व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा “शांतीचा देव” आहे

यहोवा “शांतीचा देव” आहे

यहोवा “शांतीचा देव” आहे

“शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.”—रोम. १५:३३.

१, २. उत्पत्ति ३२ व ३३ अध्यायांत आपण कोणत्या घटनेविषयी वाचतो? त्याच्या शेवटी काय घडले?

 कल्पना करा: दोन भाऊ एकमेकांना भेटणार आहेत. ते यार्देन नदीच्या पूर्वेकडे, यब्बोक खोऱ्‍यानजीक, पनिएलजवळ भेटणार आहेत. हे दोघे भाऊ एसाव व याकोब आहेत आणि कितीतरी वर्षे ते एकमेकांना भेटलेले नाहीत. वीस वर्षांपूर्वी, एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क आपल्या भावाला अर्थात याकोबाला विकला होता. याकोब पुन्हा घरी येत आहे हे एसावाने ऐकले तेव्हा तो ४०० पुरुषांसह याकोबाला भेटायला गेला. याकोबाने हे ऐकले तेव्हा तो खूप घाबरला. आपल्या भावाच्या मनात अजूनही आपल्याबद्दल राग आहे व तो आपला जीव घेऊ इच्छितो असे त्याला वाटले. त्यामुळे, याकोबाने एसावाला आपल्या चाकरांच्या हातून गुराढोरांच्या स्वरूपात एका पाठोपाठ एक अनेक भेटी पाठवल्या. याकोबाचे चाकर प्रत्येक वेळी पहिल्यापेक्षा अधिक गुरेढोरे घेऊन एसावाकडे गेले आणि ही गुरेढोरे त्याच्या भावाने त्याच्याकरता पाठवलेली भेट आहे असे त्यांनी एसावाला सांगितले. अशा रीतीने याकोबाने ५५० पेक्षा अधिक गुरेढोरे एसावाला पाठवली.

दोघे भाऊ शेवटी भेटले तेव्हा काय घडले? याकोबाने धैर्य व नम्रता दाखवली. तो एसावाकडे चालत गेला आणि त्याने आपल्या भावासमोर सात वेळा नमन केले! पण, असे करण्याआधी याकोबाने एक सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट केली होती. ती म्हणजे, त्याने यहोवाला प्रार्थना केली व एसावापासून आपले संरक्षण करण्याची याचना केली. यहोवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. कारण बायबल आपल्याला सांगते, की एसाव त्याला भेटण्यासाठी धावत गेला; त्याने त्याला आलिंगन दिले व त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले.—उत्प. ३२:११-२०; ३३:१-४.

३. याकोब व एसाव यांच्या घटनेवरून आपण काय शिकतो?

या घटनेवरून दिसते, की मंडळीत जर आपले कोणासोबत काही बिनसले असेल, तर त्यांच्यासोबत शांतीचे संबंध राखण्यासाठी आपण आपल्या परीने शक्य ते केले पाहिजे. आपण असे केले नाही, तर मंडळीतील शांती व एकता भंग होऊ शकते. याकोबाने काहीच चूक केली नव्हती. त्यामुळे त्याला एसावाला क्षमा मागण्याची गरज नव्हती. खरेतर, एसावालाच आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काची किंमत नव्हती व त्याने केवळ एक वेळच्या अन्‍नासाठी आपला हक्क याकोबाला विकून टाकला होता. तरीसुद्धा, याकोबाने एसावासोबत शांतीचे संबंध राखण्यासाठी आपल्या परीने शक्य ते केले. (उत्प. २५:३१-३४; इब्री १२:१६) याकोबाचे उदाहरण दाखवते, की आपल्या बंधुभगिनींसोबत शांतीचे संबंध राखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याचे उदाहरण हेही दाखवते, की इतरांसोबत शांतीचे संबंध राखण्यासाठी आपण यहोवाला मदत मागतो, तेव्हा तो आपल्या प्रार्थना ऐकतो. आपण इतरांसोबत शांतीचे संबंध कसे राखू शकतो हे दाखवणारी अनेक उदाहरणे बायबलमध्ये आहेत. त्यांपैकी काहींची आता आपण चर्चा करू या.

