व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्त नेमका कोण आहे?

येशू ख्रिस्त नेमका कोण आहे?

येशू ख्रिस्त नेमका कोण आहे?

“तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, ‘हा कोण?’ लोकसमुदाय म्हणाले, ‘गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा होय.’” —मत्तय २१:१०, ११.

इ.स. ३३ सालचा तो वसंत ऋतू होता. एके दिवशी येशू ख्रिस्त * जेरुसलेमेत आला होता. तो आला तेव्हा शहरात बरीच खळबळ माजली होती. का? कारण पुष्कळ लोकांनी येशूबद्दल आणि तो करत असलेल्या चमत्कारांबद्दल ऐकले होते. ते इतरांना त्याच्याबद्दल सांगू लागले. (योहान १२:१७-१९) पण या लोकांना याची जराही कल्पना नव्हती, की त्यांच्यामध्ये येशू हा असा एक मनुष्य होता ज्याचा संपूर्ण जगावर प्रभाव पडणार होता आणि अगदी आपल्या दिवसांपर्यंत तो लोकांच्या मनात स्वतःची एक वेगळी अस्मिता तयार करणार होता!

मानव इतिहासात येशूचा किती दूरपर्यंत प्रभाव पडला होता त्याची काही उदाहरणे पाहा.

▪ जगाच्या बहुतेक भागांमध्ये वापरले जाणारे कॅलेंडर, येशूचा जन्म ज्या वर्षी झाला होता असे समजले जाते त्या वर्षावर आधारित आहे.

▪ जगाची एक तृतीयांश लोकसंख्या म्हणजे जवळजवळ दोन अब्ज लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात.

▪ एक अब्जापेक्षा जास्त सदस्य असलेला मुस्लिम धर्म असे शिकवतो, की येशू हा “अब्राहाम, नोहा आणि मोशे यांच्यापेक्षाही महान संदेष्टा होता.”

▪ येशूच्या अनेक सुज्ञ म्हणींचा या नाही तर त्या मार्गांनी दररोजच्या संभाषणात वापर केला जातो. त्यांपैकी काही म्हणी खाली दिल्या आहेत:

वचनाला जागणे.मत्तय ५:३७.

या कानाचे त्या कानास कळू न देणे.मत्तय ६:३.

कोणीहि दोन डगरींवर पाय ठेवू शकत नाही.मत्तय ६:२४.

दुसऱ्‍याच्या डोळ्यांतले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यांतले मुसळ दिसत नाही.मत्तय ७:३.

गाढवाला गुळाची काय चव?मत्तय ७:६.

ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल.मत्तय ९:१२

मानव इतिहासावर येशूने आपली छाप पाडली आहे हे एकशे एक टक्का खरे असले तरीसुद्धा, पुष्कळ लोकांचे त्याच्याबद्दल वेगवेगळे मत आहे. त्यामुळे मग तुमच्या मनात असा प्रश्‍न येईल, की “येशू ख्रिस्त नेमका कोण आहे?” येशू या पृथ्वीवर कोठून आला, पृथ्वीवर असताना त्याचे जीवन कसे होते आणि तो का मरण पावला याबद्दलची माहिती फक्‍त बायबलमध्ये दिलेली आहे. ही सत्ये तुम्हाला माहीत झाली की आता आणि भविष्यातही तुमच्या जीवनावर बराच प्रभाव पडेल. (w११-E ०४/०१)

[तळटीप]

^ नासरेथाहून आलेल्या या संदेष्ट्याचे नाव “येशू” होते. या नावाचा अर्थ, “यहोवा तारण आहे,” असा होतो. “ख्रिस्त” ही त्याची पदवी आहे, जिचा अर्थ “अभिषिक्‍त जण” असा होतो. यावरून असे सूचित होते, की येशू अभिषिक्‍त होता किंवा एका खास हुद्द्‌यासाठी देवाने त्याला अभिषिक्‍त अथवा नियुक्‍त केले होते.