व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे राज्य काय आहे?

देवाचे राज्य काय आहे?

देवाच्या वचनातून शिका

देवाचे राज्य काय आहे?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. देवाचे राज्य काय आहे?

देवाचे राज्य हे एक स्वर्गीय सरकार आहे. ते सर्व मानवी सरकारांना काढून त्यांच्याऐवजी राज्य करणार आहे आणि स्वर्गात व पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करणार आहे. तर देवाचे राज्य हेच आपल्याला हवे असलेले एकमात्र चांगले सरकार आहे.दानीएल २:४४; मत्तय ६:९, १० वाचा.

राज्य म्हटले की राजा आलाच. यहोवा देवाने त्याचा पुत्र येशू याला त्याच्या राज्याचा राजा म्हणून नियुक्‍त केले आहे.लूक १:३०-३३ वाचा.

२. येशू हा एक सुयोग्य राजा का आहे?

देवाचा पुत्र येशू त्या राज्याचा सुयोग्य राजा आहे कारण तो दयाळू, जे बरोबर आहे त्याबद्दल ठाम आणि लोकांना मदत करण्यास सामर्थ्यशाली आहे. (मत्तय ११:२८-३०) येशूला देवाने पुन्हा जिवंत केल्यानंतर तो स्वर्गात गेला व यहोवाच्या उजव्या हाताला थांबून राहिला. (इब्री लोकांस १०:१२, १३) सरतेशेवटी देवाने त्याला स्वर्गातून राज्य करण्याचा अधिकार दिला.दानीएल ७:१३, १४ वाचा.

३. येशूसोबत आणखी कोण राज्य करतील?

स्वर्गामध्ये येशूसोबत राज्य करण्याकरता देवाने काही लोकांना निवडले. या गटाला “पवित्र जन” असे संबोधले जाते. (दानीएल ७:२७) प्रथम येशूच्या विश्‍वासू प्रेषितांना पवित्र जन होण्यास निवडण्यात आले. आजही यहोवा, विश्‍वासू स्त्रीपुरुषांना पवित्र जन होण्यास निवडत आहे. येशूप्रमाणेच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना आत्मिक शरीरात उठवले जाते.योहान १४:१-३; १ करिंथकर १५:४२-४५ वाचा.

स्वर्गात किती लोक जातील? स्वर्गात जाणाऱ्‍यांना येशूने ‘लहान कळप’ असे संबोधले. (लूक १२:३२) त्यांची एकूण संख्या १,४४,००० इतकी असेल व ते येशूसोबत स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करतील.प्रकटीकरण ५:९, १०; १४:१ वाचा.

४. देवाच्या राज्याने केव्हापासून राज्य करायला सुरुवात केली?

येशू, १९१४ मध्ये राजा झाला. * त्यानंतर थोड्या काळातच त्याने सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर फेकले. (प्रकटीकरण १२:७-१०, १२) तेव्हापासून मानवजातीच्या समस्यांत कमालीची वाढ झाली आहे. युद्धे, भूकंप, अन्‍नटंचाई, साथींचे रोग आणि अनीती हे, सध्याचे व्यवस्थीकरण शेवटल्या घटकेत असलेल्या चिन्हाचा एक भाग आहे. (२ तीमथ्य ३:१-५) देवाच्या राज्याचा फायदा मिळवू इच्छिणाऱ्‍यांनी, या राज्याचा राजा असलेल्या येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनण्यास शिकले पाहिजे.लूक २१:७, १०, ११, ३१, ३४, ३५ वाचा.

५. देवाचे राज्य मानवजातीसाठी काय करणार आहे?

देवाचे राज्य, संपूर्ण जगभरात चाललेल्या प्रचार कार्याद्वारे सर्व राष्ट्रांतील लोकांना देवाच्या मार्गांबद्दल शिकण्यास मदत करत आहे. (मत्तय २४:१४) हे राज्य पृथ्वीवरील सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करेल तेव्हा ते येशूच्या एकनिष्ठ प्रजेचे अर्थात ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ संरक्षण करेल.प्रकटीकरण ७:९, १०, १३-१७ वाचा.

मग १,००० वर्षांच्या कालावधीत हे राज्य या पृथ्वीला हळूहळू नंदनवन बनवेल. आणि सरतेशेवटी येशू हे राज्य पुन्हा आपल्या पित्याच्या हवाली करेल. (१ करिंथकर १५:२४-२६) देवाच्या या राज्याबद्दल तुम्ही इतरांना सांगू इच्छिता का?स्तोत्र ३७:१०, ११, २९ वाचा. (w११-E ०७/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय ८ व ९ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?

[तळटीप]

^ परि. 13 बायबलमधील भविष्यवाण्या, १९१४ हे वर्ष कसे दाखवतात याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची पृष्ठे २१५-२१८ पाहा.