व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?

या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?

“कुसंगतीने नीती बिघडते.”—१ करिंथ. १५:३३.

गीत क्रमांक: २५, २०

१. आपण सध्या कोणत्या काळात जगत आहोत?

आपण शेवटल्या काळातील अतिशय कठीण दिवसांत जगत आहोत. १९१४ ला या ‘शेवटल्या काळाची’ सुरवात झाल्यापासून जगाची परिस्थिती आणखीनच ढासळत चालली आहे. (२ तीम. ३:१-५) शिवाय पुढे ही परिस्थिती याहूनही वाईट होत जाईल अशी खात्री आपण बाळगू शकतो. कारण “दुष्ट व भोंदू माणसे . . . दुष्टपणात अधिक सरसावतील,” असं बायबलची भविष्यवाणी आपल्याला सांगते.—२ तीम. ३:१३.

२. आज कोणत्या प्रकारच्या मनोरंजनाकडे लोकांचा जास्त कल आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बरेच लोक आज मनोरंजनासाठी अतिशय घातक आणि अनैतिक गोष्टी पाहताना किंवा करताना दिसतात. यात जादूटोणा आणि दुरात्मांशी निगडित गोष्टींचाही समावेश असतो. उदाहरणार्थ इंटरनेट, टिव्ही कार्यक्रम, चित्रपट, पुस्तकं आणि मासिकं यांमध्ये क्रूरता आणि अनैतिकता अगदी सर्वसामान्य गोष्ट असल्याचं भासवलं जातं. शिवाय ज्या गोष्टींना पूर्वी समाजात बिलकुल मान्यता नव्हती, त्या गोष्टीही आज काही भागांमध्ये सर्वसामान्य, इतकंच काय तर कायदेशीर बनल्या आहेत. पण म्हणून यहोवालाही या गोष्टी मान्य असतील असा याचा मुळीच अर्थ होत नाही.—रोमकर १:२८-३२ वाचा.

३. देवाच्या दर्जांनुसार चालणाऱ्यांबद्दल बऱ्याच लोकांना कसं वाटतं?

पहिल्या शतकातील लोकांनाही क्रूर आणि अनैतिक मनोरंजन पाहण्याची आवड होती. पण येशूचे अनुयायी तसे नव्हते. कारण ते देवाच्या दर्जांनुसार जीवन जगायचे. पण यावर त्यांच्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया काय होती? त्या काळच्या इतर लोकांना याविषयी “नवल” वाटलं. त्यांनी या सुरवातीच्या ख्रिश्चनांची थट्टा केली आणि त्यांचा छळही केला. (१ पेत्र ४:४) आजही, देवाच्या दर्जांनुसार चालणाऱ्या लोकांबद्दल बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं. खरंतर बायबलमध्येही येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करणाऱ्या “सर्वांचा छळ होईल” असा इशारा देण्यात आला आहे.—२ तीम. ३:१२.

“कुसंगतीने नीती बिघडते”

४. जगावर प्रेम करणं चुकीचं का आहे?

आपल्याला देवाच्या इच्छेनुसार जगायचं असेल तर “जगावर व जगातल्या गोष्टींवर” प्रेम करून चालणार नाही. (१ योहान २:१५, १६ वाचा.) कारण या जगाच्या देवाची, म्हणजेच सैतानाची या संपूर्ण जगावर सत्ता आहे. तो आज लोकांची दिशाभूल करण्यासाठी धर्मांचा, जागतिक सरकारांचा, व्यापारी संघटनांचा आणि प्रसारमाध्यमांचा वापर करत आहे. (२ करिंथ. ४:४; १ योहा. ५:१९) या जगाच्या प्रभावाखाली येण्याची आपली मुळीच इच्छा नाही, म्हणून या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. बायबल आपल्याला अगदी स्पष्टपणे ताकीद देते: “फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते.”—१ करिंथ. १५:३३.

५, ६. आपण कोणाची सोबत टाळतो, आणि का?

यहोवासोबतचं आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी वाईट गोष्टी आचरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची आपण संगत धरणार नाही. यामध्ये असेही लोक येतात जे यहोवाचे उपासक असल्याचं म्हणतात खरं, पण त्याच्या आज्ञांचं पालन करत नाहीत. अशांपैकी जर कोणी गंभीर चूक करूनही पश्‍चात्तापाची भावना दाखवत नसेल, तर त्याच्यासोबत आपण कोणताही संबंध ठेवणार नाही.—रोम. १६:१७, १८.

