व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने सैतानाला निर्माण केले का?

देवाने सैतानाला निर्माण केले का?

वाचक विचारतात . . .

देवाने सैतानाला निर्माण केले का?

▪ देवाने “सर्व काही निर्माण केले,” असे बायबलमध्ये सांगितल्यामुळे, त्यानेच सैतानालाही निर्माण केले असावे असे काहींना वाटते. (इफिसकर ३:९; प्रकटीकरण ४:११) पण, बायबल स्पष्टपणे दाखवते की देवाने सैतानाला निर्माण केले नाही.

यहोवाने एका देवदूताला बनवले जो नंतर सैतान बनला. त्यामुळे देवाचा हा प्रमुख विरोधक आणि आपला निर्माणकर्ता यहोवा यांच्याबाबतीत शास्त्रवचनांत जे काही सांगितले आहे ते खरे असल्याचे दिसून येते. देवाबद्दल बायबलमध्ये म्हटले आहे: “त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:३-५) या वचनावरून आपण म्हणू शकतो, की सैतान सुरुवातीला, परिपूर्ण, नीतिमान आणि देवाचा एक आत्मिक पुत्र होता. योहान ८:४४ मध्ये येशू म्हणाला की सैतान “सत्यात टिकला नाही” म्हणजे, सैतान आधी सत्यवान व निर्दोष होता.

यहोवाच्या इतर बुद्धिमान प्राण्यांप्रमाणेच, सैतान बनलेल्या देवदूताला चांगले आणि वाईट यात निवड करण्याचे स्वातंत्र्य होते. देवाच्या विरोधात जाणारा मार्ग निवडण्याद्वारे व पहिल्या मानवी जोडप्याला स्वतः बरोबर सामील करण्याद्वारे त्याने स्वतःला सैतान बनवले ज्याचा अर्थ “विरोधक” असा होतो.—उत्पत्ति ३:१-५.

या दुष्ट देवदूताने स्वतःला दियाबलही बनवले ज्याचा अर्थ “निंदक” असा होतो. निर्माणकर्त्याने दिलेल्या स्पष्ट नियमाचे उल्लंघन करण्यास हव्वेला फसवण्याकरता सैतानानेच अतिशय धूर्तपणे सर्पाचा उपयोग करून असे दाखवले, जणू काय सर्प तिच्याशी बोलत आहे. त्यामुळेच, येशूने सैतानाला “लबाडीचा बाप” म्हटले.—योहान ८:४४.

पण, ज्याच्यामध्ये काहीएक कमतरता नसताना किंवा आजूबाजूला दुष्ट प्रभाव नसताना, या परिपूर्ण देवदूताचा कल वाईट गोष्टी करण्याकडे कसा काय गेला? ज्या उपासनेवर सर्वस्वी यहोवाचा अधिकार आहे ती उपासना आपल्याला मिळाली तर यहोवाऐवजी लोक आपल्या अधिकारात राहतील, अशी हाव त्याने त्याच्या मनात वाढू दिली. राज्य करण्याचा अधिकार आपल्याला मिळेल, ही त्याच्या मनात वाढत असलेली चुकीची आशा काढून टाकण्याऐवजी तो त्या गोष्टीवर रात्रंदिवस विचार करू लागला; इतका विचार करू लागला, की सरतेशेवटी आपल्या मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने कार्यदेखील केले. याकोबाच्या पुस्तकात याबाबतीत असे वर्णन केले आहे: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.”—याकोब १:१४, १५; १ तीमथ्य ३:६.

हे समजायला एका उदाहरणावर विचार करा. एका कंपनीत पैशांचा हिशोब ठेवणाऱ्‍या व्यक्‍तीला माहीत असते, की पैशांच्या हिशेबात थोडी अफरा-तफर केली, की वरचा पैसा स्वतःच्या खिशात घालण्याची तिला संधी मिळू शकते. हा चुकीचा विचार ती मनातून लगेचच काढू शकते. पण, जर ती व्यक्‍ती स्वतःच्या फायद्याचा जास्त विचार करत राहिली तर तिच्या मनात ही इच्छा मूळ धरू लागते आणि मग आज नाही तर उद्या संधी मिळेल तेव्हा ती व्यक्‍ती कार्यही करण्यास प्रवृत्त होऊ शकते. आणि तिने तसे केले तर ती स्वतःला चोर बनवते. केलेल्या कृत्याबद्दल ती जर खोटे बोलली तर ती लबाडही बनते. त्याचप्रमाणे, स्वतःच्या मनात वाईट इच्छा आणून त्यानुसार कार्य करण्याद्वारे, देवाने निर्माण केलेल्या देवदूताने त्याला दिलेल्या इच्छा स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन फसवणूक व आपल्या पित्याच्या विरोधात कार्य करून स्वतःला सैतान बनवले.

देवाच्या ठरलेल्या वेळी दियाबल सैतानाचा नाश केला जाईल, ही आनंदाची गोष्ट आहे. (रोमकर १६:२०) पण तोपर्यंत, यहोवा देवाच्या उपासकांना सैतानाच्या कुयुक्त्यांबद्दलची माहिती दिली जात आहे व तो वापरत असलेल्या डावपेचांपासून संरक्षण दिले जात आहे. (२ करिंथकर २:११; इफिसकर ६:११) तेव्हा, आपल्या पूर्ण शक्‍तीनिशी “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७. (w११-E ०३/०१)

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाच्या विरोधात जाणारा मार्ग निवडण्याद्वारे, एका परिपूर्ण देवदूताने स्वतःला सैतान बनवले