व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे कुटुंब आनंदी कसे होऊ शकते?

तुमचे कुटुंब आनंदी कसे होऊ शकते?

देवाच्या वचनातून शिका

तुमचे कुटुंब आनंदी कसे होऊ शकते?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. कुटुंब सुखी होण्यासाठी विवाह महत्त्वाचा का आहे?

आनंदी देव, यहोवाने विवाहाची स्थापना केली. सुखी कुटुंबासाठी विवाह महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे फक्‍त एकमेकांना सहवासच मिळत नाही तर मुलांचे संगोपन करण्याजोगे सुरक्षित वातावरणही निर्माण होते. विवाहाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे? स्त्री आणि पुरूष यांचा कायदेशीर विवाह झाला पाहिजे आणि तो नेहमी टिकून राहिला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. (लूक २:१-५) पती-पत्नीने एकमेकांप्रती एकनिष्ठा दाखवावी अशी देवाची इच्छा आहे. (इब्री लोकांस १३:४) व्यभिचार या एकमात्र आधारावरच घटस्फोट घेण्यास आणि पुनर्विवाह करण्यास यहोवा ख्रिश्‍चनांना अनुमती देतो.—मत्तय १९:३-६,  वाचा.

२. पती-पत्नीने एकमेकांशी कसे वागले पाहिजे?

विवाहात एकमेकांना साहाय्य करण्याच्या हेतूने यहोवाने स्त्री आणि पुरुषाला बनवले. (उत्पत्ति २:१८) कुटुंबप्रमुख या नात्याने पतीने कुटुंबाच्या भौतिक गरजा पुरवल्या पाहिजेत आणि कुटुंबाला देवाबद्दल शिकवले पाहिजे. त्याने त्याच्या पत्नीवर निःस्वार्थ प्रेम केले पाहिजे. पती-पत्नीने एकमेकांना प्रेम व आदर दाखवला पाहिजे. सर्व पती-पत्नी अपरिपूर्ण असल्यामुळे क्षमा करण्यास शिकणे ही सुखी विवाहाची गुरुकिल्ली आहे.—इफिसकर ४:३१, ३२; ५:२२-२५, ३३; १ पेत्र ३:७ वाचा.

३. विवाह सुखी नसल्यास तुम्ही तुमच्या विवाहसोबत्याला सोडावे का?

तुमच्यात आणि तुमच्या विवाहसोबत्यात काही समस्या असतील तर एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. (१ करिंथकर १३:४, ५) देवाचे वचन, वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी पती-पत्नीला एकमेकांपासून विभक्‍त होण्याची अनुमती देत नाही. पण टोकाची परिस्थिती उद्‌भवल्यास, एकमेकांपासून विभक्‍त होणे योग्य आहे किंवा नाही हा निर्णय एक ख्रिस्ती घेऊ शकतो.—१ करिंथकर ७:१०-१३ वाचा.

४. मुलांनो, तुमच्याबद्दल देवाची काय इच्छा आहे?

तुम्ही आनंदी राहावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही तुमच्या तारुण्यावस्थेत आनंदी कसे राहावे याबद्दल तो तुम्हाला उत्तम सल्ला देतो. तुम्हाला तुमच्या पालकांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा फायदा व्हावा अशी देवाची इच्छा आहे. (कलस्सैकर ३:२०) यहोवाचा गौरव करण्यासाठी तुम्ही जे काही करता त्याची देव कदर करतो.—उपदेशक ११:९–१२:१; मत्तय १९:१३-१५; २१:१५, १६ वाचा.

५. पालकांनो, तुमची मुले आनंदी कशी होऊ शकतात?

तुमच्या मुलांना अन्‍न, वस्त्र आणि निवारा पुरवण्यासाठी तुम्ही कठीण परिश्रम केले पाहिजे. (१ तीमथ्य ५:८) पण मुलांनी आनंदी राहावे यासाठी तुम्ही त्यांना देवावर प्रेम करण्याचे आणि त्याच्याकडून शिकण्याचे उत्तेजन दिले पाहिजे. (इफिसकर ६:४) तुम्ही. यहोवावर दाखवत असलेल्या प्रेमाचा तुमच्या मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. देवाच्या वचनावर आधारित असणाऱ्‍या तुमच्या मार्गदर्शनाचा तुमच्या मुलाच्या विचारसरणीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.—अनुवाद ६:४-७; नीतिसूत्रे २२:६ वाचा.

तुम्ही मुलांना प्रोत्साहन देता आणि त्यांची प्रशंसा करता तेव्हा त्याचा त्यांना बराच फायदा होतो. पण त्यांना शिस्तीची आणि सुधारणुकीचीही गरज असते. अशा प्रशिक्षणामुळे त्यांना चुकीची वागणूक टाळण्यास मदत मिळते. (नीतिसूत्रे २२:१५) पण तरीही, शिस्त कधीही कडक किंवा निष्ठुर नसावी.—कलस्सैकर ३:२१ वाचा.

यहोवाचे साक्षीदार खासकरून पालकांना आणि मुलांना मदत करण्यासाठी अनेक पुस्तके प्रकाशित करतात. ही पुस्तके बायबलवर आधारित आहेत.—स्तोत्र १९:७, ११ वाचा. (w११-E १०/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय १४ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?