लोक सहसा आपल्या मित्र-मैत्रिणींना आवडेल अशाच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण जर देवाची आज्ञा न पाळणाऱ्या लोकांसोबत राहू, तर त्यांच्याप्रमाणेच वागण्याचा मोह आपल्याला होईल. उदाहरणार्थ, लैंगिक अनैतिकता आचरणाऱ्या लोकांसोबत आपण सहवास राखण्याचा प्रयत्न केला तर आपणही कदाचित त्यांच्याप्रमाणेच होऊ. आपल्या काही बांधवांच्या आणि बहिणींच्या बाबतीतही असं घडलं आहे आणि त्यांनी पश्‍चात्ताप न दाखवल्यामुळे त्यांना बहिष्कृत करण्यात आलं आहे. (१ करिंथ. ५:११-१३) शिवाय जर त्यांनी पश्‍चात्ताप दाखवला नाही, तर त्यांची दशा पेत्रानं वर्णन केल्याप्रमाणे होईल.—२ पेत्र २:२०-२२ वाचा.

७. आपण कोणाशी मैत्री केली पाहिजे?

प्रत्येकाशी मैत्रीनं राहावं असं आपल्याला मनापासून वाटतं, हे खरं आहे. पण देवाची आज्ञा मोडणाऱ्या लोकांसोबत मैत्री करणं नक्कीच योग्य नाही. त्यामुळे, जेव्हा काही कारणामुळे घरापासून दूर राहण्याची वेळ येते, तेव्हा एक अविवाहित साक्षीदार यहोवाला न मानणाऱ्या आणि त्याच्या दर्जांनुसार न जगणाऱ्या लोकांसोबत एकत्र राहण्याची निवड कधीच करणार नाही. तसंच, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही आणि जे यहोवाच्या तत्त्वांचं जीवनात पालन करत नाहीत अशा व्यक्तींशी लग्नाच्या उद्देशानं भेटीगाठी करणंही चुकीचं ठरेल. शेवटी यहोवाला न मानणाऱ्या लोकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, यहोवाच्या पसंतीस उतरणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आपण केवळ अशा लोकांशीच मैत्री केली पाहिजे जे यहोवाच्या उद्देशानुसार जगतात. येशूनंही म्हटलं, “जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई” आहे.—मार्क ३:३५.

८. वाईट संगतीचा इस्राएली लोकांवर काय परिणाम झाला?

वाईट संगतीचा परिणाम नेहमी घातकच असतो. इस्राएली लोकांचंच उदाहरण घ्या. वचन दिलेल्या देशात पोचण्याआधीच, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांविषयी यहोवानं त्यांना ताकीद दिली होती. त्यानं म्हटलं होतं: “त्यांच्या देवांना तू नमन करू नये, त्यांची सेवा करू नये, आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नये, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावे आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडे तुकडे करावे. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी.” (निर्ग. २३:२४, २५) पण बहुतेक इस्राएलांनी देवानं दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते यहोवाला विश्वासू राहिले नाहीत. (स्तो. १०६:३५-३९) याचा काय परिणाम झाला? यहोवानं नंतर इस्राएल राष्ट्राचा त्याग केला आणि ख्रिस्ती मंडळीला आपले लोक म्हणून निवडलं.—मत्त. २३:३८; प्रे. कृत्ये २:१-४.

तुम्ही काय वाचता आणि काय पाहता याविषयी जपून राहा

९. आजची प्रसारमाध्यमं धोकादायक आहेत, असं आपण का म्हणू शकतो?

टिव्ही कार्यक्रम, वेबसाईट्स आणि पुस्तकांसारख्या जगातील प्रसारमाध्यमांमुळे यहोवासोबतचं आपलं नातं धोक्यात येऊ शकतं. यहोवावर आणि त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्यासाठी एका ख्रिस्ती व्यक्तीला मदत होईल अशा हेतूनं या गोष्टींना बनवण्यात आलेलं नाही. उलट, सैतानाच्या या दुष्ट जगावर भरवसा ठेवण्यास या गोष्टी आपल्याला बढावा देतात. त्यामुळे आपल्यात ‘ऐहिक वासना’ निर्माण होतील अशा कोणत्याही गोष्टी पाहण्याचं, वाचण्याचं किंवा ऐकण्याचं आपण टाळलं पाहिजे.—तीत २:१२, १३.

१०. या जगातील प्रसारमाध्यमांचं काय होईल?

१० लवकरच सैतानाचं हे जग आणि त्यातील धोकादायक प्रसारमाध्यमांचा नाश केला जाईल. बायबल म्हणतं: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहा. २:१७) स्तोत्रकर्त्यानंही म्हटलं, “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल” आणि “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” पण किती काळासाठी? त्यानं पुढं म्हटलं, “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तो. ३७:९, ११, २९.

