व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मेलेल्या लोकांसाठी काही आशा आहे का?

मेलेल्या लोकांसाठी काही आशा आहे का?

देवाच्या वचनातून शिका

मेलेल्या लोकांसाठी काही आशा आहे का?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे पाहायला मिळतील हे या लेखात सांगण्यात आले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. मेलेल्या लोकांसाठी काय आशा आहे?

जेरूसलेमजवळील बेथानी याठिकाणी जेव्हा येशू आला तेव्हा, तेथे राहणारा त्याचा मित्र लाजर याला मरून चार दिवस झाले होते. लाजरच्या दोन बहिणी मरीया आणि मार्था यांच्याबरोबर येशू कबरेपर्यंत गेला. पुष्कळ लोक तेथे आले होते. येशूने लाजरला पुन्हा जिवंत केल्यावर मरीया आणि मार्थाला किती आनंद झाला असेल याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही.—योहान ११:२०-२४, ३८-४४ वाचा.

मेलेले लोक पुन्हा जिवंत होतील हा विश्‍वास मार्थाला होता. यहोवाच्या प्राचीन काळच्या विश्‍वासू लोकांना पक्की खात्री होती, की पृथ्वीवर राहण्यासाठी मेलेल्या लोकांना देव भविष्यात पुन्हा जिवंत करेल.—ईयोब १४:१४, १५ वाचा.

२. मेलेल्या लोकांची स्थिती काय आहे?

मानव आणि प्राणी फक्‍त एका जीवनी शक्‍तीमुळे जिवंत राहतात. मनुष्यात अमर आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नसते जी त्याच्या मृत्यूनंतर जिवंत राहते. (उपदेशक ३:१९; उत्पत्ति ७:२१, २२) आपण मातीपासून बनलेले प्राणी आहोत. (उत्पत्ति २:७; ३:१९) आपला मेंदू कार्य करायचे थांबतो तेव्हाच आपले विचारही नष्ट होतात. म्हणूनच, लाजरला पुन्हा जिवंत केल्यावर त्याला मृत अवस्थेत कसे वाटत होते याबद्दल तो काहीही बोलला नाही; कारण, मृत लोक बेशुद्ध असतात.—स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५, १० वाचा.

होय, मृत लोकांना काहीही दुःख होत नाही. त्यामुळे, मेल्यानंतर देव त्यांना यातना देतो ही शिकवण चुकीची आहे. ही शिकवण देवाचे नाव खराब करणारी शिकवण आहे. लोकांना आगीत जळत ठेवण्याची कल्पनाच त्याला किळसवाणी वाटते.—यिर्मया ७:३१ वाचा.

३. आपण मेलेल्या लोकांशी बोलू शकतो का?

मेलेले लोक बोलू शकत नाहीत. (स्तोत्र ११५:१७) पण, जेव्हा दुष्ट देवदूत लोकांशी बोलतात तेव्हा ते लोकांना असे भासवण्याचा प्रयत्न करतात, की मेलेले लोक त्यांच्याबरोबर बोलत आहेत. (२ पेत्र २:४) मेलेल्या लोकांशी बोलण्याचा यहोवा निषेध करतो.—अनुवाद १८:१०, ११ वाचा.

४. कोणाला पुन्हा जिवंत केले जाईल?

येणाऱ्‍या नवीन जगात, मेलेल्या कोट्यवधी लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल. ज्यांनी वाईट कामे केली आहेत त्यांनाही जिवंत केले जाईल कारण त्यांना यहोवाबद्दलचे ज्ञान घेण्याची संधी मिळाली नव्हती.—लूक २३:४३, सुबोध भाषांतर; प्रेषितांची कृत्ये २४:१५ वाचा.

पुन्हा जिवंत केलेल्या लोकांना देवाबद्दल सत्य जाणून घेण्याची आणि येशूची आज्ञा मानण्याद्वारे त्याच्यावर विश्‍वास ठेवण्याची संधी मिळेल. (प्रकटीकरण २०:११-१३) ज्यांना पुन्हा जिवंत केले आहे त्यांनी चांगली कामे केली तर पृथ्वीवर त्यांना नेहमीचे जीवन मिळेल. पण पुन्हा जिवंत केलेले काहीजण वाईट कामे करत राहतील. अशा लोकांच्या वाईट कृत्यांनुसार त्यांचा न्याय केला जाणार असल्यामुळे त्यांचे पुनरुत्थान ‘न्यायाचे पुनरुत्थान’ ठरेल.—योहान ५:२८, २९ वाचा.

५. मेलेल्यांना पुन्हा जिवंत करण्याच्या आशेवरून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?

मेलेल्यांना पुन्हा जिवंत करणे शक्य आहे कारण देवाने आपल्याकरता त्याच्या मुलाला त्याचे जीवन देण्यासाठी पाठवले. यावरून, देवाचे प्रेम आणि त्याची निरंतर प्रेमदया दिसून येते.—योहान ३:१६; रोमकर ६:२३ वाचा. (w११-E ०६/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ६ आणि पाहा.

[२० पानांवरील चित्र]

आदामाला मातीपासून बनवण्यात आले होते