व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निराशादायक परिस्थितीतही तो टिकून राहिला

निराशादायक परिस्थितीतही तो टिकून राहिला

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

निराशादायक परिस्थितीतही तो टिकून राहिला

शिलोतील प्रत्येक घरात चाललेला शोक शमुवेलाला जाणवत होता. असे वाटत होते की जणू काय संपूर्ण शहरच शोकात बुडाले होते. अनेक घरांत स्त्रिया व लहान मुले रडत होती कारण त्यांना माहीत झाले होते की त्यांच्यातील काहींचे वडील, पती, मुले, भाऊ परत घरी येणार नव्हते. अशा किती घरात हा शोक चालला होता? आपल्याला नक्की माहीत नाही, पण इतके माहीत आहे की, पलिष्ट्यांशी युद्ध करताना ४,००० इस्राएली सैनिक मरण पावले होते आणि ते होते न होते तोच आणखी या युद्धात ३०,००० सैनिक मरण पावले.—१ शमुवेल ४:१, २, १०.

ही तर फक्‍त दुःखद घटनांच्या मालिकेतील एक घटना होती. हफनी व फिनहास अशी नावे असलेले महायाजक एलीचे दोन पुत्र अतिशय वाईट होते. ते कराराचा पवित्र कोश घेऊन शिलोतून बाहेर नेतात. हा कोश सहसा निवासमंडपाच्या पवित्र भागात ठेवला जायचा. निवासमंडप हे तंबूच्या आकाराचे मंदिर होते. आणि कराराचा कोश एक पवित्र पेटी होती जे देवाच्या उपस्थितीचे प्रतीक होते. ही पेटी जर आपण रणभूमीत नेली तर लढाईत कदाचित आपण विजयी होऊ असा मूर्ख विचार हे लोक करत होते. पण पलिष्ट्यांनी तो कोश काबीज केला आणि हफनी व फिनहास यांना ठार मारले.—१ शमुवेल ४:३-११.

शिलो येथील निवासमंडपात कराराचा कोश कित्येक शतकांपासून होता. पण आता तो तेथे नव्हता. ही बातमी जेव्हा ९८ वर्षीय एली ऐकतो तेव्हा त्याला इतका धक्का बसतो की तो त्याच्या खुर्चीवरून मागे पडून जागच्या जागीच मरण पावतो. त्याची सून, त्याच दिवशी विधवा होते आणि अकाली प्रसूती झाल्यामुळे तीही त्याच दिवशी मरण पावते. मरण्यापूर्वी ती म्हणते: “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” खरेच, शिलो पुन्हा पहिल्यासारखे होणार नव्हते.—१ शमुवेल ४:१२-२२.

या एका पाठोपाठ एक घडलेल्या धक्कादायक घटनांतून शमुवेल कसा काय सावरणार होता? त्याचा विश्‍वास अधिक मजबूत करून तो यहोवाचे संरक्षण व त्याची मर्जी गमावलेल्या लोकांना मदत करू शकला का? आज आपल्या सर्वांना कधीकधी हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते, आपला विश्‍वास कमकुवत करू शकणाऱ्‍या दुःखद घटना आपल्याही जीवनात घडू शकतात. तेव्हा, शमुवेलाकडून आपण काय शिकू शकतो ते पाहू या.

त्याने “नीतिमत्व आचरले”

बायबलमधील या अहवालात आता, शमुवेलाऐवजी पवित्र कोशाचे काय झाले ते सांगण्यात आले आहे. पलिष्ट्यांनी ते पळवून नेल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांना ते परत आणून देणे भागच पडले. आणि मग पुन्हा एकदा जेव्हा शमुवेलाविषयीचे वर्णन सुरू होते त्या मध्यंतरात २० वर्ष उलटली आहेत. (१ शमुवेल ७:२) या २० वर्षांत त्याने काय केले असावे? बायबल आपल्याला त्याबद्दल सांगते.

हा काळ सुरू होण्याआधी, शमुवेल देवाचा संदेश “इस्राएल लोकांस सांगू लागला.” (१ शमुवेल ३:२१, सुबोध भाषांतर) या अहवालातून कळते, की हा काळ समाप्त झाल्यानंतर, शमुवेलाने इस्राएलातील तीन शहरांना भेट देण्याचा रिवाजच बनवला होता. दर वर्षी तो एकेका विभागाला भेट देऊन काही प्रश्‍न, वाद असतील तर ते सोडवत असे. आणि त्यानंतर रामा येथील आपल्या घरी तो परतत असे. (१ शमुवेल ७:१५-१७) शमुवेलाने स्वतःला व्यस्त ठेवले होते आणि २० वर्षांच्या त्या मध्यंतराच्या काळात त्याच्याजवळ भरपूर काम होते.