११. आज यहोवा आपल्या लोकांना आध्यात्मिक अन्न कसं पुरवत आहे?

११ सैतानाच्या जगाच्या अगदी उलट, यहोवाची संघटना आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करता येईल अशा प्रकारे जगण्यासाठी मदत करत आहे. येशूनं यहोवाला अशी प्रार्थना केली: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहा. १७:३) आज यहोवा, त्याची ओळख आपल्याला व्हावी म्हणून आवश्यक त्या सर्व गोष्टी, त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला पुरवत आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे मासिकं, माहितीपत्रकं, पुस्तकं आणि व्हिडिओ तर आहेतच शिवाय वेबसाईटवरही पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. या सर्व गोष्टींमुळे यहोवाची सेवा करत राहण्यासाठी आपल्याला मदत होते. तसंच त्याच्या संघटनेनं आज जगभरातील १,१०,००० हून जास्त मंडळ्यांमध्ये सभांची योजना केली आहे. या सभांमध्ये आणि मोठ्या संमेलनांमध्ये आपल्याला बायबलमधून जे काही शिकायला मिळतं, त्यामुळे यहोवावरील आणि त्याच्या अभिवचनावरील आपला विश्वास आणखी मजबूत होतो.—इब्री १०:२४, २५.

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करा

१२. ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा’ अशी आज्ञा बायबल आपल्याला का देते?

१२ ख्रिश्चनांनी आपला विवाह सोबती निवडण्याच्या बाबतीत खूप सावध असलं पाहिजे. देवाचं वचन आपल्याला अशी ताकीद देतं: “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?” (२ करिंथ. ६:१४) बायबल देवाच्या सेवकांना ‘केवळ प्रभूमध्ये लग्न’ करण्यास सांगतं. म्हणजे, ज्या व्यक्तीनं समर्पण करून बाप्तिस्मा घेतला आहे आणि जी यहोवाच्या दर्जांनुसार जगत आहे, केवळ अशा व्यक्तीसोबतच लग्न करण्यास बायबल सांगतं. (१ करिंथ. ७:३९) तुम्ही जर असा जोडीदार निवडला ज्याचं यहोवावर प्रेम आहे, तर तो तुम्हालाही यहोवाला विश्वासू राहण्यास मदत करेल.

१३. देवानं इस्राएलांना कोणती आज्ञा दिली होती?

१३ आपल्यासाठी सर्वात चांगलं काय, हे यहोवाला माहीत आहे. शिवाय “केवळ प्रभूमध्ये लग्न” करा या आज्ञेविषयी तो वारंवार आपल्याला आठवण करून देत आला आहे. उदाहरणार्थ, यहोवाचे उपासक नसलेल्या लोकांविषयी त्यानं इस्राएलांना जे सांगितलं, त्याचा विचार करा. यहोवानं मोशेद्वारे त्यांना अशी आज्ञा दिली: “त्यांच्याशी सोयरीक करू नको; आपली मुलगी त्यांच्या मुलाला देऊ नको व त्यांची मुलगी आपल्या मुलाला करू नको; कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावतील; त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करेल.”—अनु. ७:३, ४.

१४, १५. यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे, शलमोनाच्या बाबतीत काय घडलं?

१४ इस्राएलचा राजा बनल्यानंतर शलमोनानं यहोवाला बुद्धीसाठी प्रार्थना केली, आणि यहोवानंही त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला दिलं. त्यामुळे शलमोनाला समृद्ध राज्याचा एक बुद्धिमान राजा म्हणून प्रसिद्धी मिळाली. खरंतर, शबाची राणीसुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेमुळे इतकी प्रभावित झाली की तिनं त्याला असं म्हटलं: “आपले शहाणपण व समृद्धी यांची कीर्ती झाली आहे तीहून ती अधिक आहेत.” (१ राजे १०:७) पण देवाच्या आज्ञेकडे डोळेझाक करून यहोवाची उपासना न करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा काय परिणाम होतो, हेदेखील शलमोनाच्या उदाहरणातून आपल्याला स्पष्ट होतं.—उप. ४:१३.

१५ यहोवानं शलमोनाला आशीर्वादित केलं होतं, पण तरीही त्यानं यहोवाची आज्ञा मोडली. तो यहोवाला न मानणाऱ्या अनेक “विदेशी स्त्रियांच्या नादी लागला” आणि त्यानं ७०० राण्या व ३०० उपपत्नी केल्या. याचा काय परिणाम झाला? जेव्हा तो म्हातारा झाला, “तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले” आणि “परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले.” (१ राजे ११:१-६) चुकीच्या संगतीचा शलमोनावर परिणाम झाला आणि तो यहोवाला विश्वासू राहिला नाही. हे जर शलमोनाच्या बाबतीत होऊ शकतं, तर मग कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणूनच यहोवावर प्रेम नसणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची कल्पनादेखील आपण करू नये.

