व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वर्षातील सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?

वर्षातील सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?

वर्षातील सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?

येशूच्या मृत्यूच्या फक्‍त काही तास आधी त्याने, त्याच्या मृत्यूचा स्मृतिदिन साजरा करण्याचा एक खास मार्ग स्थापित केला. याच स्मारकाला “प्रभूभोजन” किंवा सांजभोजन असे संबोधले जाते. (१ करिंथकर ११:२०) या प्रसंगाचे महत्त्व समजावताना येशूने अशी आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन तुम्ही करू इच्छिता का? जर होय तर तुम्हीही, वर्षातून एकदा येणाऱ्‍या येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला सर्वात महत्त्वाचे समजाल.

पण तुम्ही हा स्मारकविधी नेमका केव्हा साजरा केला पाहिजे? या महत्त्वपूर्ण प्रसंगाचा अर्थ समजण्याची तुम्ही पूर्ण तयारी कशी करू शकता? या प्रश्‍नांवर प्रत्येक ख्रिश्‍चनाने काळजीपूर्वक विचार करणे आवश्‍यक आहे.

कितीदा साजरा केला पाहिजे?

जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची आठवण सहसा आपल्याला वर्षातील त्या तारखेला येतेच. जसे की, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबई शहरातील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दुःखद दिवशी, अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ज्या लोकांचे प्रियजन यात मरण पावले त्या लोकांच्या मनात हा दिवस कायमचा कोरला गेला. म्हणून दर वर्षी ही तारीख त्यांना खास वाटते.

बायबल लिहिले त्या काळातही, वर्षातून एकदा महत्त्वपूर्ण घटना साजरा करण्याची प्रथा होती. (एस्तेर ९:२१, २७) ईजिप्टमधून चमत्कारिक रीत्या सुटका झालेल्या इस्राएल लोकांना यहोवाने, त्यांच्या सुटकेचा दिवस दर वर्षी साजरा करण्याची आज्ञा दिली. याला बायबलमध्ये वल्हांडणाचा सण असे संबोधले आहे. आणि इस्राएली लोकांचा ज्या तारखेला बचाव झाला होता त्या तारखेला दर वर्षी ते तो सण साजरा करत असत.—निर्गम १२:२४-२७; १३:१०.

येशूने नुकताच आपल्या प्रेषितांबरोबर वल्हांडणाचा सण साजरा केला होता. त्यानंतर त्याने एका खास भोजनाची स्थापना केली. हे भोजन, त्याच्या मृत्यूचा स्मारक साजरा करण्याकरता एक नमुना ठरणार होते. (लूक २२:७-१०) वल्हांडणाचा सण दर वर्षी साजरा केला जाई. तसेच, वल्हांडणाऐवजी आता हा नवीन स्मारकविधी दर वर्षी साजरा करण्याची गरज होती, असा आपण निष्कर्ष काढू शकतो. पण मग कोणत्या तारखेला तो साजरा करायचा होता?

कोणत्या तारखेला?

या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याकरता आपल्याला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट, बायबल लिहिले त्या काळात, एका नवीन दिवसाची सुरुवात संध्याकाळपासून होत असे; आजच्या सूर्यास्तापासून उद्याच्या सूर्यास्तापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवस असे मानले जात असे.—लेवीय २३:३२.

दुसरी गोष्ट जी आपण समजून घेतली पाहिजे ती ही, की बायबल लिहिले त्या काळातील लोक, आज आपण वापरत असलेले कॅलेंडर वापरत नव्हते. त्या काळातील महिन्यांना, मार्च व एप्रिल अशी नावे नव्हती तर अदार व निसान अशी नावे होती. (एस्तेर ३:७) यहुदी लोक, एक चंद्रदर्शनापासून दुसऱ्‍या चंद्रदर्शनापर्यंत त्यांच्या महिन्यांची गणती करत असत. ते त्यांच्या कॅलेंडरवरील निसान या पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी वल्हांडणाचा सण साजरा करत असत. (लेवीय २३:५; गणना २८:१६) रोमी लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्त याला निसान १४ याच तारखेला खांबावर खिळून मारले होते. सर्वात पहिला वल्हांडणाचा सण साजरा केल्यानंतर बरोबर १,५४५ वर्षांनंतर येशू मरण पावला. तेव्हा, निसान १४ ही तारीख किती खास आहे, नाही का?

