व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय: जगात इतके दुःख का? ते केव्हा नाहीसे होईल?

असंख्य निरपराध लोकांचा बळी!

असंख्य निरपराध लोकांचा बळी!

नोएला नावाची एक गोड, निरागस चिमुकली, उन्हाळ्यातील एके दिवशी खेळतखेळत तिच्या घरामागे असलेल्या स्विमिंग-पूलजवळ गेली आणि त्यात बुडून तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली त्याच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतर ती चार वर्षांची होणार होती.

१४ डिसेंबर २०१२ रोजी, अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यातील एका शाळेत झालेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सहा ते सात वर्षांची जवळजवळ २० मुले होती. शार्लेट, डॅनयल, ऑलिवीया, जोझफीन ही त्यांपैकी काहींची नावे आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहताना अध्यक्ष ओबामा यांनी त्या सर्व मुलांची नावे घेतली आणि म्हटले: “अशा दुर्घटनांना आता पूर्णविराम मिळालाच पाहिजे.”

नेहमी उत्साही, हसतखेळत राहणारी अठरा वर्षांची बानू १९९६ साली आपल्या कुटुंबासह इराकमधून नॉर्वेत राहायला आली. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, २२ जुलै २०११ रोजी एका अतिरेक्याने केलेल्या हल्ल्यात ७७ लोकांचा जीव गेला; त्यांत बानूही होती. निरपराध लोकांचा बळी घेणाऱ्‍या अतिरेक्याने वर अशी शेखी मारली, की तो इतक्याच लोकांचा जीव घेऊ शकला याचीच त्याला खंत आहे. आणखी जास्त लोकांचा जीव घेतला असता तर त्याचे समाधान झाले असते.

अंतःकरणाला पीळ घालणाऱ्‍या अशा कितीतरी घटना दररोज आपल्याला ऐकायला मिळतात. अपघात, गुन्हे, युद्धे, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती आणि अशा इतर दुर्घटनांमुळे किती दुःख ओढवते याचा विचार करा. बरेचदा काहीएक कारण नसताना असंख्य निरपराध लोकांचा झटक्यात बळी जातो, तर अनेकांच्या पदरी दुःख पडते!

यासाठी काही जण देवाला जबाबदार धरतात. आपल्या निर्माणकर्त्याला आपली काळजी नाही असा ते विचार करतात. इतर काहींचे असे म्हणणे आहे की देव आपले दुःख पाहून न पाहिल्यासारखे करतो. तर इतर काही जण म्हणतात, की आपल्या नशिबात जे लिहिलेले असते तेच घडते. या विषयावर लोकांची असंख्य मते आहेत. पण, आपल्याला भरवशालायक व समाधानकारक उत्तरे कोठे मिळू शकतील? दुःखाचे कारण काय? ते कसे नाहीसे होईल? या प्रश्‍नांची उत्तरे देवाचे वचन, बायबल यातून आपल्याला मिळतील. त्यांचे परीक्षण आपण पुढील लेखांत करू. (w१३-E ०९/०१)