व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो

जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो

“रडून . . . काय . . . होणार . . . आहे . . . बाळा देव जे करतो ते भल्यासाठीच करतो.”

बेबे नावाच्या स्त्रीच्या वडिलांचा अंत्यविधी सुरू होता, त्या वेळी हे शब्द तिच्या जवळच्या व्यक्तीने तिला हळूवारपणे बोलले. तिच्या वडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता.

हे शब्द जरी कुटुंबाच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे असले तरी या शब्दांनी तिला सांत्वन मिळण्याऐवजी ते शब्द तिला टोचू लागले. कारण बेबेचे आपल्या वडिलांवर फार प्रेम होते. ती सारखी स्वतःशी बोलत राहायची “त्यांच्या मृत्यूनं काय भलं झालं? काहीच नाही.” काही वर्षांनंतर बेबेने एक पुस्तक लिहिलं, त्यात सुद्धा तिने आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे तिला झालेल्या दु:खाचा उल्लेख केला. या वरून स्पष्ट होतं की ती अजूनही ते दुःख विसरली नव्हती.

बेबेला आपल्या अनुभवातून कळलं की, आपल्या प्रिय जनांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायला खूप वेळ लागू शकतो. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळची असते तेव्हा तर ते आणखीच कठीण जाऊ शकतं. बायबलमध्ये जेव्हा मृत्यूला “शेवटला शत्रू” असं म्हटलं जातं, ते योग्यच आहे. (१ करिंथकर १५:२६) कारण जेव्हा अचानक आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा एखाद्या वादळात व्हावं, तसं आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. मृत्यू आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्यापासून दूर घेऊन जातो. आपल्या प्रिय जनांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या भावनांच्या आघातापासून कुणीच सुटू शकत नाही. अशा वेळी जर या दुःखामुळे, आपण स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही तर त्यात काहीच नवल नाही.

तुम्ही कदाचित विचार कराल: ‘या दुःखातून सावरायला किती वेळ लागतो? या दुःखातून एक व्यक्ती कशी सावरू करू शकते? जे अशा दुःखात आहेत त्यांना मी कसं सांत्वन देऊ शकतो? आपल्या ज्या प्रिय जनांना आपण मृत्यूमुळे गमावलं आहे, त्यांच्यासाठी काही आशा आहे का?’ (wp16-E No. 3)