अनुसरण करण्याजोगे सर्वोत्तम उदाहरण

४. मानवजातीला पाप व मृत्यूपासून वाचवण्यासाठी देवाने काय केले?

शांती राखण्याच्या बाबतीत यहोवा एक सर्वोत्तम उदाहरण मांडतो. तो “शांतीचा देव” आहे. (रोम. १५:३३) आपल्याला त्याचे मित्र बनणे शक्य व्हावे म्हणून यहोवाने काय-काय केले त्याचा विचार करा. आपण आदाम व हव्वेचे वंशज असल्यामुळे आपण पाप करतो. आणि जे पाप करतात ते मृत्यूदंडास पात्र ठरतात. (रोम. ६:२३) पण, देवाचे आपल्यावर नितान्त प्रेम असल्यामुळे, पाप व मृत्यूपासून आपल्याला वाचवण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने आपला प्रिय पुत्र, येशू याला एक परिपूर्ण मनुष्य म्हणून जन्म घेण्यासाठी व आपल्या पापांकरता मरण पावण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर पाठवले. आणि येशूसुद्धा आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास व आपल्यासाठी त्याचे जीवन बलिदान करण्यास स्वखुषीने तयार झाला. (योहा. १०:१७, १८) मग, यहोवाने येशूला स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केले. स्वर्गात येशूने यहोवाला आपल्या बलिदानाचे मोल सादर केले. हे बलिदान किंवा खंडणी, आपल्या पापांसंबंधी पश्‍चात्ताप करणाऱ्‍या सर्वांना अनंतकालिक मृत्यूपासून वाचवते.इब्री लोकांस ९:१४, २४ वाचा.

५, ६. येशूच्या बलिदानामुळे मानवांना देवाचे मित्र बनणे कसे शक्य होते?

मानव आपल्या पापामुळे देवाचे शत्रू बनले. येशूचे बलिदान मानवांना कसे साहाय्य करते? यशया ५३:५ म्हणते: “आम्हास शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.” येशूच्या बलिदानामुळे आज्ञाधारक मानवांना देवाचे मित्र बनणे शक्य होते. बायबल असेही म्हणते: “त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”—इफिस. १:७.

बायबल येशूविषयी असे म्हणते: ‘त्याच्याठायी सर्व पूर्णता वसावी हे पित्याला बरे वाटले.’ याचा अर्थ, देव आपला उद्देश पूर्ण करण्याकरता येशूचा उपयोग करतो. आणि देवाचा हा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश, येशू ख्रिस्ताच्या रक्‍ताच्या द्वारे शांती करून सर्व गोष्टी, मग त्या पृथ्वीवरील असोत अथवा स्वर्गातील, त्यांचा स्वतःबरोबर समेट करणे हा आहे. तर मग, देव ज्यांच्याशी समेट करतो म्हणजे ज्यांना आपले मित्र बनू देतो त्या “पृथ्वीवरील” व “स्वर्गातील” गोष्टी काय आहेत?कलस्सैकर १:१९, २० वाचा.

७. देवासोबत शांतीचे संबंध प्रस्थापित केलेल्या “स्वर्गातील” व “पृथ्वीवरील” गोष्टी काय आहेत?

