व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या आशेबद्दल आनंद करा

आपल्या आशेबद्दल आनंद करा

आपल्या आशेबद्दल आनंद करा

‘सर्वकाळच्या जीवनाची आशा, ज्याच्याने असत्य बोलवतच नाही त्या देवाने अनंत काळाच्या पूर्वी देऊ केली.’—तीत १:१, २, पं.र.भा.

उजळणी

एक अभिषिक्‍त ख्रिस्ती शेवटपर्यंत एकनिष्ठ राहून आपले जीवनक्रम पूर्ण करतो तेव्हा स्वर्गात आनंद होतो हे आपल्याला कशावरून कळते?

दुसऱ्‍या मेंढरांच्या आशेची पूर्णता अभिषिक्‍त जनांच्या आशेशी कशा प्रकारे जुळलेली आहे?

आपल्या आशेची पूर्णता अनुभवण्यासाठी आपण ‘पवित्र वर्तणुकीची व सुभक्‍तीची’ कोणती कार्ये केली पाहिजेत?

१. यहोवाने दिलेली आशा आपल्याला धीराने समस्यांचा सामना करण्यास कशी मदत करू शकते?

 यहोवा “आशेचा देव” आहे, असे प्रेषित पौलाने म्हटले. त्याने पुढे असेही म्हटले की यहोवा ‘आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी’ म्हणून आपल्याला ‘संपूर्ण आनंदाने व शांतीने भरू’ शकतो. (रोम. १५:१३) आपल्यात विपुल प्रमाणात आशा असेल, तर कोणतीही परिस्थिती उद्‌भवली तरी आपल्याला धीराने तिचा सामना करणे शक्य होईल कारण आपले मन आनंदाने व शांतीने भरलेले असेल. ही आशा, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांप्रमाणेच इतर ख्रिश्‍चनांसाठीही “जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ” ठरेल. (इब्री ६:१८, १९) जीवनात वादळासमान समस्या उद्‌भवतात तेव्हा आपण आपल्या आशेला धरून राहू शकतो; त्यामुळे आपण आपल्या विश्‍वासावर शंका घेणार नाही किंवा विश्‍वासात कमी पडून वाहवत जाणार नाही.—इब्री लोकांस २:१; ६:११ वाचा.

२. आज ख्रिश्‍चनांसमोर कोणत्या दोन आशा आहेत, आणि अभिषिक्‍त जनांना असलेल्या आशेबद्दल दुसऱ्‍या मेंढरांना आस्था का आहे?

या शेवटल्या काळात जगत असलेल्या ख्रिश्‍चनांसमोर दोन आशा आहेत. ‘लहान कळपातील’ अभिषिक्‍त शेषजनांना स्वर्गातील अमर जीवनाची आशा आहे आणि ते ख्रिस्ताच्या राज्यात राजे व याजक या नात्याने सेवा करतील. (लूक १२:३२; प्रकटी. ५:९, १०) ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ मोजता न येणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ मशीही राज्याची प्रजा या नात्याने पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जीवन जगण्याची आशा आहे. (प्रकटी. ७:९, १०; योहा. १०:१६) दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्यांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचे तारण अद्यापही पृथ्वीवर असलेल्या ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त ‘बंधूंना’ सक्रिय पाठिंबा देण्यावर आधारित आहे. (मत्त. २५:३४-४०) अभिषिक्‍त जनांना तर त्यांचे प्रतिफळ मिळेलच, पण तितक्याच खातरीने दुसऱ्‍या मेंढरांचीही आशा पूर्ण होईल. (इब्री लोकांस ११:३९, ४० वाचा.) प्रथम आपण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी राखून ठेवलेल्या आशेचे परीक्षण करू या.

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची “जिवंत आशा”

३, ४. कशा प्रकारे अभिषिक्‍त ख्रिश्‍चन ‘पुन्हा जन्म घेऊन जिवंत आशा’ प्राप्त करतील, आणि ती कोणती आशा आहे?

प्रेषित पेत्राने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना दोन पत्रे लिहिली ज्यांत त्याने त्यांना “निवडलेले” म्हणून संबोधले. (१ पेत्र १:२) लहान कळपाला दिलेल्या अद्‌भुत आशेबद्दल त्याने तपशीलवार माहिती दिली. त्याच्या पहिल्या पत्रात त्याने लिहिले: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्‍तीने विश्‍वासाच्या योगे रक्षिलेले आहा, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता.”—१ पेत्र १:३-६.

ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्य शासनात राज्य करण्यासाठी यहोवाने निवडलेल्या ख्रिश्‍चनांची संख्या मर्यादित आहे आणि ते आत्म्याने अभिषिक्‍त असलेले देवाचे पुत्र या नात्याने “पुन्हा जन्म” घेतात. ख्रिस्तासोबत राजे व याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक केला जातो. (प्रकटी. २०:६) पेत्र असे म्हणतो की अभिषिक्‍त जनांचा “पुन्हा जन्म” झाल्यामुळे त्यांना “जिवंत आशा” मिळते आणि या आशेला “स्वर्गात” त्यांच्याकरता राखून ठेवलेले “अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन” असे तो म्हणतो. अभिषिक्‍त जन त्यांच्या या जिवंत आशेबद्दल “उल्हास” करतात याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये! परंतु ते शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले तरच त्यांची ही आशा पूर्ण होईल.

५, ६. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी त्यांचे स्वर्गीय पाचारण दृढ किंवा निश्‍चित करण्यासाठी विशेष प्रयत्न का केला पाहिजे?

पेत्राने त्याच्या दुसऱ्‍या पत्रात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्यांचे ‘पाचारण व निवड दृढ’ किंवा निश्‍चित करण्यासाठी ‘विशेष प्रयत्न करण्याचा’ सल्ला दिला. (२ पेत्र १:१०) याचा अर्थ, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी विश्‍वास, सुभक्‍ती, बंधुप्रेम आणि प्रीती यांसारखे ख्रिस्ती गुण स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी झटले पाहिजे. पेत्राने पुढे असे लिहिले: “हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करितील.”—२ पेत्र १:५-८ वाचा.

पुनरुत्थित झालेल्या येशूने पहिल्या शतकात आशिया मायनरमधील फिलदेल्फिया मंडळीतील आत्म्याने अभिषिक्‍त वडिलांना असा संदेश दिला: “धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनहि मी तुला राखीन. मी लवकर येतो; तुझा मुगूट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.” (प्रकटी. ३:१०, ११) शेवटपर्यंत विश्‍वासू राहणाऱ्‍या निवडलेल्यांना “गौरवाचा न कोमेजणारा हार” किंवा “मुगूट” मिळणार आहे; पण, एक अभिषिक्‍त ख्रिस्ती अविश्‍वासू ठरला तर त्याला तो मुगूट मिळणार नाही.—१ पेत्र ५:४; प्रकटी. २:१०.

राज्यात प्रवेश

७. यहूदाने त्याच्या पत्रात कोणत्या अद्‌भुत आशेचा उल्लेख केला?

इ.स. ६५ च्या सुमारास येशूचा सावत्र भाऊ यहूदा याने त्याच्या सहअभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना एक पत्र लिहिले ज्यात त्याने त्यांना “पाचारलेले लोक” असे म्हटले. (यहू. १; इब्री लोकांस ३:१ पडताळून पाहा.) सुरुवातीला तो, सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असलेल्या तारणाच्या आशेविषयी लिहू इच्छित होता. (यहू. ३) पण, त्याला इतर महत्त्वाच्या गोष्टींविषयी त्यांना लिहावे लागले. असे असले, तरी त्या लहानशा पत्राच्या शेवटी त्याने सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असलेल्या अद्‌भुत आशेबद्दल असे लिहिले: “तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्‍वर्ययुक्‍त सान्‍निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभु ह्‍याच्या द्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत.”—यहू. २४, २५.

८. एक अभिषिक्‍त ख्रिस्ती शेवटपर्यंत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवतो तेव्हा स्वर्गात आनंद होतो हे यहूदा २४ वरून कसे सूचित होते?

खरोखर, प्रत्येक विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाने आपले पतन होऊ नये म्हणून खबरदारी बाळगली पाहिजे. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची बायबल आधारित आशा ही आहे की येशू ख्रिस्त मृत्यूतून त्यांचे पुनरुत्थान करेल आणि त्यांना आध्यात्मिक परिपूर्णतेत देवाच्या सान्‍निध्यात उल्लासाने उभे राहणे शक्य करेल. एक अभिषिक्‍त ख्रिस्ती मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिला, तर त्याला याची पूर्ण खातरी असते की तो ‘आध्यात्मिक शरीरात उठविला जाईल’ व त्याचे “अविनाशीपणात, . . . गौरवात” पुनरुत्थान केले जाईल. (१ करिंथ. १५:४२-४४) “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद” होतो, तर मग ख्रिस्ताचा एक अभिषिक्‍त बांधव पृथ्वीवरील त्याचा जीवनक्रम एकनिष्ठेने पूर्ण करतो तेव्हा स्वर्गात किती आनंद होत असेल याची कल्पना करा. (लूक १५:७) त्या वेळी “उल्लासाने” आपले प्रतिफळ मिळवणाऱ्‍या या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनासोबत यहोवा व विश्‍वासू आत्मिक प्राणी आनंद करतील.—१ योहान ३:२ वाचा.

९. विश्‍वासू अभिषिक्‍त जन कोणत्या अर्थाने “जयोत्सवाने” राज्यात प्रवेश करतात, आणि या आशेचा पृथ्वीवर अद्याप असलेल्या अभिषिक्‍त जनांवर कोणता परिणाम होतो?

