व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“व्वा! काय सुरेख चित्र!”

“व्वा! काय सुरेख चित्र!”

कितीतरी वेळा, टेहळणी बुरूज नियतकालिकाचा नवीन अंक हातात पडताच तुम्ही वरील उद्‌गार काढले असतील. नियतकालिकातील सुरेख चित्रे तयार करण्यासाठी सहसा खूप मेहनत घेतली जाते. ही चित्रे उगीचच दिलेली नसतात. शिकवण्याच्या या प्रभावशाली साधनांचा एक विशिष्ट उद्देश असतो. तो म्हणजे, वाचकाच्या विचारांना व भावनांना चालना देणे. टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करताना व मंडळीत उत्तरे देताना या चित्रांचा आपल्याला विशेष उपयोग होऊ शकतो.

उदाहरणार्थ, प्रत्येक अभ्यास लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या चित्राकडे लक्ष द्या आणि या लेखासाठी हेच चित्र का देण्यात आले असावे यावर विचार करा. त्यात काय दाखवण्यात आले आहे? लेखाच्या शीर्षकाशी किंवा मुख्य शास्त्रवचनाशी त्याचा काय संबंध आहे? त्याच प्रकारे, लेखातील इतर चित्रे विचारात घेताना सदर विषयाशी आणि तुमच्या वैयक्‍तिक जीवनाशी त्यांचा काय संबंध आहे याचा विचार करा.

टेहळणी बुरूज अभ्यास संचालकांनी, बंधुभगिनींना प्रत्येक चित्रावर टिप्पणी करण्याची, म्हणजे लेखाशी त्याचा काय संबंध आहे किंवा व्यक्‍तिगत रीत्या त्यांना या चित्रावरून काय शिकायला मिळाले हे सांगण्याची संधी दिली पाहिजे. काही वेळा, चित्राखाली दिलेल्या मथळ्यासोबत ते चित्र कोणत्या परिच्छेदाशी संबंधित आहे हेदेखील सूचित केलेले असते. असे सूचित केलेले नसते तेव्हा, कोणते चित्र कोणत्या परिच्छेदाची चर्चा करताना विचारात घेतले जावे हे संचालक स्वतः ठरवू शकतात. असे केल्यामुळे, देवाच्या वचनात सांगितलेल्या गोष्टी डोळ्यांपुढे उभ्या करण्यास वाचकाला साहाय्य करण्यासाठी ही जी चित्रे तयार केली जातात त्यांचा पुरेपूर लाभ घेणे सर्वांना शक्य होईल.

एका बांधवाने तर म्हटले: “एखादा सुरेख लेख वाचल्यानंतर त्यातली चित्रं जणू केकवरच्या क्रीमसारखी वाटतात.”