व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाकडून का शिकावे?

देवाकडून का शिकावे?

देवाच्या वचनातून शिका

देवाकडून का शिकावे?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. देवाकडून का शिकावे?

लोकांचे भले होईल, अशा एका परिस्थितीविषयीची चांगली बातमी देवाकडे आहे. ही बातमी तो आपल्याला बायबलद्वारे सांगतो. बायबल हे, आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याकडून मिळालेल्या एका पत्राप्रमाणे आहे.—यिर्मया २९:११ वाचा.

२. ही चांगली बातमी काय आहे?

मानवांना चांगल्या सरकारची गरज आहे. आजपर्यंत कोणताही शासक मानवांना हिंसाचार, अन्याय, रोग किंवा मृत्यू यांपासून मुक्‍त करू शकला नाही. पण, देव एका चांगल्या सरकारद्वारे, दुःखी करणाऱ्‍या सर्व गोष्टींपासून मानवांना मुक्‍त करणार आहे. (दानीएल २:४४ वाचा.) ही ती चांगली बातमी आहे.

३. देवाकडून शिकणे गरजेचे का आहे?

लवकरच, देव या पृथ्वीवरून अशा लोकांचा नाश करणार आहे जे दुःखाला कारणीभूत आहेत. असे होईपर्यंत, तो लाखो नम्र लोकांना प्रेमावर टिकून असलेल्या जीवनाच्या योग्य मार्गाचा आनंद कसा लुटावा हे शिकवत आहे. आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या समस्यांचा सामना कसा करावा, खरा आनंद कसा मिळवावा आणि देवाला संतुष्ट कसे करावे, याविषयी लोक देवाच्या वचनाद्वारे शिकत आहेत.—सफन्या २:३ वाचा.

४. बायबलचा लेखक कोण आहे?

बायबल हे ६६ लहान पुस्तकांनी बनलेले आहे. ही पुस्तके ४० लोकांनी लिहिली. सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी बायबलची पहिली पाच पुस्तके मोशेने लिहिली. आणि शेवटचे पुस्तक १,९०० वर्षांपूर्वी प्रेषित योहानाने लिहिले. पण बायबल लिहिणाऱ्‍यांनी स्वतःचे विचार न लिहिता देवाचे विचार लिहिले. म्हणून, देवच बायबलचा लेखक आहे, असे आपण म्हणू शकतो.—२ तीमथ्य ३:१६; २ पेत्र १:२१ वाचा.

आपल्याला माहीत आहे की बायबल हे देवाकडून आहे कारण भविष्याबद्दल त्यात अगदी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. कोणताही मानव असे करू शकत नाही. (यशया ४६:९, १०) त्याचबरोबर, बायबलमध्ये आपल्याला देवाच्या गुणांविषयी सांगण्यात आले आहे. बायबलमध्ये लोकांचे जीवन बदलण्याची शक्‍ती आहे; यामुळे त्यांचे जीवन सुधारले आहे. त्यामुळे, लाखो लोकांना खात्री होते, की बायबलच देवाचे वचन आहे.—यहोशवा २३:१४; १ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.

५. तुम्ही बायबल कसे समजू शकता?

देवाच्या वचनाचा शिक्षक म्हणून येशू नावाजलेला होता. येशू ज्या लोकांशी बोलला त्यापैकी बहुतेक लोक बायबलशी परिचित होते तरीही त्यांना बायबल समजण्यासाठी मदतीची गरज होती. त्यांना मदत करण्यासाठी येशूने एका मागोमाग एक अशा बायबल वचनांचा उपयोग केला आणि त्यांना ‘शास्त्राचा अर्थ समजावला.’ “देवाच्या वचनातून शिका” या सदरातून हेच केले जाणार आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी हे सदर तयार करण्यात आले आहे.—लूक २४:२७, ४५ वाचा.

अशा फार कमी गोष्टी असतात ज्या रोचक असतात. त्यांपैकीची एक गोष्ट, जीवनाच्या उद्देशाबद्दल देवाकडून शिकणे ही आहे. पण काही लोकांना, तुम्ही बायबल वाचलेले आवडणार नाही. तेव्हा निराश होऊ नका. तुमच्या अनंत जीवनाची आशा ही तुम्ही देवाला जाणून घेण्यावर अवलंबून आहे.—मत्तय ५:१०-१२; योहान १७:३ वाचा. (w११-E ०१/०१)

जास्त माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय २ पाहा.