एलीच्या पुत्रांच्या अनैतिक व भ्रष्ट आचरणामुळे लोकांचा यहोवावरील विश्‍वास उडाला होता. यामुळे असे दिसते, की पुष्कळ लोक मूर्तिपूजेकडे वळाले होते. लोकांना पुन्हा यहोवाकडे वळवण्यासाठी शमुवेलाने २० वर्षे खूप कष्ट घेतले होते. त्यानंतर त्याने लोकांना असा संदेश दिला: “तुम्ही मनःपूर्वक परमेश्‍वराकडे वळला आहा तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ यांस दूर करा, आणि परमेश्‍वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातातून सोडवील.”—१ शमुवेल ७:३.

‘पलिष्ट्यांचा हात’ भारी होत चालला होता. दुसऱ्‍या शब्दांत, इस्राएली सैन्याला त्यांनी पराभूत केले होते. देवाच्या लोकांवर जाच करण्याची आपल्याला मोकळीक आहे, असेच त्यांना वाटू लागले होते. पण शमुवेलाने इस्राएलांना खात्री दिली, की जर ते यहोवाकडे पुन्हा वळाले तर परिस्थिती बदलू शकते. लोक याला तयार झाले का? होय. त्यांनी सर्व मूर्त्या फेकून दिल्या आणि “परमेश्‍वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना” ते करू लागले. हे पाहून शमुवेलाला खूप आनंद झाला. त्याने जेरुसलेमच्या उत्तरेकडील डोंगराळ भागातील मिस्पा नावाच्या एका शहरात एक सभा भरवली. तेथे जमल्यावर इस्राएली लोकांनी उपवास केला आणि यहोवाविरुद्ध मूर्तिपूजा करून केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला.—१ शमुवेल ७:४-६.

पण, पलिष्ट्यांना जेव्हा इस्राएली लोक एकत्र झाल्याचे कळले तेव्हा त्यांना इस्राएलांवर मात करण्याची हातची संधी चालून आली आहे असेच वाटले. यहोवाच्या उपासकांचा चुराडा करण्यासाठी त्यांनी लगेच मिस्पा येथे त्यांचे सैन्य पाठवले. इस्राएलांना पलिष्ट्यांच्या या सैन्याची वार्ता मिळाली. ते गर्भगळीत झाले, त्यांनी शमुवेलाला प्रार्थना करायला सांगितले. त्याने त्यांच्या वतीने प्रार्थना केली आणि यहोवाला एक अर्पणही केले. हा पवित्र सोहळा चालू असताना पलिष्टी सैन्य मिस्पात पोंहचले. यहोवाने शमुवेलाची प्रार्थना ऐकली. “प्रचंड गर्जना करून” त्याने शमुवेलाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. अशा प्रकारे पलिष्ट्यांविरुद्धचा त्याचा क्रोध त्याने व्यक्‍त केला.—१ शमुवेल ७:७-१०.

विजांचा कडकडाट होतो तेव्हा लहान मुले जशी घाबरून त्यांच्या आयांच्या मागे जाऊन लपतात तसे हे पलिष्टी सैन्य घाबरले का? नाही. हे सैनिक अतिशय कणखर व धीट होते. पण त्यांनी आता ऐकलेली गर्जना वेगळी होती. केवळ कानठळ्या बसतील अशी ही “प्रचंड गर्जना” होती का? शुभ्र निळ्या आकाशातून ही गर्जना झाली होती का, की तो डोंगरांमध्ये झालेल्या आवाजाचा निनाद होता? याविषयी आपल्याला काही माहीत नाही, पण या गर्जनेमुळे मात्र पलिष्ट्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांचा इतका गोंधळ उडाला, की सावजाच्या शोधात आलेले ते स्वतःच सावज बनले. मिस्पाच्या गल्ली-बोळातून इस्राएली सैन्य त्यांच्यावर तुटून पडले, त्यांनी त्यांचा पराभव केला आणि जेरूसलेमच्या नैर्ऋत्यापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावले.—१ शमुवेल ७:११.