पण मग, आपल्या आजच्या कॅलेंडरनुसार निसान १४ ही तारीख केव्हा येते? याच्यासाठी एक साधे-सोपे गणित आहे. निसान महिन्याचा पहिला दिवस, उत्तर गोलार्धातील वसंतऋतूच्या संपातदिनाच्या (दिवस आणि रात्र यांचा समान अवधी असण्याचा वर्षातील काळ) जवळपास जेरुसलेमेत सूर्यास्ताच्या वेळी नवीन चंद्राची कोर दिसू लागते तेव्हा सुरू होतो. येथून १४ दिवस मोजल्यास निसान १४ तारीख येते, जी पौर्णिमेसोबत जुळणारी असते. बायबलमधील या कालगणतीच्या पद्धतीनुसार, या वर्षी निसान १४ हा दिवस, गुरुवार ५ एप्रिल सूर्यास्तापासून सुरू होतो. *

त्यामुळे या वर्षी संपूर्ण पृथ्वीवरील यहोवाचे साक्षीदार येशूच्या मृत्यूची आठवण करू इच्छिणाऱ्‍यांबरोबर मिळून येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करणार आहेत. तुम्हीही या स्मारकविधीला यावे, असे ते तुम्हाला हार्दिक आमंत्रण देत आहेत. या स्मारकविधीची वेळ आणि ठिकाण तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा. ते हा स्मारकविधी, सकाळी किंवा दुपारी नव्हे तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर साजरा करणार आहेत. संध्याकाळी का? कारण, बायबलमध्ये सांगितल्यानुसार येशूने या स्मारकविधीची स्थापना संध्याकाळी केली होती. (१ करिंथकर ११:२३-२५) गुरुवार ५ एप्रिल, २०१२ ची संध्याकाळ ही येशूने १,९७९ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या खास स्मारकविधीची संध्याकाळ आहे. आणि येशू मरण पावला तो निसान १४ देखील याच दिवशी सुरू होतो. येशूच्या मृत्यूची आठवण करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगला दिवस कोणता असू शकतो का?

तयारी कशी करायची?

वर्षातून एकदा येणाऱ्‍या या प्रसंगाची तुम्ही मानसिक तयारी कशी करू शकता? तयारी करण्याचा एक मार्ग म्हणजे, येशूने आपल्यासाठी जे काही केले त्यावर मनन करणे. येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला जो फायदा होतो त्याबद्दल आपली कदर वाढवण्याकरता, बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकाने कोट्यवधी लोकांना मदत केली आहे.—मत्तय २०:२८.

या खास प्रसंगासाठी आपल्या मनाची तयारी करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, येशू पृथ्वीवर असताना त्याच्या जीवनाच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत घडलेल्या घटनांबद्दलचा अहवाल वाचणे. पुढील पानांवर तुम्हाला एक तक्‍ता दिसेल. उजवीकडच्या रकान्यात, बायबलमधील समांतर अहवालांतील येशूच्या मृत्यूच्या आधी घडलेल्या घटनांची यादी दिलेली आहे. या यादीत, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य * या पुस्तकातील अध्यायदेखील आहेत ज्यात त्या घटनांचे वर्णन करण्यात आले आहे.

