व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं देण्यास जमतं का ते पाहा:

ख्रिश्चनांनी येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली पाहिजे का?

नाही. कारण यहोवाला प्रार्थना करावी असं स्वतः येशूनं आपल्याला शिकवलं. तसंच, त्यानं स्वतःदेखील यहोवाला प्रार्थना केली. (मत्त. ६:६-९; योहा. ११:४१; १६:२३) शिवाय, येशूच्या पूर्वीच्या शिष्यांनीदेखील त्याला नव्हे तर देवाला प्रार्थना केली. (प्रे. कृत्ये ४:२४, ३०; कलस्सै. १:३)— ४/१, पृष्ठ १४.

येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीसाठी आपण दरवर्षी कोणती तयारी करू शकतो?

स्मारकविधीच्या काळात वाचण्यासाठी जी बायबल वचनं सुचवलेली असतात ती आपण दररोज आठवणीनं वाचू शकतो. तसंच, जास्त प्रमाणात सेवाकार्य करण्याची योजनादेखील करू शकतो. शिवाय, देवानं आपल्याला दिलेल्या आशेबद्दल प्रार्थनापूर्वक मनन करू शकतो.—१/१५, पृष्ठे १४-१६.

वडील इतरांना प्रशिक्षण कसं देऊ शकतात?

एखाद्या बांधवाला प्रशिक्षण देताना वडील त्यांना प्रेमळपणे आपले सहकारी या नात्यानं शिकवतात. आणि असं करताना त्यांच्या मनात कोणतीही असुरक्षिततेची भावना नसते. शिवाय, हे बांधव जणू मंडळीसाठी एक मौल्यवान भेट आहेत असं ते समजतात. (१ करिंथ. १:२४) तसंच, त्यांना या गोष्टीचीदेखील जाणीव असते की चांगल्या प्रशिक्षकाचं फक्त शिकवण्यावरच नव्हे, तर शिकणाऱ्या बांधवावरदेखील प्रेम असतं. (नीति. १७:१७; योहा. १५:१५)—४/१५, पृष्ठे ६-७.

जपानमधील बांधवांना कोणती खास भेट मिळाली?

जपानमधील बांधवांसाठी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमधील मत्तयच्या शुभवर्तमानाची उभ्या ओळींतील पुस्तिका छापण्यात आली. या पुस्तिकेचा उपयोग सेवाकार्यात केला जात आहे. आणि बायबलविषयी ज्यांना जास्त माहीत नाही असे अनेक जण ही पुस्तिका स्वीकारत आहेत.—२/१५, पृष्ठ ३.

पहिल्या शतकातील कोणत्या खास परिस्थितीमुळे सुवार्तेचा प्रचार सगळीकडे करणं शक्य झालं?

रोमन शांतीच्या काळात स्थिर वातावरण होतं. आणि, जवळपास सर्व भागांना जोडणारे अनेक रस्ते असल्यामुळे प्रवास करणं शिष्यांसाठी सोयीस्कर होतं. ग्रीक भाषा सर्वत्र बोलली जात असल्यामुळे प्रचारकार्यासाठी आणि दूरवर पसरलेल्या यहुदी लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी याचा उपयोग झाला. शिवाय, आपल्याला प्रचार करण्याचा हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी शिष्य रोमन कायद्याचा वापर करू शकत होते.—२/१५, पृष्ठे २०-२३.

यहोवाला आपल्याशी बोलण्याची संधी आपण कशी देऊ शकतो?

तुम्ही बायबल वाचता आणि त्याचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही जे वाचत आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याकडे लक्ष द्या. आणि शिकलेल्या गोष्टी कशा लागू करता येतील यावर विचार करा. असं केल्यानं तुम्ही यहोवाला तुमच्याशी बोलण्याची संधी देत असता. यामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी मजबूत होतो. (इब्री ४:१२; याको. १:२३-२५)—४/१५ पृष्ठ २०.

अलीकडील वर्षांमध्ये, बायबलमधील नमुने व प्रतिनमुने यांचा क्वचितच उल्लेख करण्यात आला आहे. असं का?

बायबल सांगतं की काही व्यक्ती भविष्यातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींना सूचित करतात. याचं एक उदाहरण गलतीकर ४:२१-३१ या वचनांत सापडतं. पण, म्हणून बायबलमधील प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना पुढं होणाऱ्या एखाद्या गोष्टीला सूचित करतात असा अर्थ लावणं योग्य ठरणार नाही. पण, बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या व्यक्तींकडून आणि घटनांमधून आपण अनेक चांगले धडे शिकू शकतो. (रोम. १५:४)—३/१५, पृष्ठे १७-१८.

अपश्‍चातापी व्यक्तीला बहिष्कृत करणं ही एक प्रेमळ तरतूद आहे असं का म्हणता येईल?

एखाद्याला बहिष्कृत करण्याच्या गंभीर निर्णयामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल बायबल स्पष्टपणे सांगतं. (१ करिंथ. ५:११-१३) यामुळे, देवाच्या नावाला सन्मान मिळतो, मंडळी शुद्ध राहते आणि चूक ­करणाऱ्याला भानावर येण्यास मदत होते.—४/१५, पृष्ठे २९-३०.