या युद्धामुळे खूप मोठा बदल झाला. शमुवेल जोपर्यंत शास्ता म्हणून होता तोपर्यंत पलिष्ट्यांनी जिंकलेली गावे पुन्हा इस्राएल लोकांस परत केली. हळूहळू एकेक गाव देवाच्या लोकांच्या अधिपत्याखाली येऊ लागले.—१ शमुवेल ७:१३, १४.

अनेक शतकांनंतर, प्रेषित पौलाने शमुवेलाला अशा विश्‍वासू शास्त्यांमध्ये व संदेष्ट्यांमध्ये गणले ज्यांनी “नीतिमत्व आचरले” होते. (इब्री लोकांस ११:३२, ३३) देवाच्या नजरेत जे चांगले व बरोबर होते ते करण्यास त्याने खरोखरच लोकांना मदत केली होती. तो असाच प्रभावी राहिला कारण तो यहोवावर धीराने विसंबून राहिला. समस्या असतानाही तो त्याच्या कामात विश्‍वासूपणे टिकून राहिला. त्याने कृतज्ञ मनोवृत्तीही दाखवली. मिस्पा येथील विजय मिळाल्यानंतर, यहोवाने आपल्या लोकांना कशा प्रकारे विजय मिळवून दिला होता त्याच्या प्रीत्यर्थ त्याने एक स्मृतीस्तंभही तेथे उभा केला.—१ शमुवेल ७:१२.

तुम्हीही ‘नीतिमत्व आचरू’ इच्छिता का? तर मग तुम्ही शमुवेलाप्रमाणे धीर धरू शकता, त्याच्यासारखी नम्रता व कृतज्ञ मनोवृत्ती विकसित करू शकता. आणि आपल्यातील कोण असा आहे ज्याला या गुणांची आवश्‍यकता नाही? शमुवेलाला हे गुण लहानपणीच अंगी बाणवावे लागले होते कारण, वृद्धपणी त्याला खरोखरच खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार होते.

“तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत”

आपण नंतरच्या अहवालात शमुवेलाविषयी वाचतो. आता तो “वृद्ध” झाला आहे. शमुवेलाला, योएल व अबीया नावाचे दोन पुत्र झाले आणि त्याने त्याच्याबरोबर न्यायइन्साफ करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. पण, त्यांच्यावर भरवसा ठेवून शमुवेल निराशच झाला. शमुवेल ईमानदार व धार्मिक होता परंतु त्याच्या पुत्रांना, पैशाचा लोभ होता. ते लाच खाऊ लागले व न्याय विपरीत करू लागले.—१ शमुवेल ८:१-३.

या मुलांची तक्रार करण्यासाठी एके दिवशी इस्राएलातील सर्व वडील शमुवेलाकडे आले. “तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत,” असे त्यांनी त्यास म्हटले. (१ शमुवेल ८:४, ५) शमुवेलाला त्याच्या मुलांची वागणूक माहीत होती का? अहवालात याबद्दल काहीही सांगितलेले नाही. पण एलीप्रमाणे तो बेजबाबदार पिता नव्हता एवढे मात्र खरे. एलीने त्याच्या मुलांच्या वाईट वागणुकीबद्दल त्यांची सुधारणूक केली नव्हती व यहोवापेक्षा तो आपल्या मुलांचा जास्त आदर करत होता म्हणून यहोवाने त्याची कानउघडणी करून त्याला शिक्षा दिली होती. (१ शमुवेल २:२७-२९) पण, शमुवेलाच्या बाबतीत यहोवाला अशी चूक आढळली नाही.

आपल्या मुलांच्या वाईट वागणुकीबद्दल माहीत झाल्यावर शमुवेलाला अतिशय लाज वाटली, त्याला चिंता वाटली किंवा तो निराश झाल्याचे अहवालात म्हटलेले नाही. पण त्याला किती वाईट वाटले असावे, हे कदाचित आज अनेक पालक समजू शकतील. आजच्या या कठीण दिवसांत, पालकांच्या अधिकाराविरुद्ध व ते लावत असलेल्या शिस्तीविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. (२ तीमथ्य ३:१-५) अशा मानसिक यातना भोगणारे पालक, शमुवेलाच्या उदाहरणाद्वारे मिळणाऱ्‍या मार्गदर्शनातून काही प्रमाणात सांत्वन मिळवू शकतात. शमुवेलाची मुले वाईट वळणाला लागली म्हणून तो देवाच्या धार्मिक मार्गावरून जराही विचलित झाला नाही. पालकांच्या मार्गदर्शनाकडे व शिस्तीकडे मुलांनी दुर्लक्ष केले तरी, त्यांच्या उदाहरणाचा मुलांवर चांगला प्रभाव पडू शकतो. आणि शमुवेलाप्रमाणे आजच्या पालकांपुढे तर त्यांचा पिता यहोवा देव याला अभिमान वाटेल असे कार्य करण्याची नेहमी संधी आहे.