खंडणीच्या तरतुदीमुळे, ‘नीतिमान ठरविलेल्या’ अभिषिक्‍त जनांना देवाचे पुत्र या नात्याने “देवाबरोबर शांति” राखणे शक्य झाले आहे. (रोमकर ५:१ वाचा.) या अभिषिक्‍त जनांना “स्वर्गातील” गोष्टी असे म्हटले आहे कारण त्यांना स्वर्गीय जीवनाची आशा आहे आणि ते “पृथ्वीवर राज्य करितील” व देवासाठी याजक या नात्याने सेवा करतील. (प्रकटी. ५:१०) दुसरीकडे पाहता, “पृथ्वीवरील” गोष्टी, पश्‍चात्तापी मानवांना सूचित करतात ज्यांना शेवटी पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.—स्तो. ३७:२९.

८. मानवांना यहोवासोबत शांतीचे संबंध राखता यावेत म्हणून यहोवाने जे काही केले त्याचा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही काय करण्यास प्रवृत्त होता?

यहोवाने केलेल्या या तरतुदीबद्दल मनस्वी कृतज्ञता व्यक्‍त करताना पौलाने इफिसमधील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिले: “देव दयासंपन्‍न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताहि त्याने . . . ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे).” (इफिस. २:४, ५) आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील जीवनाची, देवाने दाखवलेल्या या अपार दयेबद्दल व कृपेबद्दल आपण त्याचे खूप ऋणी आहोत. मानवजातीला त्याच्यासोबत शांतीचे संबंध राखता यावेत म्हणून यहोवाने जे काही केले त्याचा आपण विचार करतो तेव्हा आपले अंतःकरण कृतज्ञतेने दाटून येते. तर मग, मंडळीची एकता धोक्यात येईल असे प्रसंग आपल्यासमोर येतात तेव्हा देवाच्या या उदाहरणावर मनन करून आपण शांती प्रस्थापित करण्यास प्रवृत्त होऊ नये का?

अब्राहामाच्या व इसहाकाच्या उदाहरणांवरून शिकणे

९, १०. अब्राहाम व लोट यांच्या गुराख्यांमध्ये तणाव निर्माण झाला तेव्हा अब्राहामाने कसे दाखवून दिले की तो शांती राखणारा आहे?

कुलपिता अब्राहाम याच्याविषयी बायबल म्हणते: “‘अब्राहामाने’ देवावर विश्‍वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले; आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले; हा शास्त्रलेख पूर्ण झाला.” (याको. २:२३) अब्राहामाचा विश्‍वास त्याच्या शांतीप्रिय मार्गांवरून दिसून आला. उदाहरणार्थ, अब्राहामाच्या गुराढोरांची संख्या वाढली तेव्हा त्याच्या आणि त्याचा पुतण्या लोट याच्या गुराख्यांमध्ये तणाव निर्माण झाला. (उत्प. १२:५; १३:७) यावर एकच तोडगा होता; तो म्हणजे त्या दोघांनी एकमेकांपासून दूर जाणे. ही नाजूक परिस्थिती अब्राहाम कशी हाताळणार होता? आपण वयाने मोठे आहोत व देवासोबत आपली खास मैत्री आहे म्हणून आपल्यालाच अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे असा विचार अब्राहामाने केला नाही. या उलट, त्याने दाखवून दिले की त्याला आपल्या पुतण्यासोबत शांतीचे संबंध राखायची इच्छा होती.

१० अब्राहामाने आपल्या पुतण्याला म्हटले: “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो.” त्याने पुढे म्हटले: “सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन; तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.” लोटाने देशातील सगळ्यात सुपीक जमीन निवडली, पण त्याबद्दल अब्राहामाने मनात राग बाळगला नाही. (उत्प. १३:८-११) नंतर, शत्रूंनी लोटाला बंदी करून नेले तेव्हा त्यांच्या हातून आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी अब्राहामाने लगेच पाऊल उचलले.—उत्प. १४:१४-१६.

११. अब्राहामाने आपल्या शेजाऱ्‍यांशी अर्थात पलिष्ट्यांशी शांतीचे संबंध राखण्याचा कसा प्रयत्न केला?