डावीकडील रकान्यात, त्या घटना ज्या तारखांना घडल्या होत्या त्या आज कोणत्या तारखांशी जुळतात, ते दाखवण्यात आले आहे. तर, प्रभूच्या सांजभोजनापर्यंत दर दिवशी कोणकोणत्या घटना घडल्या होत्या त्यांबद्दल बायबलमधील उतारे वाचण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता. असे केल्यास तुम्ही वर्षातील सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी स्वतःची मानसिक तयारी करू शकाल. (w११-E ०२/०१)

[तळटीपा]

^ परि. 11 आधुनिक दिवसातील यहुदी पाळत असलेल्या वल्हांडणाच्या सणाशी ही तारीख जुळणार नाही. का नाही? कारण आजचे बहुतेक यहुदी, निसान १५ रोजी वल्हांडणाचा सण पाळतात. निर्गम १२:६ मधील आज्ञा या दिवसाला सूचित करते, असे त्यांचे म्हणणे आहे. (टेहळणी बुरूज १ फेब्रुवारी, १९९१, पृष्ठ २४ पाहा.) पण मोशेला देण्यात आलेल्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे येशूने निसान १४ रोजीच तो सण पाळला. ही तारीख कशी मोजायची, याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठ २०६ वरील परिच्छेद २ पाहा.

^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची ४७-५६, २०६-२०८ ही पृष्ठे पाहा. तुम्ही हे प्रकाशन www.watchtower.org या वेबसाईटवरूनही पाहू शकता.

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले आहे.

