व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का?

लोक प्रार्थना का करतात?

लोक प्रार्थना का करतात?

“मी एक पक्का जुगारी होतो. जिंकण्यासाठी प्रार्थना करायचो. पण मी कधी जिंकलो नाही.”—सॅम्यूएल, * केनिया.

“शाळेत आम्ही तोंडपाठ केलेल्या प्रार्थनाच म्हणायचो.”—टेरेसा, फिलिपीन्झ.

“समस्या येतात तेव्हा मी प्रार्थना करते. पापांची क्षमा मिळण्यासाठी आणि एक चांगली ख्रिस्ती व्यक्ती बनण्यासाठी मी प्रार्थना करते.”—मॅग्डालीन, घाना.

सॅम्यूएल, टेरेसा आणि मॅग्डालीन यांच्या शब्दांवरून आपल्याला कळतं, की लोक निरनिराळ्या कारणांसाठी प्रार्थना करतात. काही आपला स्वार्थ साधण्यासाठी तर काही देवावर खरोखर प्रेम असल्यामुळं. काही मनापासून प्रार्थना करतात तर काहींची प्रार्थना वरवर असते. कुणी शाळेतल्या परीक्षांमध्ये पास व्हावं म्हणून प्रार्थना करत असो की त्यांच्या आवडत्या खेळाडूंच्या टीमनं जिंकावं म्हणून, कौटुंबिक जीवनासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून प्रार्थना करत असो की इतर कोणत्याही कारणासाठी असो, कोट्यवधी लोकांना प्रार्थना करण्याची गरज भासते हे मात्र पक्कं. सव्र्हेंनुसार तर हेही दिसून आलं आहे, की धार्मिक प्रवृत्ती नसलेले काही लोकसुद्धा नियमितपणे प्रार्थना करतात.

तुम्ही करता का प्रार्थना? जर करत असाल तर कशासाठी करता? तुम्ही प्रार्थना करत असला किंवा नसला तरी तुमच्या मनात नक्कीच असे प्रश्न येत असतील: ‘प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का? कुणी प्रार्थना ऐकत असेल का?’ एका लेखकाच्या मते प्रार्थना ही केवळ “एक उपचार पद्धती आहे.” जसं एखाद्याकडं तुम्ही आपलं मन मोकळं केल्यावर बरं वाटतं तसंच प्रार्थना केल्यानंही वाटतं. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी तर प्रार्थनेला “पर्यायी उपचार पद्धती” म्हटलं आहे. मग लोकांचं नियमितपणे प्रार्थना करणं व्यर्थ आहे का? किंवा त्यांना फक्त मन मोकळं केल्यामुळं बरं वाटतं?

बायबलमधील माहितीनुसार प्रार्थना करणं ही फक्त मन मोकळं करण्याची एक उपचार पद्धती नाही तर देवाबरोबर एक चांगला नातेसंबंध जोडण्याचा मार्ग आहे. योग्य पद्धतीनं आणि योग्य गोष्टींसाठी केलेल्या प्रार्थना तो खरोखर ऐकतो. पण हे कशावरून? चला आपण पुरावे पाहूया. (w15-E 10/01)

^ परि. 3 काही नावं बदलण्यात आली आहेत.