व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्नांची उत्तरे

बायबल प्रश्नांची उत्तरे

जगावर कोण शासन करत आहे?

देव या जगाचा शासक असता, तर जगात इतके दुःख असते का?

पुष्कळ लोकांना वाटते की या जगावर खरा देवच शासन करत आहे. हे जर खरे असेल, तर जगात इतके दुःख असते का? (अनुवाद ३२:४, ५) बायबलनुसार, हे जग एका दुष्ट व्यक्तीच्या नियंत्रणात आहे.—१ योहान ५:१९ वाचा.

या दुष्ट व्यक्तीने मानवजातीवर नियंत्रण कसे मिळवले? मानव इतिहासाच्या सुरुवातीला एका देवदूताने देवाविरुद्ध बंड केले आणि पहिल्या मानवी जोडप्यालादेखील देवाविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले. (उत्पत्ति ३:१-६) या जोडप्याने त्या बंडखोर देवदूताचे म्हणजे सैतानाचे म्हणणे ऐकले आणि अशा प्रकारे त्याला आपला शासक बनवले. खरेतर, या जगावर शासन करण्याचा अधिकार केवळ सर्वशक्तिमान देवालाच आहे; पण त्याची अशी इच्छा आहे, की लोकांनी त्याच्यावरील प्रेमामुळे त्याचे शासन स्वीकारावे. (अनुवाद ६:६; ३०:१६, १९) दुःखाची गोष्ट म्हणजे, पहिल्या मानवी जोडप्याप्रमाणेच जगातील बहुतेकांनी सैतानाच्या फसवणुकीला बळी पडून त्याचे शासन स्वीकारले आहे.—प्रकटीकरण १२:९ वाचा.

मानवांच्या समस्या कोण सोडवेल?

देव सैतानाला पुढेही मानवांवर दुष्टपणे शासन करू देणार का? नाही. सैतानाने ज्या काही वाईट गोष्टी केल्या आहेत त्या काढून टाकण्यासाठी देव येशूचा उपयोग करेल.—१ योहान ३:८ वाचा.

देवाकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर करून येशू सैतानाचा नाश करेल. (रोमकर १६:२०) मग, मानवजातीवर देवच शासन करेल आणि मानवांनी पृथ्वीवर सुखसमाधानाने राहावे अशी जी त्याची मूळ इच्छा होती ती तो पूर्ण करेल.—प्रकटीकरण २१:३-५ वाचा. (w14-E 05/01)