त्याचप्रमाणे पेत्रानेही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असे लिहिले की त्यांनी विश्‍वासू राहण्याद्वारे आपले स्वर्गीय पाचारण निश्‍चित केले तर “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्‍याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने [त्यांचा] प्रवेश होईल.” (२ पेत्र १:१०, ११) ते स्वर्गात “जयोत्सवाने” प्रवेश करतील असे पेत्राने म्हटले तेव्हा तो कदाचित हे सुचवत होता, की अभिषिक्‍त जन मोठ्या गौरवाने स्वर्गात प्रवेश करतील. तसेच, तो कदाचित त्यांना स्वर्गात मिळणाऱ्‍या अनंत आशीर्वादांविषयीसुद्धा बोलत असावा. अभिषिक्‍त ख्रिस्ती मागे वळून आपल्या विश्‍वासू जीवनक्रमाकडे पाहतील तेव्हा त्यांना मनस्वी आनंद व कृतज्ञता वाटेल. या आशेमुळे, पृथ्वीवर अद्याप असलेल्या अभिषिक्‍त जनांना आपली ‘मनरूपी कंबर बांधून’ सतत कार्य करण्याचे बळ मिळते यात शंका नाही.—१ पेत्र १:१३.

दुसऱ्‍या मेंढरांसाठी असलेली ‘आशा’

१०, ११. (क) दुसऱ्‍या मेंढरांना कोणती आशा आहे? (ख) पृथ्वीवरील जीवनाच्या आशेची पूर्णता ख्रिस्ताशी व “देवाच्या पुत्रांच्या प्रगट” होण्याशी कशी जुळलेली आहे?

१० प्रेषित पौलाने आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ‘देवाच्या पुत्रांना’ मिळालेल्या अद्‌भुत आशेविषयी बोलताना असे लिहिले की ते ख्रिस्ताचे “सोबतीचे वारीस” आहेत. मग, यहोवाने अगणित दुसऱ्‍या मेंढरांना जी अद्‌भुत आशा दिली आहे तिचा पौलाने उल्लेख केला. त्याने लिहिले: “[मानव] सृष्टि देवाच्या पुत्रांच्या [अभिषिक्‍त जन] प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे. सृष्टिहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.”—रोम. ८:१४-२१.

११ यहोवाने प्रतिज्ञात ‘संततिद्वारे’ “जुनाट साप” अर्थात दियाबल सैतान याच्यापासून मानवांची सुटका करण्याचे अभिवचन दिले तेव्हाच त्याने मानवजातीला ‘आशा’ दिली. (प्रकटी. १२:९; उत्प. ३:१५) या ‘संतानाचा’ प्रमुख भाग येशू ख्रिस्त होता. (गलती. ३:१६) येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानामुळे मानवजातीला पाप व मृत्यूच्या दास्यत्वातून मुक्‍त होण्याची आशा मिळाली. या आशेची पूर्णता “देवाच्या पुत्रांच्या प्रगट” होण्याशी जुळलेली आहे. गौरवयुक्‍त अभिषिक्‍त जन संततीचा दुय्यम भाग आहेत. ते ख्रिस्ताच्या सोबतीने सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करण्यात भाग घेतील तेव्हा ते “प्रगट” होतील. (प्रकटी. २:२६, २७) आणि त्यामुळे दुसऱ्‍या मेंढरांचे तारण होईल, ते मोठ्या संकटातून बचावतील.—प्रकटी. ७:९, १०, १४.

१२. अभिषिक्‍त जनांच्या प्रगट होण्यामुळे मानवजातीला कोणते गौरवयुक्‍त फायदे मिळतील?

१२ ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान मानव ‘सृष्टीला’ किती हायसे वाटेल! त्या वेळी देवाचे गौरवयुक्‍त ‘पुत्र’ आणखी एका मार्गाने “प्रगट” होतील; ते येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे मानवांना देण्यास ख्रिस्तासोबत याजक या नात्याने कार्य करतील. स्वर्गीय राज्याची प्रजा या नात्याने मानव “सृष्टि” पाप व मृत्यूच्या परिणामांपासून मुक्‍त होऊ लागेल. हळूहळू आज्ञाधारक मानव “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त” होतील. या हजार वर्षांदरम्यान व त्याच्या अखेरीस होणाऱ्‍या शेवटच्या परीक्षेदरम्यान जर ते यहोवाला विश्‍वासू राहिले तर त्यांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” कायमची लिहिली जातील. ते ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्‍त मुक्‍ततेत’ प्रवेश करतील. (प्रकटी. २०:७, ८, ११, १२) खरोखर किती गौरवयुक्‍त आशा!