११ अब्राहाम कनान देशात राहत असताना त्याने आपल्या शेजाऱ्‍यांशी अर्थात पलिष्ट्यांशी कशा प्रकारे शांतीचे संबंध राखण्याचा प्रयत्न केला त्याचाही विचार करा. अब्राहामाच्या सेवकांनी बैर-शेबा येथे खणलेली पाण्याची एक विहीर पलिष्ट्यांनी “बळकावली होती.” या पूर्वी अब्राहामाने, आपल्या पुतण्याला बंदी बनवून नेणाऱ्‍या चार राजांच्या हातून त्याला सोडवले होते; पण, या प्रसंगी तो कसे वागणार होता? पलिष्ट्यांशी भांडण करून त्यांच्याकडून आपली विहीर परत घेण्याऐवजी अब्राहाम शांत राहिला. काही काळानंतर, पलिष्ट्यांचा राजा अब्राहामाशी शांतीचा करार करण्यासाठी त्याच्याकडे आला. राजाने अब्राहामाला अशी शपथ घ्यायला लावली की तो राजाच्या वंशजांशी प्रेमाने वागेल. अब्राहामाने शपथ घेतली आणि त्यानंतरच चोरलेल्या विहिरीचा विषय राजाजवळ काढला. आपल्या चाकरांनी अब्राहामाची विहीर चोरली आहे हे ऐकून राजाला धक्का बसला आणि त्याने ती विहीर अब्राहामाला परत केली. आणि अब्राहाम त्या देशात एक उपरी म्हणून शांतीने राहू लागला.—उत्प. २१:२२-३१, ३४.

१२, १३. (क) इसहाकाने आपल्या पित्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे केले? (ख) इसहाकाने शांतीप्रिय मार्ग अनुसरल्यामुळे यहोवाने त्याला कसे आशीर्वादित केले?

१२ अब्राहामाचा पुत्र इसहाक यानेदेखील आपल्या पित्याच्या शांतीप्रिय मार्गांचे अनुसरण केले. तो पलिष्ट्यांशी ज्या प्रकारे वागला त्यावरून हे दिसून येते. दुष्काळ पडल्यामुळे इसहाकाने आपले बिऱ्‍हाड नेगेबच्या शुष्क प्रदेशातील लहाय-रोई येथून उत्तरेस म्हणजे पलिष्ट्यांच्या प्रदेशातील गरार या अधिक सुपीक प्रदेशात हालवले. तेथे यहोवाने इसहाकाला भरपूर पीक व गुरेढोरे देऊन आशीर्वादित केले. त्यामुळे पलिष्ट्यांना त्याचा हेवा वाटू लागला. इसहाकाची त्याच्या पित्याप्रमाणे भरभराट होऊ नये म्हणून अब्राहामाने त्या प्रदेशात खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या. शेवटी, पलिष्ट्यांच्या राजाने इसहाकाला ‘आपल्यामधून निघून जाण्यास’ सांगितले. पलिष्ट्यांशी शांतीचे संबंध राखण्यासाठी इसहाक त्यांच्यामधून निघून गेला.—उत्प. २४:६२; २६:१, १२-१७.

१३ इसहाकाने आपले बिऱ्‍हाड आणखी दूर हालवल्यानंतर, त्याच्या गुराख्यांनी आणखी एक विहीर खणली, तेव्हा “हे पाणी आमचे आहे” असा पलिष्टी गुराख्यांनी दावा केला. त्यावर इसहाक आपला पिता अब्राहाम याच्याप्रमाणे शांत राहिला; तो त्यांच्याशी भांडला नाही. उलट, त्याने आपल्या सेवकांना सांगून आणखी एक विहीर खणली. या विहिरीवरदेखील पलिष्ट्यांनी आपला हक्क सांगितला. त्यांच्याशी शांतीचे संबंध राखण्याच्या हेतूने इसहाकाने आपले मोठे बिऱ्‍हाड दुसरीकडे हालवले. तेथे त्याच्या सेवकांनी एक विहीर खणली व तिचे नाव रहोबोथ असे ठेवले. काही काळानंतर, तो बैर-शेबाच्या अधिक सुपीक प्रदेशात जाऊन राहू लागला. तेथे यहोवाने त्याला आशीर्वादित केले आणि म्हटले: “भिऊ नको, कारण मी तुजबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतति बहुगुणित करीन.”—उत्प. २६:१७-२५.

