व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

बिबलियोमँसी म्हणजे काय, आणि त्याकडे ख्रिश्‍चनांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?

बिबलियोमँसी म्हणजे, एखाद्या पुस्तकातील, विशेषतः बायबलमधील कोणतेही पान उघडून जे शास्त्रवचन डोळ्यांसमोर पहिले दिसते ते वाचायचे. त्या शास्त्रवचनातून आपल्याला आवश्‍यक असलेले मार्गदर्शन मिळेल अशा विश्‍वासाने हे केले जाते. खरे ख्रिस्ती शकुनमुहूर्त पाहत नाहीत. तर, ते अचूक ज्ञान व देवाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी बायबलचा अभ्यास करतात.—१२/१५, पृष्ठ ३.

देवाचे चांगले कारभारी या नात्याने सर्वच ख्रिश्‍चनांनी कोणती तत्त्वे लक्षात ठेवली पाहिजेत? (१ पेत्र ४:१०)

आपण ख्रिस्ती असल्यामुळे, आपण देवाच्या मालकीचे आहोत आणि आपल्याला त्याला हिशेब द्यायचा आहे. आपण सर्व जण एकसमान स्तरांचे पालन करतो; आणि आपण विश्‍वासू व भरवशालायक असले पाहिजे.—१२/१५, पृष्ठे १०-१२.

“जग” नाहीसे होईल असे जे म्हटले आहे ते कोणते जग आहे?

“जग” नाहीसे होईल असे जे म्हटले आहे ते पृथ्वीसंबंधी नव्हे, तर देवाच्या इच्छेविरुद्ध वागणाऱ्‍या जगातील लोकांसंबंधी म्हटले आहे. (१ योहा. २:१७) जगाच्या अंतातून चांगल्या लोकांचा आणि पृथ्वीचा बचाव होईल.—१/१, पृष्ठे ५-७.

हाबेल मेला असूनही आपल्यासोबत कसा बोलत आहे? (इब्री ११:४)

तो विश्‍वासाच्या द्वारे बोलत आहे. आपण त्याच्या विश्‍वासापासून धडा शिकू शकतो आणि त्याच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकतो. त्याने मांडलेले उदाहरण आजही जिवंत आहे.—१/१, पृष्ठ १२.

आपण देवापासून दूर जाऊ नये म्हणून जीवनातील कोणत्या क्षेत्रांकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे?

त्यांपैकी काही आहेत: नोकरी-व्यवसाय व करियर, मनोरंजन व करमणूक, बहिष्कृत नातेवाइकासोबतचा सहवास, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, आरोग्याची चिंता, पैशाबद्दल चुकीचा दृष्टिकोन, आणि आपल्या मतांना किंवा अधिकाराला खूप जास्त महत्त्व देणे.—१/१५, पृष्ठे १२-२१.

मोशेच्या नम्रतेवरून आपण काय शिकू शकतो?

मोशे गर्वाने फुगला नाही; तो स्वतःवर नव्हे, तर यहोवावर विसंबून राहिला. आपल्याजवळ सत्ता असली, अधिकार असला किंवा काही उपजत क्षमता असल्या तरी आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत; शिवाय, आपण यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. (नीति. ३:५, ६)—४/१, पृष्ठ ५.

इस्राएल लोक “हृदयाने बेसुनत” होते याचा अर्थ काय होतो? (यिर्म. ९:२६)

त्यांचे हृदय हट्टी व बंडखोर बनले होते आणि देवाच्या विचारसरणीला प्रतिसाद देत नव्हते. म्हणून, त्यांनी देवाच्या विचारसरणीच्या विरोधात असलेले विचार, भावना, किंवा हेतू आपल्या हृदयातून काढून टाकायचे होते. (यिर्म. ५:२३, २४)—३/१५, पृष्ठे ९-१०.

देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागात कोणाचा समावेश होतो?

त्यात नियमन मंडळ, शाखा समित्या, प्रवासी पर्यवेक्षक, वडीलवर्ग, मंडळ्या, आणि प्रत्येक यहोवाच्या साक्षीदाराचा समावेश होतो.—४/१५, पृष्ठ २९.

इस्राएल लोक गुन्हेगारांना स्तंभावर लटकवून त्यांना मृत्यूदंड द्यायचे का?

नाही. असे इतर प्राचीन राष्ट्रे करायची, पण इस्राएल लोक तसे करत नसत. निदान इब्री शास्त्रवचनांचे लिखाण करण्यात आले त्या काळात तरी गुन्हेगारांना आधी जिवे मारले जायचे, सहसा दगडमार करून. (लेवी. २०:२, २७) मग, इतरांना चेतावणी मिळावी म्हणून गुन्हेगाराचा मृतदेह स्तंभावर लटकवला जायचा.—५/१५, पृष्ठ १३.