व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्नांची उत्तरं

बायबल प्रश्नांची उत्तरं

आपण येशूच्या मृत्युदिनाचं स्मरण का केलं पाहिजे?

येशूच्या मृत्युमुळं आपल्याला कोणती आशा मिळते?—यशया २५:८; ३३:२४.

येशूचा मृत्यू ही इतिहासातली सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना आहे. देवानं मानवांना सुरुवातीला ज्या प्रकारचं जीवन दिलं होतं ते त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी येशू मरण पावला. देवानं मानवांना वाईट गोष्टी करण्यासाठी, आजारी पडण्यासाठी किंवा मरण्यासाठी बनवलं नव्हतं. (उत्पत्ति १:३१) पण, पहिला मानव आदाम यानं पाप केल्यामुळं सर्व मानवांमध्ये पाप आणि मरण आलं. यांतून आपली सुटका करण्यासाठी येशूनं स्वतःचं जीवन बलिदान केलं.मत्तय २०:२८; रोमकर ६:२३ वाचा.

देवानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर पाठवून आपल्याकरता त्याचं बलिदान दिलं; यावरून देवाचं मानवांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं! (१ योहान ४:९, १०) येशूनं त्याच्या मृत्यूचं स्मरण करण्यासाठी त्याच्या शिष्यांना एक साधा विधी पाळायला सांगितला होता; या विधीत त्यांना भाकरी आणि द्राक्षारस यांचा वापर करायचा होता. आपण दर वर्षी हा विधी पाळतो तेव्हा देवानं आणि येशूनं दाखवलेल्या प्रेमाची आपल्याला मनापासून कदर आहे हे दाखवून देतो.लूक २२:१९, २० वाचा.

भाकरी आणि द्राक्षारस यांचं सेवन कोण करू शकतं?

येशूनं शिष्यांना त्याच्या मृत्युदिनाचं स्मरण करण्यास सांगितलं तेव्हा त्यानं एका कराराचा उल्लेख केला. (मत्तय २६:२६-२८) या करारामुळं त्यांना आणि इतर काहींना येशूसोबत स्वर्गात राजे आणि याजक बनण्याची आशा मिळाली. आज लाखो लोक येशूच्या मृत्युदिनाचं स्मरण करत असले, तरी येशूनं उल्लेखिलेल्या करारात ज्यांचा समावेश होतो फक्त तेच लोक भाकरी आणि द्राक्षारस यांचं सेवन करतात.प्रकटीकरण ५:१० वाचा.

सुमारे २,००० वर्षांपासून यहोवा देव, येशूसोबत राज्य करणाऱ्यांची निवड करत आहे. (लूक १२:३२) यांची संख्या, पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांच्या तुलनेत कमी आहे.प्रकटीकरण ७:४, ९, १७ वाचा. (w15-E 03/01)