१४. पलिष्ट्यांचा राजा इसहाकासोबत शांतीचा करार करण्यासाठी आला तेव्हा इसहाकाने कसे दाखवून दिले, की त्याला त्याच्यासोबत शांतीचे संबंध राखायचे होते?

१४ इसहाकाच्या सेवकांनी खणलेल्या सर्व विहिरी वापरण्याचा इसहाकाला हक्क होता आणि त्या हक्कासाठी लढण्याची क्षमताही त्याच्याजवळ होती. पण, पलिष्ट्यांशी भांडण करण्याऐवजी, इसहाकाने शांती राखण्याच्या हेतूने कितीतरी वेळा दुसरीकडे जाऊन स्थायिक होण्याची निवड केली. पुढे, पलिष्ट्यांचा राजा व त्याचे अधिकारी त्याला भेटण्यासाठी व त्याच्याशी शांतीचा करार करण्यासाठी बैर-शेबा येथे त्याच्याकडे आले व त्याला म्हणाले: “परमेश्‍वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हास स्पष्ट दिसून आले आहे.” या प्रसंगीसुद्धा, इसहाकाने दाखवून दिले की त्याला त्यांच्यासोबत शांतीचे संबंध राखायचे होते. बायबलचा ऐतिहासिक अहवाल म्हणतो: “त्याने [आपल्या पाहुण्यांना] मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले. त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली; मग इसहाकाने त्यांस वाटेस लावले, आणि ते . . . शांतीने गेले.”—उत्प. २६:२६-३१.

योसेफाच्या उदाहरणावरून शिकणे

१५. योसेफाचे भाऊ त्याच्याशी शांतीने का बोलू शकत नव्हते?

१५ इसहाकाचा पुत्र याकोब हा एक “साधा मनुष्य” होता. (उत्प. २५:२७) लेखाच्या सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे याकोबाने आपला भाऊ एसाव याच्यासोबत शांतीचे संबंध राखण्याचा प्रयत्न केला. आपला पिता, इसहाक याच्या शांतीप्रिय उदाहरणाचा याकोबाला नक्कीच फायदा झाला होता. पण, याकोबाच्या पुत्रांविषयी काय म्हणता येईल? त्याच्या १२ पुत्रांपैकी योसेफ या त्याच्या पुत्रावर त्याचे सगळ्यात जास्त प्रेम होते. योसेफ आज्ञाधारक होता व त्याला आपल्या पित्याविषयी आदर होता. त्यामुळे याकोब त्याच्यावर भरवसा ठेवू शकत होता. (उत्प. ३७:२, १४) पण, योसेफाचे भाऊ त्याचा इतका मत्सर करू लागले की ते त्याच्याशी शांतीने बोलूच शकत नव्हते. ते योसेफाशी क्रूरपणे वागले. त्यांनी त्याला एक गुलाम म्हणून विकून टाकले आणि एका हिंस्र पशूने त्याला मारून टाकले आहे असा विश्‍वास करण्यास आपल्या पित्याला भाग पाडले.—उत्प. ३७:४, २८, ३१-३३.

१६, १७. योसेफाने कसे दाखवून दिले, की त्याला आपल्या भावांशी शांतीचे संबंध राखायचे होते?

