व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘मला प्रचार करणं कसं जमेल?’

‘मला प्रचार करणं कसं जमेल?’

‘मला प्रचार करणं कसं जमेल?’

गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करत असतानासुद्धा प्रचार कार्यात विश्‍वासूपणे भाग घेणाऱ्‍या, जगभरातील अनेक बंधुभगिनींची उल्लेखनीय उदाहरणे आपल्याजवळ आहेत. लिथुएनियाची राजधानी विल्निउसमध्ये राहत असलेल्या डालियाचेच उदाहरण घ्या.

डालियाचे वय पस्तीसच्या आसपास आहे. जन्मापासूनच तिला मस्तिष्काघाताचे (सेरिब्रल ॲपोप्लेक्सी) परिणाम भोगावे लागले आहेत. या रोगामुळे तिला लकवा मारला व गंभीर स्वरूपाचा वाचादोष झाला. त्यामुळे, ती जे बोलते ते फक्‍त तिच्या कुटुंबाच्या सदस्यांनाच कळते. डालिया आपली आई गलीना हिच्यासोबत राहते जी तिची काळजी घेते. डालियाचे जीवन दुःखाने व चिंतेने भरलेले असले, तरी ती नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगते. हे कसे शक्य आहे?

गलीना सांगते: “सन १९९९ मध्ये माझी चुलत बहीण अपोल्योनिया आम्हाला भेटायला आली. आमच्या लक्षात आलं की यहोवाची साक्षीदार असलेल्या अपोल्योनियाला बायबलचं चांगलं ज्ञान होतं. डालिया तिला बरेच प्रश्‍न विचारू लागली. लगेचच, डालियासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. डालिया जे बोलायची त्याचा अर्थ सांगण्यासाठी मी अधूनमधून त्यांच्यासोबत अभ्यासाला बसायचे. माझ्या लक्षात आलं की डालिया जे काही शिकत होती त्याचा तिला खरोखर खूप फायदा होत होता. त्यानंतर मीसुद्धा बायबल अभ्यासाची मागणी केली.”

डालियाला बायबलची सत्ये समजू लागली, तसा एक प्रश्‍न तिला त्रास देऊ लागला. शेवटी, धैर्य एकवटून तिने अपोल्योनियाला विचारले: “माझ्यासारख्या लकवा मारलेल्या मुलीला प्रचार करणं कसं जमेल?” (मत्त. २८:१९, २०) अपोल्योनियाने तिला शांतपणे आश्‍वासन दिले: “घाबरू नकोस. यहोवा तुला मदत करेल.” होय, यहोवा खरोखर मदत करतो.

तर मग, डालिया कशा प्रकारे प्रचार करते? अनेक मार्गांनी. पत्रांद्वारे इतरांना बायबलचा संदेश सांगण्याकरता ख्रिस्ती बहिणी तिला पत्रे लिहिण्यास मदत करतात. प्रथम, डालिया आपले विचार त्या बहिणींना सांगते. मग, या बहिणी तिचे विचार पत्रात मांडतात. याशिवाय, डालिया आपल्या मोबाईलवरून मेसेज पाठवण्याद्वारेसुद्धा साक्ष देते. हवामान चांगले असते तेव्हा मंडळीतील सदस्य तिला बाहेर घेऊन जातात, त्यामुळे ती बागेतील आणि रस्त्यावरील लोकांना साक्ष देऊ शकते.

डालियाने आणि तिच्या आईने सातत्याने आध्यात्मिक प्रगती केली. त्या दोघींनी नोव्हेंबर २००४ मध्ये यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. सप्टेंबर २००८ मध्ये विल्निउसमध्ये पोलिश भाषा बोलणारा गट सुरू झाला. या गटाला राज्य प्रचारकांची जास्त गरज असल्यामुळे डालिया व तिची आई या गटासोबत कार्य करू लागले. डालिया म्हणते: “काही वेळा, महिना सुरू झाला तरी मी अजूनही सेवेत गेले नाही की मला खूप चिंता वाटते. पण, याविषयी यहोवाला प्रार्थना केल्यावर मंडळीतला कोणी ना कोणी माझ्यासोबत सेवाकार्य करण्याची योजना करतो.” आपली प्रिय बहीण डालिया हिला तिच्या परिस्थितीबद्दल कसे वाटते? ती म्हणते: “या रोगानं माझ्या शरीराला लकवा मारला आहे, माझ्या मेंदूला नाही. मी इतरांना यहोवाविषयी सांगू शकते याचा मला खूप आनंद होतो.”