाटेल असा संदेश सांगण्याऐवजी, आपण सर्व लोकांना कोणता संदेश सांगितला पाहिजे?

१५ लोक देवाकडे वळाले तर तो त्यांच्या समस्या सोडवण्यास त्यांना मदत करेल व त्यांना बरे वाटेल इतकेच आपण लोकांना सांगत नाही. चर्चला जाणारे अनेक जण याच कारणांसाठी चर्चला जातात व चर्चेसदेखील लोकांची ही इच्छा तृप्त करण्यास उत्सुक असतात. (२ तीम. ४:३, ४) तो आपल्या सेवाकार्याचा उद्देश नाही. यहोवाचे आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो ख्रिस्तामार्फत आपली पातके क्षमा करण्यास उत्सुक आहे ही सुवार्ता आपण लोकांना सांगतो. त्यामुळे, देवापासून दुरावलेल्या लोकांना त्याच्याशी समेट करणे शक्य होते. (रोम. ५:१०; ८:३२) पण, ‘अनुकूल समय’ लवकरच संपुष्टात येणार आहे.

“आत्म्यात उत्सुक असा”

१६. कोणत्या गोष्टीने पौलाला धैर्य व आवेश दाखवण्यास मदत केली?

१६ तर मग, खऱ्‍या उपासनेसाठी आपण आवेश कसा विकसित करू शकतो व तो कसा टिकवून ठेवू शकतो? काही जण स्वभावाने बुजरे असतील किंवा फारसे बोलके नसतील. अशांना आपल्या भावना व्यक्‍त करणे व लोकांमध्ये मिसळणे कठीण जाऊ शकते. पण, आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की भावनांचे किंवा उत्साहाचे उघडपणे प्रदर्शन करणे म्हणजे आवेश दाखवणे नव्हे; किंवा आवेश हा एखाद्याच्या व्यक्‍तिमत्त्वावरसुद्धा अवलंबून नसतो. आवेश कसा विकसित करावा व तो कसा टिकवून ठेवावा हे पौलाने त्याच्या सहविश्‍वासू बांधवांना आर्जव केला तेव्हा दाखवून दिले. त्याने म्हटले: “आत्म्यात उत्सुक असा.” (रोम. १२:११) यहोवाच्या आत्म्याने प्रेषित पौलाला प्रचाराच्या कार्यात धैर्य व चिकाटी दाखवण्यास खूप मदत केली. येशूने त्याला पहिल्यांदा दर्शन दिले तेव्हापासून ते रोममध्ये त्याला शेवटच्या वेळी तुरुंगात डांबण्यात आले व त्याने हुतात्मिक मरण पत्करले त्या ३० पेक्षा अधिक वर्षांच्या काळादरम्यान पौलाचा आवेश किंचितसुद्धा मंदावला नाही. पौलाने मार्गदर्शनासाठी नेहमी देवाकडे डोळे लावले आणि देवाने आपल्या आत्म्याद्वारे त्याला बळ दिले. पौलाने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पै. ४:१३) त्याच्या या उदाहरणावरून आपण बरेच काही शिकून लाभ मिळवू शकतो!

१७. आपण “आत्म्यात उत्सुक” कसे असू शकतो?

१७ “उत्सुक” असे भाषांतरित केलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा अर्थ “उकळणे” असा होतो. (किंग्डम इंटरलिनियर भाषांतर) ज्याप्रमाणे किटलीतील पाणी उकळत ठेवण्यासाठी सतत आग तेवत ठेवावी लागते, त्याचप्रमाणे ‘आत्म्यात उत्सुक असण्यासाठी’ आपल्याला सतत देवाच्या आत्म्याची गरज आहे. तो मिळवण्याचा मार्ग म्हणजे, आपल्याला आध्यात्मिक रीत्या सुदृढ करण्यासाठी यहोवा पुरवत असलेल्या सर्व तरतुदींचा फायदा घेणे. याचा अर्थ, आपली कौटुंबिक व मंडळीची उपासना गांभीर्याने घेणे. दुसऱ्‍या शब्दांत, नियमितपणे वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यास करणे, प्रार्थना करणे आणि आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींसह सभांमध्ये एकत्र येणे. असे केल्यामुळे ‘उकळत राहण्यासाठी’ आवश्‍यक असलेली “आग” आपल्याला मिळत राहील व आपल्याला नेहमी ‘आत्म्यात उत्सुक’ राहणे शक्य होईल.प्रेषितांची कृत्ये ४:२०; १८:२५ वाचा.

१८. समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपले लक्ष कोणत्या उद्दिष्टावर केंद्रित असले पाहिजे?

१८ एका समर्पित व्यक्‍तीचे लक्ष पूर्णपणे तिच्या उद्दिष्टावर केंद्रित असते आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यापासून ती सहजासहजी विचलित होत नाही किंवा खचून जात नाही. समर्पित ख्रिस्ती या नात्याने येशूप्रमाणेच आपलेही उद्दिष्ट देवाची इच्छा पूर्ण करणे हेच आहे. (इब्री १०:७) आज यहोवाची अशी इच्छा आहे की शक्य तितक्या अधिक लोकांनी त्याच्याशी समेट करावा. तेव्हा, येशू व पौल यांचे अनुकरण करून या सर्वात महत्त्वाच्या व तातडीच्या कामात आपण स्वतःला झोकून देऊ या.

तुम्हाला आठवते का?

• पौलावर व इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर कोणती “समेटाची सेवा” सोपवण्यात आली होती?

• अभिषिक्‍त शेषजनांनी कशा रीतीने ‘अनुकूल समयाचा’ चांगल्या प्रकारे उपयोग केला आहे?

• ख्रिस्ती सेवक “आत्म्यात उत्सुक” कसे असू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्र]

प्रभू येशू ख्रिस्ताने पौलाला दिलेले दर्शन तो केव्हाही विसरला नाही