“आम्हावर एक राजा नेमा”

आपल्या लोभीपणाचे व स्वार्थी मनोवृत्तीचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात, याची कदाचित शमुवेलाच्या मुलांनी कल्पना देखील केली नसेल. त्यांची ही मनोवृत्ती पाहूनच इस्राएलमधील वडील जन शमुवेलाला म्हणाले: “आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायइन्साफ करावयास आम्हावर एक राजा नेमा.” लोकांच्या या मागणीवरून असे वाटत होते का की त्यांना आता शमुवेल नको होता? कारण, यहोवाच्या वतीने तोच कित्येक दशकांपासून लोकांचा न्यायइन्साफ करत होता. आता या लोकांना, शमुवेलासारखा एक साधासुधा संदेष्टा नको होता तर राजा हवा होता जो त्यांचा न्यायइन्साफ करू शकेल. त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये राजे होते व इस्राएल लोकांनाही आता एक राजा हवा होता. लोकांच्या या मागणीबद्दल शमुवेलाला कसे वाटले? “शमुवेलास वाईट वाटले,” असे अहवालात आपण वाचतो.—१ शमुवेल ८:५, ६.

शमुवेलाने जेव्हा याबाबतीत यहोवाला प्रार्थना केली तेव्हा यहोवाने त्याला काय म्हटले ते पाहा. तो त्याला म्हणाला: “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत.” शमुवेलाला हे ऐकून थोडेसे सांत्वन मिळाले असेल पण ते लोक सर्वसमर्थ देवाचा किती घोर अपमान करत होते! मानवी राजा निवडून लोकांना खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे, याबद्दलचा इशारा लोकांना देण्यास यहोवाने शमुवेलाला सांगितले. शमुवेलाने जेव्हा यहोवाचा संदेश लोकांना कळवला तेव्हा ते म्हणत राहिले: “नाही, नाही, आमच्यावर राजा पाहिजेच.” शमुवेलाने देवाचे म्हणणे ऐकून त्यांच्यावर देवानेच निवडलेल्या राजाचा अभिषेक केला.—१ शमुवेल ८:७-१९.

पण शमुवेलाने देवाचे म्हणणे ऐकले तेव्हा त्याला कसे वाटले? नाराज होऊन किंवा केवळ ऐकायचे म्हणून त्याने देवाचे म्हणणे ऐकले का? त्याने त्याचे मन कलुषित होऊ दिले का किंवा मनात कटू भावना वाढू दिल्या का? शमुवेलाच्या जागी इतर लोक असते तर कदाचित त्यांनी असे होऊ दिले असते; पण शमुवेलाने असे काहीही होऊ दिले नाही. त्याने शौलाचा राजा म्हणून अभिषेक केला; इतकेच नव्हे तर यहोवाने त्याला राजा म्हणून निवडले होते, हेही कबूल केले. त्याने शौलाचे चुंबन घेतले. प्राचीन काळात, नवीन राजाचे स्वागत करण्यासाठी व त्याला अधीनता दाखवण्यासाठी चुंबन घेण्याचा रिवाज होता. आणि यानंतर मग तो लोकांना म्हणाला: “परमेश्‍वराने ज्यास निवडिले त्यास तुम्ही पाहत आहा ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही.”—१ शमुवेल १०:१, २४.

