व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

उगवत्या सूर्याच्या देशात सत्याची पहाट

उगवत्या सूर्याच्या देशात सत्याची पहाट

टोकियोत जाहीर भाषणाच्या निमंत्रण पत्रिका वापरण्यात आल्या आणि त्या विमानांतून संपूर्ण ओसाका शहरावर टाकण्यात आल्या

अमेरिकेत राहत असलेला पण मुळात जपानमध्ये जन्मलेला एक पिलग्रिम (प्रवासी पर्यवेक्षक), ६ सप्टेंबर १९२६ रोजी अमेरिकेहून जपानला मिशनरी म्हणून सेवा करण्यासाठी परतला. त्याचे स्वागत करण्यासाठी जो इसम आला होता, तो जपानमध्ये टेहळणी बुरूज नियतकालिकाचा एकटाच वर्गणीदार होता. त्याने कोबे या शहरात बायबल अभ्यासाचा एक गटदेखील सुरू केला होता. त्याच शहरात २ जानेवारी १९२७ रोजी बायबल विद्यार्थ्यांचे पहिले संमेलन झाले. त्या संमेलनाला ३६ लोक उपस्थित होते आणि त्यांपैकी ८ जणांचा बाप्तिस्मा झाला. ही एक चांगली सुरुवात होती. पण, जपानमधील ६ कोटी लोकांपर्यंत बायबलमधील सत्याचा प्रकाश पोचवणे या लहानशा गटाला कसे शक्य होणार होते?

१९२७ सालच्या मे महिन्यात आवेशी बायबल विद्यार्थ्यांनी बायबलवर आधारित भाषणांची जाहिरात करण्यासाठी सार्वजनिक साक्षकार्याची एक मोहीम राबवली. पहिले भाषण ओसाका या शहरात होणार होते. त्या भाषणाची जाहिरात करण्यासाठी बांधवांनी रस्त्याच्या कडेला तसेच संपूर्ण शहरात ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावले. तसेच ३,००० निमंत्रणे त्या शहरातील प्रतिष्ठित लोकांना पाठवण्यात आली. बांधवांनी १,५०,००० निमंत्रण पत्रिकांचे वाटप केले. ओसाकाच्या मुख्य वर्तमानपत्रांत तसेच रेल्वेच्या ४,००,००० तिकिटांवर भाषणाची जाहिरात छापण्यात आली. भाषणाच्या दिवशी दोन विमानांतून १,००,००० निमंत्रण पत्रिका संपूर्ण शहरात टाकण्यात आल्या. ‘ओसाका आसाही’ या सभागृहात “देवाचे राज्य जवळ आले आहे” या विषयावरील भाषण ऐकण्यासाठी जवळजवळ २,३०० लोक आले. सभागृह अगदी खच्चून भरल्यामुळे जे आणखी सुमारे हजार लोक आले होते त्यांना परत पाठवावे लागले. भाषणानंतर ६०० पेक्षा जास्त लोक प्रश्न-उत्तराच्या सत्रासाठी थांबले होते. पुढील काही महिन्यांत क्योटो तसेच जपानच्या पश्‍चिम भागात असलेल्या इतर शहरांत, बायबलवर आधारित जाहीर भाषणे देण्यात आली.

बायबल विद्यार्थ्यांनी १९२७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात टोकियो या शहरात भाषणे आयोजित केली. पुन्हा एकदा याची जाहिरात करण्यासाठी निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात आले. जपानच्या पंतप्रधानांना, संसदेच्या सदस्यांना, धर्मपुढाऱ्यांना तसेच सैन्यातील अधिकाऱ्यांनाही निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या. जाहिरातीसाठी फलक, वर्तमानपत्रे आणि ७,१०,००० हस्तपत्रिका वापरण्यात आल्या. टोकियोमध्ये झालेल्या तीन भाषणांना एकूण ४,८०० लोक उपस्थित राहिले.

आवेशी कॉलपोर्टर

कात्सूओ आणि हागीनो म्यूरा

राज्याचा संदेश घरोघरी पोचवण्यात कॉलपोर्टर (पायनियर) यांचे बरेच योगदान होते. जपानमध्ये सुरुवातीच्या कॉलपोर्टरांपैकी एक असलेल्या मातस्वे ईशी आणि त्यांचे पती जीझो यांनी जपानच्या तीन चतुर्थांश भागात राज्याचा संदेश पोचवला. जपानच्या उत्तर भागात असलेल्या सापोरो या शहरापासून सेंदाई, टोकियो, योकोहामा, नागोया, ओसाका, क्योटो, ओकायामा आणि टोकूशिमा या शहरापर्यंत त्यांनी प्रचार कार्य केले. बहीण ईशी हिने साकीको तानाका नावाच्या एका वयस्क बहिणीसोबत मिळून अनेक प्रतिष्ठित सरकारी अधिकाऱ्यांना राज्याचा संदेश सांगितला. त्यांची भेट घेताना त्या किमोनो हा जपानी स्त्रियांचा पारंपरिक पोशाख घालून जायच्या. त्या अधिकाऱ्यांपैकी एकाने तुरुंगातील वाचनालयात ठेवण्यासाठी द हार्प ऑफ गॉड आणि डिलिव्हरेन्स या पुस्तकांचे ३०० संच मागवले.