१६ यहोवा योसेफासोबत होता. कालांतराने, योसेफ इजिप्तचा प्रधान मंत्री म्हणजे फारोनंतर सगळ्यात शक्‍तीशाली व्यक्‍ती बनला. देशात भयंकर दुष्काळ पडल्यामुळे योसेफाचे भाऊ अन्‍नसाम्रगी मिळवण्यासाठी इजिप्तमध्ये आले, तेव्हा त्यांनी त्याला ओळखलेसुद्धा नाही, कारण त्याने इजिप्तच्या अधिकाऱ्‍यांसारखा पेहराव केला होता. (उत्प. ४२:५-७) आपले भाऊ आपल्याशी व आपल्या पित्याशी क्रूरपणे वागले होते त्यामुळे योसेफ सहज त्यांचा बदला घेऊ शकला असता. पण, त्याने तसे केले नाही. उलट, त्याने त्यांच्याशी शांतीचे संबंध राखण्याचा प्रयत्न केला. आपल्या भावांनी खरोखर पश्‍चात्ताप केला आहे हे स्पष्टपणे दिसून आले तेव्हा त्याने त्यांना आपली ओळख करून दिली व म्हटले: “तुम्ही मला या देशात विकून टाकिले याबद्दल आता काही दुःख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठविले.” मग त्याने आपल्या सर्व भावांचे मुके घेतले व तो रडला.—उत्प. ४५:१, ५, १५.

१७ आपला पिता याकोब याच्या मृत्यूनंतर, योसेफ आपला बदला घेईल असे त्याच्या भावांना वाटले. आपली ही भीती त्यांनी योसेफाजवळ व्यक्‍त केली तेव्हा त्याला “रडू आले” आणि तो त्यांना म्हणाला: “भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” शांतीप्रिय वृत्तीच्या योसेफाने “त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.”—उत्प. ५०:१५-२१.

“सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले”

१८, १९. (क) या लेखात, शांती राखण्याच्या बाबतीत आपण ज्या उदाहरणांची चर्चा केली त्यांवरून तुम्हाला काय शिकायला मिळाले? (ख) आपण पुढील लेखात कशाची चर्चा करणार आहोत?

१८ पौलाने लिहिले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोम. १५:४) आपण यहोवाच्या सर्वोत्तम उदाहरणावरून तसेच अब्राहाम, इसहाक, याकोब व योसेफ यांच्या उदाहरणांवरून काय शिकलो?

१९ यहोवाने त्याच्यामधील व पापी मानवजातीमधील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी काय-काय केले यावर आपण कृतज्ञ अंतःकरणाने विचार करतो तेव्हा इतरांसोबत शांतीचे संबंध राखण्याची प्रेरणा आपल्याला मिळत नाही का? अब्राहाम, इसहाक, याकोब व योसेफ यांची उदाहरणे दाखवून देतात, की पालक आपल्या मुलांवर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात. शिवाय, बायबलमधील या वृत्तान्तांवरून हेदेखील दिसून येते, की जे शांती राखण्याचा प्रयत्न करतात त्यांना यहोवा आशीर्वादित करतो. म्हणूनच, पौल यहोवाचा उल्लेख “शांतीचा देव” असे करतो याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. (रोमकर १५:३३; १६:२० वाचा.) आपण इतरांशी शांतीचे संबंध राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे पौलाने का म्हटले व आपण शांती राखणारे कसे बनू शकतो याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• याकोब एसावाला भेटणार होता तेव्हा त्याने कशा प्रकारे त्याच्याशी शांतीचे संबंध राखण्याचा प्रयत्न केला?

• मानवजातीला यहोवाशी शांतीचे संबंध राखता यावेत म्हणून यहोवाने खूप काही केले आहे; त्याचा विचार केल्याने तुम्ही काय करण्यास प्रवृत्त होता?

• इतरांशी शांतीचे संबंध राखण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या अब्राहाम, इसहाक, याकोब व योसेफ यांच्या उदाहरणांवरून तुम्ही काय शिकलात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रे]

एसावासोबत शांती राखण्याचा प्रयत्न करताना याकोबाने कोणती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली होती?