व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या मुलांना शिकवा

एका अपराध्याकडून आपण काय शिकू शकतो?

एका अपराध्याकडून आपण काय शिकू शकतो?

चित्रात येशू ज्याच्याबरोबर बोलत आहे त्या अपराध्याकडून आपण काही शिकू शकतो. त्याला स्वतःची चूक समजली आहे. तो येशूला म्हणतो: “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” आता चित्रात बघ, येशू त्याच्याबरोबर बोलत आहे. काय बोलतोय माहितंय? * येशू त्याला आश्‍वासन देतो: “मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” येथे सुखलोक असं जे म्हटलं आहे ते आहे नंदनवन.

येशू इथं कोणत्या नंदनवनाविषयी बोलतोय?— या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेण्याआधी आपण, यहोवा देवानं पहिल्या मानवी जोडप्याला, आदाम आणि हव्वा यांच्यासाठी बनवलेल्या नंदनवनाविषयी बोलू यात. ते नंदनवन कुठं होतं? स्वर्गात होतं की पृथ्वीवर?

बरोबर पृथ्वीवरच. म्हणजे तो अपराधी पृथ्वीवरील “नंदनवनात” असेल. ते नंदनवन कसं असेल?— पाहू या.

यहोवा देवानं जेव्हा पहिल्या मानवी जोडप्याला, आदाम आणि हव्वा यांना बनवलं तेव्हा त्यानं त्यांना पृथ्वीवरील याच नंदनवनात ठेवलं. यालाच एदेनातील बाग असं म्हटलं आहे. एदेनातील ही बाग किती सुंदर असेल नाही?— खरंच ती बाग किती सुंदर आणि छान असावी. आजपर्यंत कोणीही अशी सुरेख बाग पाहिली नसेल!

पण मग, येशू त्या अपराध्याबरोबर या पृथ्वीवर असेल का?— नाही. येशू स्वर्गातून या पृथ्वीच्या नंदनवनावर राज्य करेल. आणि येशू त्याच्याबरोबर असेल म्हणजे, तो त्याला पुन्हा जिवंत करेल आणि या नंदनवनात त्याची काळजी घेतली जात आहे की नाही हे पाहील. पण एका अपराध्याला येशू नंदनवनात का राहू देईल बरं?— चल यावर बोलू या.

या अपराध्यानं मोठे गुन्हे केले होते हे मान्य आहे पण त्याच्यासारखे कितीतरी अपराधी या पृथ्वीवर होते. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांना यहोवाविषयी आणि त्याच्या इच्छेविषयी शिकवण्यात आलं नव्हतं म्हणून ते वाईट कामं करत होते.

अशा लोकांना आणि येशू ज्या अपराध्याबरोबर बोलत होता त्यालाही पृथ्वीवरील याच नंदनवनात पुन्हा जिवंत केलं जाईल. यहोवाची काय इच्छा आहे हे त्यांना शिकवलं जाईल. आणि त्यांचे यहोवावर प्रेम आहे की नाही हे सिद्ध करण्याची संधी दिली जाईल.

पण हे ते कसं सिद्ध करतील?— यहोवाच्या इच्छेनुसार वागून. तर मग, यहोवावर आणि एकमेकांवर प्रेम करणाऱ्‍या लोकांबरोबर या पृथ्वीवरील नंदनवनात राहणं किती छान असेल! ▪ (w१३-E ०६/०१)

^ तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा थांबा आणि त्याला काय वाटते ते विचारा.