कात्सूओ आणि हागीनो म्यूरा यांनी बहीण ईशी यांच्याकडून पुस्तके घेतली आणि हेच सत्य असल्याची त्यांची खात्री पटली. १९३१ मध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि तेसुद्धा कॉलपोर्टर म्हणून सेवा करू लागले. हारूईची आणि ताने यामादा यांनी व त्यांच्या अनेक नातेवाइकांनी १९३० च्या काही काळाआधी सत्य स्वीकारले. हारूईची आणि ताने यामादा हे कॉलपोर्टर म्हणून सेवा करू लागले. त्यांची मुलगी यूकीको ही टोकियोमधील शाखा कार्यालयात सेवा करू लागली.

लहान आणि मोठ्या “येहू” गाड्या

मोठ्या येहू गाडीत सहा पायनियर राहू शकत होते

त्या काळात वाहने खूप महाग असल्यामुळे ती विकत घेणे इतके सोपे नव्हते. तसेच, जपानमधील रस्तेही चांगल्या स्थितीत नव्हते. याच कारणांमुळे काझूमी मीनोऊरा आणि इतर काही तरुण कॉलपोर्टर यांनी हाऊस कार (राहण्याची व्यवस्था असलेल्या गाड्या) वापरल्या. त्यांना इंजिन नव्हते. या हाऊस कारला त्यांनी येहू असे नाव दिले होते. वेगाने रथ चालवणाऱ्या व नंतर इस्राएलचा राजा बनलेल्या येहूवरून हे नाव देण्यात आले होते. (२ राजे १०:१५, १६) त्यांच्याजवळ तीन मोठ्या येहू गाड्या होत्या. त्यांपैकी प्रत्येक गाडी ७.२ फूट लांब, ६.२ फूट रुंद आणि ६.२ फूट उंच होती आणि प्रत्येक गाडीत सहा पायनियर राहू शकत होते. तसेच, जपान शाखा कार्यालयात बनवण्यात आलेल्या ११ लहान येहू गाड्याही होत्या. यात दोन जण राहू शकत होते व सायकलीच्या साहाय्याने ही गाडी चालवली जाऊ शकत होती. केईची ईवासाकी यांनी येहू गाड्या बनवण्यासाठी मदत केली होती. ते आठवून सांगतात: “प्रत्येक येहू गाडीत एक तंबू, तसेच लाईट लावण्यासाठी एक कार बॅटरीही असायची.” या येहू गाड्यांच्या साहाय्याने जपानमधील कॉलपोर्टरांनी डोंगर-दऱ्यांतून मार्ग काढत उत्तरेकडील होक्काइडोपासून दक्षिणेकडील क्यूशूपर्यंत सत्याचा प्रकाश पसरवला.

लहान येहू गाडीत दोन जण राहू शकत होते

कॉलपोर्टर असलेल्या ईकूमात्सू ओटा नावाच्या बांधवांनी म्हटले: “एखाद्या गावात आल्यानंतर आम्ही नदीकाठी किंवा मोकळ्या मैदानात आमची येहू गाडी लावायचो. सर्वप्रथम आम्ही गावातील प्रतिष्ठित लोकांना भेटी द्यायचो आणि त्यानंतर इतर लोकांच्या घरी जाऊन त्यांना प्रकाशने द्यायचो. अशा प्रकारे संपूर्ण गावाचे क्षेत्र उरकल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावी जायचो.”

कोबे या शहरात ३६ बायबल विद्यार्थ्यांच्या लहानशा गटाचे पहिले संमेलन झाले होते तेव्हा “ही सुरुवात अगदी लहान” वाटली असेल. (जख. ४:१०) पण, फक्त पाच वर्षांनंतर, १९३२ सालच्या अहवालानुसार १०३ कॉलपोर्टर आणि प्रचारक जपानमध्ये आवेशाने सेवा करत होते आणि त्यांनी १४,००० पेक्षा जास्त पुस्तके लोकांना दिली होती. आज जपानच्या महानगरांत सुव्यवस्थितपणे सार्वजनिक साक्षकार्य केले जात आहे. जवळजवळ २,२०,००० प्रचारक या “उगवत्या सूर्याच्या देशात” सत्याचा प्रकाश मोठ्या प्रमाणावर पसरवत आहेत.—जपानमधील आमच्या संग्रहातून.

येहू गाड्या बनवणाऱ्या केईची ईवासाकी यांनी काढलेली रेखाचित्रे