यहोवाने निवडलेल्या मनुष्याच्या चुका नव्हे तर त्याचे चांगले गुण शमुवेलाने पाहिले. आणि चंचल लोकांची मर्जी मिळवण्याऐवजी त्याने देवाची विश्‍वासूपणे सेवा केली. (१ शमुवेल १२:१-४) यहोवाच्या मार्गांवर चालण्याचे सोडून दिल्यावर कोणता धोका उद्‌भवू शकतो याबद्दल लोकांना सल्ला देण्याचे व यहोवाशी एकनिष्ठपणे जडून राहण्याचे लोकांना उत्तेजन देण्याचे कामही शमुवेल विश्‍वासूपणे करत राहिला. शमुवेलाने दिलेला सल्ला लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहचला व त्यांनी त्याला त्यांच्यावतीने प्रार्थना करण्याची विनंती केली. तेव्हा त्याने त्यांना जे उत्तर दिले ते अतिशय सुरेख होते: “तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्‍वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवितो.”—१ शमुवेल १२:२१-२४.

एखाद्या विशिष्ट पदासाठी किंवा सुहक्कासाठी जेव्हा तुमच्याऐवजी कोणा दुसऱ्‍याला नेमण्यात आले तेव्हा तुम्ही नाराज झाला होता का? अशा वेळी आपण आपल्या मनात, हेवा किंवा कटू भावना वाढू देऊ नयेत याबाबतीत शमुवेलाचे सुरेख उदाहरण आपल्यापुढे आहे. यहोवाने त्याच्या प्रत्येक विश्‍वासू सेवकाला भरपूर प्रतिफलदायी व समाधानकारक काम नेमून दिले आहे.

‘तू शौलासाठी कोठवर शोक करीत राहणार’

शमुवेलाने शौलाचे चांगले गुण पाहिले ते चांगलेच केले. शौल खरोखरच एक उल्लेखनीय मनुष्य होता. उंचपुरा व प्रभावी व्यक्‍तिमत्त्व असलेला शौल धाडसी व हुशार होता. सुरुवातीला तो नम्र व साधासुधा होता. (१ शमुवेल १०:२२, २३, २७) या गुणांव्यतिरिक्‍त त्याच्याजवळ आणखी एक देणगी होती. इच्छा स्वातंत्र्याची देणगी. म्हणजे, स्वतःचे जीवनक्रम निवडायची व स्वतःचे निर्णय घ्यायची कुवत त्याच्याजवळ होती. (अनुवाद ३०:१९) या देणगीचा त्याने योग्य वापर केला का?

मनुष्याच्या हातात सत्ता येते तेव्हा सर्वात आधी त्याच्यातला नम्रपणाच नाहीसा होतो. शौलाच्या बाबतीतही असेच झाले. हातात सत्ता आल्याबरोबर तो घमेंडी बनला. शमुवेलाद्वारे यहोवाने त्याला दिलेल्या आज्ञांचे उल्लंघन करण्याची त्याने निवड केली. एकदा तर, अर्पण करण्याचा हक्क फक्‍त शमुवेलाचा असताना तो इतका अधीर झाला की त्याने स्वतःहूनच अर्पण चढवले. यासाठी शमुवेलाला त्याची अगदी कडक शब्दांत कानउघडणी करावी लागली व असेही भाकीत करावे लागले, की राज्यपद त्याच्या वंशात राहणार नाही. शमुवेलाने शौलाला दिलेल्या शिस्तीतून धडा शिकण्याऐवजी त्याने देवाच्या आणखी आज्ञा मोडून गंभीर पापे केली.—१ शमुवेल १३:८, ९, १३, १४.

शमुवेलाद्वारे यहोवाने शौलाला अमालेकी लोकांबरोबर युद्ध करण्यास सांगितले. या सूचनेत, अमालेकी लोकांचा राजा अगाग याला ठार मारण्याची सूचना देखील होती. परंतु, शौलाने अगागला मारले नाही; शिवाय, ज्याचा नाश करायचा होता त्या लुटून आणलेल्या मालातूनही ज्या चांगल्या चांगल्या वस्तू होत्या त्या त्याने काढून ठेवल्या. शमुवेल जेव्हा त्याची चूक त्याच्या ध्यानात आणून देण्याकरता आला तेव्हा तो किती बदलला होता हे शौलाने आपल्या वागण्यातून दाखवले. आपली चूक मान्य करण्याऐवजी तो सबबी देऊ लागला, आपण जे काही केले ते इतके काही गंभीर नाही, असे सांगू लागला. टंगळमंगळ करू लागला आणि लोकांवर दोष ढकलू लागला. आपण लुटून आणलेले प्राणी यहोवालाच अर्पण करण्याकरता आहेत असे बोलून जेव्हा त्याने केलेल्या चुकीचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शमुवेलाने त्याला जे म्हटले ते आपल्या सर्वांच्याच ऐकिवात आहे: “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे.” शमुवेलाने अगदी निडरतेने शौलाची कानउघडणी केली आणि यहोवाचा निर्णय त्याला कळवला: इस्राएलावरील त्याचे राजपद त्याच्यापासून काढून त्याच्यापेक्षा जो बरा आहे अशा एका मनुष्याला दिले जाईल.—१ शमुवेल १५:१-३३.

