व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्नांची उत्तरे

बायबल प्रश्नांची उत्तरे

मृत लोकांसाठी काही आशा आहे का?

मरण हे गाढ झोपेसारखे असते ज्यात मृत लोकांना काहीच कळत नाही आणि ते काहीच करू शकत नाहीत. पण ज्याने सर्वांना जीवन दिले तो मृत लोकांचे पुनरुत्थान करेल म्हणजे त्यांना पुन्हा जिवंत करेल. याचा पुरावा म्हणून देवाने येशूला अनेक मृत लोकांना जिवंत करण्याचे सामर्थ्य दिले होते.—उपदेशक ९:५; योहान ११:११, ४३, ४४ वाचा.

कोणत्या अर्थी मृत्यू गाढ झोपेसारखा आहे?

देवाने अभिवचन दिले आहे, की जे मृत लोक त्याच्या स्मरणात आहेत त्यांचे तो एका नीतिमान नवीन जगात पुनरुत्थान करेल. ज्यांचे पुनरुत्थान केले जाईल त्यांना जोपर्यंत देव पुन्हा जिवंत करत नाही तोपर्यंत ते मृतावस्थेत असतील. सर्वसमर्थ देवाला मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची उत्कंठा लागली आहे.—ईयोब १४:१४, १५ वाचा.

पुनरुत्थान कसे असेल?

देव मृत लोकांचे पुनरुत्थान करेल तेव्हा ते स्वतःला, त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील लोकांना ओळखू शकतील. एका व्यक्तीचे शरीर कुजले तरी देव त्या व्यक्तीचे एका नवीन शरीरात पुनरुत्थान करू शकतो.—१ करिंथकर १५:३५, ३८ वाचा.

केवळ काही व्यक्तींना स्वर्गीय जीवनासाठी जिवंत केले जाते. (प्रकटीकरण २०:६) तर पुनरुत्थान केलेल्या बहुतेक लोकांना पृथ्वीवरील नंदनवनात जीवन जगण्यासाठी जिवंत केले जाईल. सदासर्वकाळच्या जीवनाची ही एक नवीन सुरुवात असेल.स्तोत्र ३७:२९; प्रेषितांची कृत्ये २४:१५ वाचा. (w13-E 10/01)