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करा गुरुवार, ५ एप्रिल, २०१२

[२१, २२ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

शेवटला आठवडा

२०१२ शनि. ३१ मार्च शब्बाथ मत्तय

२०१३ ․․․․․ मार्क

२०१४ ․․․․․ लूक

योहान ११:५५–१२:१

सर्वश्रेष्ठ मनुष्य १०१, परि. २-४ *

९ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

बायबल लिहिले त्या काळात,▪ कुष्ठरोगी शिमोन □ मत्तय २६:६-१३

एका दिवसाची सुरुवात याच्याबरोबर येशू भोजन करतो

संध्याकाळपासून होत असे; ▪ महागड्या तेलाने □ मार्क १४:३-९

म्हणजे, आजच्या सूर्यास्तापासून मरीया येशूचा अभिषेक करते

उद्याच्या सूर्यास्तापर्यंतच्या काळाला ▪ यहुदी लोक येशूला लूक

एक दिवस मानले जात असे व लाजरला □ योहान १२:२-११

भेटायला येतात □ सर्वश्रेष्ठ मनुष्य १०१, परि. ५-९

२०१२ रवि. १ एप्रिल ▪ येशू जेरुसलेमेत □ मत्तय २१:१-११, १४-१७

२०१३ ․․․․․ विजयी मुद्रेने प्रवेश करतो

२०१४ ․․․․․ ▪ तो मंदिरात शिकवतो □ मार्क ११:१-११

लूक १९:२९-४४

योहान १२:१२-१९

सर्वश्रेष्ठ मनुष्य १०२

१० निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

रात्री बेथानीत

राहतो

२०१२ सोम. २ एप्रिल ▪ पहाटेच उठून □ मत्तय २१:१२, १३,

२०१३ ․․․․․ जेरुसलेमला निघतो १८, १९

२०१४ ․․․․․ ▪ मंदिर स्वच्छ करतो □ मार्क ११:१२-१९

▪ यहोवा स्वर्गातून □ लूक १९:४५-४८

बोलतो □ योहान १२:२०-५०

सर्वश्रेष्ठ मनुष्य १०३, १०४

११ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

२०१२ मंगळ. ३ एप्रिल ▪ येशू मंदिरात □ मत्तय २१:१९–२५:४६

२०१३ ․․․․․ दाखल्यांचा उपयोग

२०१४ ․․․․․ करून शिकवतो

▪ परुशांचा □ मार्क ११:२०–१३:३७

निषेध करतो

▪ विधवेला दानपेटीत दोन □ लूक २०:१–२१:३८

नाणी टाकताना पाहतो

▪ जेरुसलेमचा नाश होईल, योहान

अशी भविष्यवाणी करतो

▪ भविष्यातील त्याच्या □ सर्वश्रेष्ठ मनुष्य १०५ ते ११२, परि. १

उपस्थितीचे चिन्ह सांगतो

१२ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

२०१२ बुध. ४ एप्रिल ▪ बेथानीत □ मत्तय २६:१-५, १४-१६

२०१३ ․․․․․ शिष्यांबरोबर एकांतात

२०१४ ․․․․․ वेळ घालवतो

▪ यहुदा येशूचा □ मार्क १४:१, २, १०, ११

विश्‍वासघात करायचा कट रचतो

लूक २२:१-६

योहान

सर्वश्रेष्ठ मनुष्य ११२, परि. २-४

१३ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

२०१२ गुरु. ५ एप्रिल ▪ पेत्र आणि योहान □ मत्तय २६:१७-१९

२०१३ ․․․․․ वल्हांडणाची

२०१४ ․․․․․ तयारी करतात

▪ येशू आणि इतर □ मार्क १४:१२-१६

दहा प्रेषित □ लूक २२:७-१३

संध्याकाळी त्यांना योहान

जाऊन मदत करतात □ सर्वश्रेष्ठ मनुष्य ११२, परि. ५ ते ११३ परि. १

१४ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

▪ वल्हांडण सण □ मत्तय २६:२०-३५

साजरा करतात

▪ येशू प्रेषितांचे □ मार्क १४:१७-३१

पाय धुतो

▪ यहुदाला बाहेर पाठवतो □ लूक २२:१४-३८

▪ आपल्या मृत्यूच्या □ योहान १३:१–१७:२६

स्मारकविधीची स्थापना करतो □ सर्वश्रेष्ठ मनुष्य ११३, परि. २ ते

११६च्या शेवटपर्यंत

मध्यरात्री ▪ गेथशेमाने बागेत □ मत्तय २६:३६-७५

२०१२ शुक्र. ६ एप्रिल येशूचा विश्‍वासघात

२०१३ ․․․․․ करून त्याला पकडले जाते

२०१४ ․․․․․ ▪ प्रेषित त्याला सोडून पळून जातात □ मार्क १४:३२-७२

▪ सन्हेद्रिनमध्ये त्याची □ लूक २२:३९-६२

उलटतपासणी होते

▪ पेत्र येशूला □ योहान १८:१-२७

नाकारतो □ सर्वश्रेष्ठ मनुष्य ११७ ते

१२०च्या शेवटपर्यंत

▪ पुन्हा सन्हेद्रिनपुढे □ मत्तय २७:१-६१

त्याला उभे केले जाते

▪ पिलाताकडे नेले जाते,□ मार्क १५:१-४७

मग हेरोदकडे

आणि पुन्हा पिलाताकडे

▪ मृत्यूदंड दिला जातो □ लूक २२:६३–२३:५६

व खांबावर लटकवले जाते

▪ दुपारी तीनच्या □ योहान १८:२८-४०

सुमारास मरण

पावतो

▪ खांबावरून त्याचे शरीर □ सर्वश्रेष्ठ मनुष्य १२१ ते १२७, परि. ७

खाली उतरवून पुरले जाते

१५ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

▪ शब्बाथ

२०१२ शनि. ७ एप्रिल ▪ पिलात येशूच्या □ मत्तय २७:६२-६६

२०१३ ․․․․․ कबरेजवळ रक्षक मार्क

२०१४ ․․․․․ नेमण्याची परवानगी देतो लूक

योहान

सर्वश्रेष्ठ मनुष्य १२७, परि. ८-९

१६ निसान (सूर्यास्तापासून सुरू होतो)

२०१२ रवि. ८ एप्रिल ▪ येशूला जिवंत केले जाते □ मत्तय २८:१-१५

२०१३ ․․․․․ ▪ तो शिष्यांसमोर □ मार्क १६:१-८

२०१४ ․․․․․ प्रकट होतो □ लूक २४:१-४९

योहान २०:१-२५

सर्वश्रेष्ठ मनुष्य १२७, परि. १०

ते १२९ परि. १०

[तळटीप]

^ परि. 30 येथे दाखवण्यात आलेले आकडे हे, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्यgt-MR) या पुस्तकातील अध्याय आहेत. येशू पृथ्वीवर असताना त्याच्या शेवटल्या सेवेबद्दलचा तपशीलवार बायबल वचनांचा तक्‍ता पाहायचा असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, ऑल स्क्रिप्चर इज इन्स्‌पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनिफिशियल या पुस्तकाचे पृष्ठ २९० पाहा.