व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

बायबलमध्ये वाचलेल्या माहितीबद्दल किंवा एखाद्या वैयक्‍तिक समस्येबद्दल मला काही प्रश्‍न असल्यास मी काय करावे?

नीतिसूत्रे २:१-५ आपल्यापैकी प्रत्येकाला असा आर्जव करते, की आपण “गुप्त निधीप्रमाणे” सुज्ञतेचा व विवेकबुद्धीचा “शोध” करत राहावा. यावरून सूचित होते, की बायबलच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी व आपल्या वैयक्‍तिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण संशोधन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आपण हे कसे करू शकतो?

परमेश्‍वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए या हिंदी पुस्तकातील पृष्ठे ३३ ते ३८ वर, “खोजबीन कैसे करें” हा अध्याय आहे. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या साधनांचा उपयोग करून आपण संशोधन कसे करू शकतो हे त्या अध्यायात सांगितले आहे. (मत्त. २४:४५) पृष्ठ ३६ वर, वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स याचा वापर कसा करावा याचे स्पष्टीकरण दिले आहे. इंडेक्सच्या प्रत्येक आवृत्तीत विषयांची व शास्त्रवचनांची सूची दिलेली आहे. आपल्याला ज्या शब्दाविषयी किंवा बायबल वचनाविषयी प्रश्‍न आहे तो शब्द किंवा वचन इंडेक्समध्ये शोधल्यास, आपल्या प्रश्‍नाचे उत्तर ज्या प्रकाशनांत मिळेल त्यांचे संदर्भ आपल्याला सापडतील. तुम्हाला हवे असलेले विशिष्ट उत्तर किंवा मार्गदर्शन मिळवण्यासाठी संशोधन करत असताना धीर धरा. हे लक्षात असू द्या, की तुम्ही ‘गुप्त निधीचा’ शोध करत आहात. तेव्हा, वेळ व परिश्रम हे लागतीलच.

अर्थात, असे काही विषय किंवा शास्त्रवचने आहेत ज्यांची आपल्या प्रकाशनांत चर्चा करण्यात आलेली नाही. आणि काही वेळा असे होऊ शकते, की बायबलच्या ज्या विशिष्ट वचनावर तुम्हाला माहिती हवी आहे त्या वचनाची चर्चा आपल्या प्रकाशनांमध्ये केली असेल, पण तुमच्या विशिष्ट प्रश्‍नाचे उत्तर कदाचित त्यात नसेल. तसेच, बायबलच्या काही वृत्तान्तांत सर्व तपशील दिलेला नसेल. यामुळेसुद्धा आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होतात. म्हणून, आपल्या प्रत्येक प्रश्‍नाचे लगेच उत्तर मिळण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. ज्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्या प्रकाशनांत दिलेली नाहीत त्यांची उत्तरे काय असतील याविषयी अंदाज बांधण्याचे आपण टाळले पाहिजे. नाहीतर, “जी ईश्‍वरी व्यवस्था विश्‍वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्‍या, पण वाद मात्र उत्पन्‍न करणाऱ्‍या” प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात आपण गुंतले जाऊ शकतो. (१ तीम. १:४; २ तीम. २:२३; तीत ३:९) आपल्या प्रकाशनांत ज्या विषयांचे स्पष्टीकरण दिलेले नाही त्या विषयांवरील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर शाखा कार्यालयातील किंवा जागतिक मुख्यालयातील बांधव देऊ शकत नाहीत. जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व माहिती बायबलमध्ये दिलेली आहे. आणि ज्या गोष्टींविषयी बायबलमध्ये तपशीलवार माहिती नाही त्यांमुळे देवावर व त्याच्या वचनावर आपला अढळ विश्‍वास आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळते.—यहोवा के करीब आओ या हिंदी पुस्तकातील पृष्ठे १८५ ते १८७ पाहा.

पण, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या प्रश्‍नावर तुम्ही माहिती शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला त्या प्रश्‍नाचे उत्तर किंवा मार्गदर्शक माहिती मिळाली नाही, तर काय? तर त्याबद्दल एखाद्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीशी किंवा तुमच्या मंडळीतील एखाद्या वडिलांशी बोला. त्यांना बायबलचे पुरेसे ज्ञान व ख्रिस्ती जीवनाचा अनुभव आहे. ते तुमच्या जवळपास राहत असल्यामुळे आणि तुमची व तुमच्या परिस्थितीची त्यांना कल्पना असल्यामुळे, तुमच्या वैयक्‍तिक समस्येविषयी किंवा निर्णयाविषयी काही सल्ला हवा असल्यास ते आनंदाने तुम्हाला मदत करू शकतील. आणि आपल्या विशिष्ट चिंतांविषयी यहोवाला प्रार्थना करायला व त्याच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मागायला विसरू नका, ‘कारण परमेश्‍वर ज्ञान व सुज्ञता देतो.’—नीति. २:६; लूक ११:१३.