शौलाच्या वागण्याचे शमुवेलाला खूप वाईट वाटले होते. संपूर्ण रात्रभर रडत रडत त्याने या विषयावर यहोवाला प्रार्थना केली होती. इतकेच नव्हे तर त्याने शौलासाठी शोकही केला. शौल पुढे चांगला राजा बनेल अशी आशा शमुवेलाला होती पण त्याच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या होत्या. शौल पार बदलला होता. तो ज्या शौलाला ओळखत होता तो नम्र होता. पण आता त्या शौलातले ते गुण नाहीसे झाले होते व तो यहोवाच्या विरोधात कार्य करत होता. शमुवेलाने शौलाचे तोंड पुन्हा पाहायचे नाही, असे ठरवले. अशा वेळी यहोवाने अगदी कोमलतेने शमुवेलाचा दृष्टिकोन बदलण्यास त्याला मदत केली. तो त्याला म्हणाला: “मी शौलास इस्राएलांच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर याजकडे पाठवितो; कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडिले आहे.”—१ शमुवेल १५:३४, ३५; १६:१.

यहोवाचे उद्देश अपरिपूर्ण मानवांवर अवलंबून नसतात; कारण मानव नेहमी एकनिष्ठ राहत नाहीत. जर एक मनुष्य बेईमान ठरला तर यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्याकरता दुसरा शोधून काढतो. शमुवेलाचा दृष्टिकोन बदलण्यास यहोवाने मदत केल्यामुळे शमुवेल शौलाच्या दुःखातून सावरला. आणि मग यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार तो बेथलेहेम येथील इशायाच्या घरी गेला. तेथे त्याला इशायाचे अनेक देखणे पुत्र दिसले. तरीपण अगदी सुरुवातीपासूनच यहोवाने शमुवेलाला अशी आठवण करून दिली: “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण . . . मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) शेवटी शमुवेलाची गाठ इशायाचा धाकटा मुलगा, दावीद याच्याशी पडते. आणि ही यहोवाची निवड असते.

शमुवेलाच्या वृद्धपणी त्याला, शौलाऐवजी दाविदाला राजा बनवण्याचा यहोवाचा निर्णय किती उचित होता हे आणखी स्पष्टरीत्या समजले. नंतर नंतर तर शौलाला दाविदाचा इतका हेवा वाटू लागला की तो त्याला ठार मारण्याची संधी शोधू लागला; इतकेच नव्हे तर त्याने यहोवाची उपासना करण्याचेही सोडून दिले. पण दाविदाने मात्र धाडस, सचोटी, विश्‍वास व एकनिष्ठा यांसारखे सुरेख गुण दाखवले. शमुवेल जसजसा म्हातारा होऊ लागला तसतसा त्याचा विश्‍वास आणखी मजबूत होत गेला. कोणत्याही निराशजनक समस्येचे निरसन करणे किंवा परिस्थिती बदलून तिचे आशीर्वादात रूपांतर करणे यहोवाला अशक्य नाही, हे त्याला जाणवले. कालांतराने शमुवेलाचा मृत्यू झाला. तो एका उल्लेखनीय जीवनाचा रेकॉर्ड मागे सोडून गेला जो जवळजवळ एक शतक टिकून राहिला. म्हणूनच तर या विश्‍वासू मनुष्याचा मृत्यू झाला तेव्हा संपूर्ण इस्राएल राष्ट्राने शोक केला. आजही यहोवाचे सेवक स्वतःला असा प्रश्‍न विचारू शकतात: ‘मलाही शमुवेलासारखा विश्‍वास दाखवता येईल का?’ (w११-E ०१/०१)

[१७ पानांवरील चित्र]

शमुवेल आपल्या लोकांना झालेल्या दुःखातून व निराशेतून सावरायला कशी मदत करणार होता?

[१८ पानांवरील चित्र]

शमुवेलाचे पुत्रच जेव्हा वाईट वर्तनाचे निघाले तेव्हा तो या दुःखातून कसा सावरला?