१६. ज्यांचे जोडीदार सत्यात नाहीत, त्यांना बायबल कोणता सल्ला देते?

१६ पण समजा जोडीदारापैकी केवळ एकानंच सत्य स्वीकारलं असेल तर काय? अशांना बायबल असा सल्ला देते: “स्त्रियांनो, तुम्हीही आपआपल्या पतीच्या अधीन असा; यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २) हा सल्ला अशा पतीलाही लागू होतो, ज्याची पत्नी सत्यात नाही. एका चांगल्या पतीच्या किंवा पत्नीच्या नात्यानं, आपण विवाहाविषयी असणाऱ्या देवाच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं बायबल अगदी स्पष्टपणे सांगतं. जेव्हा तुमच्यात झालेले चांगले बदल तुमच्या जोडीदाराच्या लक्षात येतील, तेव्हा तोही कदाचित यहोवाची सेवा करण्यास प्रवृत्त होईल. असं कित्येक विवाहित जोडप्यांच्या बाबतीत झाल्याचं दिसून आलं आहे.

यहोवावर प्रेम करणाऱ्यांशी संगत करा

१७, १८. नोहा आणि पहिल्या शतकातील देवाच्या सेवकांचा कशामुळे बचाव झाला?

१७ वाईट संगतीमुळे कदाचित यहोवाची आज्ञा मोडण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल. पण योग्य संगत निवडली तर यहोवाला विश्वासू राहण्यास तुम्हाला मदत होईल. याबाबतीत नोहाचं चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. तो अशा काळात जगत होता जेव्हा “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार” वाढली होती आणि “त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट” होत्या. (उत्प. ६:५) लोक इतक्या खालच्या थराला गेले होते की देवानं त्या दुष्ट जगाचा नाश करण्याचं ठरवलं. पण त्या सर्वांमध्ये नोहा मात्र अगदी वेगळा होता. तो “नीतिमान व सात्विक मनुष्य” होता आणि तो “देवाबरोबर चालला” असं बायबल म्हणतं.—उत्प. ६:७-९.

१८ यहोवावर प्रेम न करणाऱ्या लोकांशी नोहानं कुठलाही संबंध ठेवला नाही. तो आणि त्याचं कुटुंब तारू बांधण्यात व्यस्त होतं. शिवाय तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” होता. (२ पेत्र २:५) नोहा, त्याची पत्नी, त्याची तीन मुलं आणि त्याच्या सुना यांचा एकमेकांशी अगदी जवळचा नातेसंबंध होता. यहोवाला पसंत असलेल्या गोष्टी ते करत राहिले. याचा परिणाम म्हणजे, जलप्रलयातून ते जिवंत बचावले. आज आपण सर्व त्यांचे वंशज आहोत आणि त्यांच्यामुळेच अस्तित्वात आहोत. त्यामुळे नोहा आणि त्याच्या कुटुंबानं वाईट लोकांशी संगत न करता यहोवाची आज्ञा मानली, याबद्दल आपण त्यांचे किती कृतज्ञ असलं पाहिजे! त्यांच्याप्रमाणेच पहिल्या शतकातील देवाचे सेवकसुद्धा यहोवाला न मानणाऱ्या लोकांपासून दूर राहिले. इ.स. ७० ला जेरुसलेमचा नाश झाला तेव्हा यहोवाची आज्ञा पाळल्यामुळे त्यांचा बचाव झाला.—लूक २१:२०-२२.

यहोवावर प्रेम असणाऱ्यांसोबत मैत्री केल्यानं, नवीन जगातील जीवनाची झलक पाहायला मिळते (परिच्छेद १९ पाहा)

१९. यहोवाला विश्वासू राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१९ नोहा, त्याचं कुटुंब आणि पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणेच आपणही यहोवावर प्रेम नसणाऱ्या लोकांची संगत टाळली पाहिजे. याउलट, आपल्याला ज्या लाखो विश्वासू बंधुभगिनींची साथ आहे, त्यांच्याशी आपण मैत्री करू शकतो. या कठीण काळात “विश्वासात स्थिर” राहण्यासाठी आपल्याला त्यांच्यामुळे मदत होते. (१ करिंथ. १६:१३; नीति. १३:२०) विचार करा, या दुष्ट जगाच्या नाशातून बचावून यहोवाच्या नवीन जगात प्रवेश करणं किती रोमांचक असेल! तेव्हा, वाईट संगतीपासून दूर राहणं खरंच किती महत्त्वाचं आहे!