आपली आशा जिवंत ठेवा

१३. आपली आशा कशावर आधारित आहे, आणि ख्रिस्त केव्हा प्रगट होईल?

१३ पेत्राच्या दोन्ही देवप्रेरित पत्रांत, अभिषिक्‍त जनांना व दुसऱ्‍या मेंढरांना आपआपली आशा जिवंत ठेवण्यास मदत करणारी बरीच माहिती आहे. पेत्राने हे दाखवून दिले की त्यांची आशा त्यांच्या कार्यांवर नव्हे, तर यहोवाच्या कृपेवर आधारित आहे. त्याने लिहिले: “सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हांस प्राप्त होणाऱ्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.” (१ पेत्र १:१३) ख्रिस्त त्याच्या विश्‍वासू अनुयायांना त्यांचे प्रतिफळ देण्यास व अभक्‍त जगावर यहोवाचा न्यायदंड बजावण्यास येईल तेव्हा तो प्रगट होईल.—२ थेस्सलनीकाकर १:६-१० वाचा.

१४, १५. (क) आपली आशा जिवंत ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे? (ख) पेत्राने कोणता सल्ला दिला?

१४ आपली आशा जिवंत ठेवण्यासाठी आपण आपले लक्ष व आपले जीवन ‘देवाच्या दिवसावर’ केंद्रित केले पाहिजे. त्या दिवसामुळे सध्याचे “आकाश” म्हणजे मानवी सरकार, आणि सध्याची “पृथ्वी” म्हणजे दुष्ट मानव समाज व “सृष्टितत्त्वे” यांचा नाश होईल. पेत्राने लिहिले: “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.”—२ पेत्र ३:१०-१२.

१५ सध्याच्या ‘आकाशाची’ जागा “नवे आकाश [ख्रिस्ताचे राज्य सरकार]” घेईल व सध्याच्या ‘पृथ्वीची’ जागा “नवी पृथ्वी [पृथ्वीवरील नवा मानव समाज]” घेईल. (२ पेत्र ३:१३) पेत्राने नंतर, ‘वाट पाहण्यासंबंधी’ म्हणजे प्रतिज्ञा केलेल्या नव्या जगाविषयीची आपली आशा जिवंत ठेवण्यासंबंधी असा सुस्पष्ट सल्ला दिला: “म्हणून प्रियजनहो, ह्‍या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.”—२ पेत्र ३:१४.

आपल्या आशेच्या अनुषंगाने चाला

१६, १७. (क) ‘पवित्र वर्तणुकीची व सुभक्‍तीची’ कोणती कार्ये आपण केली पाहिजेत? (ख) आपली आशा कशा प्रकारे पूर्ण होईल?

१६ आपण आपली आशा जिवंत ठेवली पाहिजे, आणि त्यासोबतच आपल्या आशेच्या अनुषंगानेही जीवन जगले पाहिजे. आपण आध्यात्मिक रीत्या कशा प्रकारचे व्यक्‍ती आहोत याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. बायबलमध्ये ‘पवित्र वर्तणूक’ असे जे म्हटले आहे त्यात नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याद्वारे ‘परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवणे’ सामील आहे. (२ पेत्र ३:११; १ पेत्र २:१२) तसेच, आपण “एकमेकांवर प्रीती” केली पाहिजे. यात जगभरातील बांधवांमध्ये एकता टिकवून ठेवणे, अगदी आपल्या स्थानिक मंडळीमध्येदेखील एकता टिकवून ठेवणे सामील आहे. (योहा. १३:३५) याशिवाय, ‘सुभक्‍तीत राहणे’ असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ यहोवासोबत आपला नातेसंबंध आणखी मजबूत होईल अशी कार्ये करणे. या कार्यांत आपल्या प्रार्थनेचा दर्जा सुधारणे, दररोज बायबलचे वाचन करणे, सखोल वैयक्‍तिक अभ्यास करणे, कौटुंबिक उपासना करणे व ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करण्यात सक्रिय भाग घेणे या गोष्टीदेखील सामील आहेत.—मत्त. २४:१४.

१७ हे दुष्ट जग “लयास” जाईल तेव्हा यहोवाने आपल्याला कृपापसंती दाखवावी व येणाऱ्‍या नाशातून आपला बचाव करावा म्हणून आपण कशा प्रकारचे व्यक्‍ती आहोत याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. असे केल्यास, ‘ज्याच्याने असत्य बोलवतच नाही त्या देवाने अनंत काळाच्या पूर्वी सर्वकाळच्या जीवनाची जी आशा देऊ केली’ आहे तिची पूर्णता आपण अनुभवू.—तीत १:१, २.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चित्र]

अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘पुन्हा जन्म घेऊन जिवंत आशा’ प्राप्त करतात

[२४ पानांवरील चित्र]

तुमच्या कुटुंबात जीवनाची आशा जिवंत ठेवा