व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धोक्याच्या पूर्व इशाऱ्याकडे लक्ष दिल्यानं तुमचा जीव वाचू शकतो!

धोक्याच्या पूर्व इशाऱ्याकडे लक्ष दिल्यानं तुमचा जीव वाचू शकतो!

इंडोनेशिया देशातील, सुमात्रा बेटाच्या उत्तर-पश्‍चिमेकडे असलेल्या सिमलू नावाच्या बेटाला, २६ डिसेंबर २००४ रोजी ९.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. किनाऱ्यावर असलेले सर्व जण समुद्राकडे पाहू लागले. समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा जास्त मागं हटत चाललं होतं. हे लक्षात येताच सगळे त्यांच्या भाषेत “स्मोंग! स्मोंग!” म्हणजे ‘त्सुनामी, त्सुनामी’ असं ओरडत डोंगराच्या दिशेने पळू लागले. त्यानंतर जवळजवळ ३० मिनिटांच्या आतच समुद्रानं रौद्र रूप धारण केलं, आणि त्याच्या विशाल लाटा पुन्हा किनाऱ्याकडे जोरानं आल्या. शेवटी त्याच्या मार्गातील जवळपास सर्व घरांना आणि गावांना त्यानं उद्ध्वस्त केलं.

या त्सुनामीचा तडाखा बसलेल्या भागांपैकी सिमलू हे बेट सर्वात पहिलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या बेटावरील ७८,००० रहिवाशांपैकी फक्त ७ जण मृत्यूमुखी पडले. इतर भागांच्या तुलनेत इथं इतक्या कमी प्रमाणात जीवितहानी का झाली? * या बेटावर एक म्हण प्रचलित आहे, ‘जर जोराचा हादरा बसला आणि समुद्र मागे हटला, तर लगेच डोंगराकडे पळ काढा. कारण समुद्राच्या लाटा पुन्हा वेगाने किनाऱ्याकडे येतील.’ समुद्रात होणाऱ्या बदलांवरून, येणाऱ्या त्सुनामीच्या धोक्याबद्दल सिमलूतील लोक त्यांच्या भूतकाळातील अनुभवांवरून शिकले आहेत. खरंतर धोक्याच्या या आगाऊ सूचनेकडे लक्ष दिल्याने त्यांचे प्राण वाचले.

बायबलदेखील येणाऱ्या एका विनाशाबद्दल सांगतं, ते म्हणतं, “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट . . . येईल.” (मत्तय २४:२१) पण या ‘संकटात’ काही बेजबाबदार माणसांमुळे किंवा भयंकर नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा नाश होणार नाही. कारण पृथ्वी कायम टिकून राहावी अशी देवाची इच्छा आहे. (उपदेशक १:४) याउलट, या मोठ्या संकटात “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” देव करेल. यामुळे पृथ्वीवरील सर्व दुष्टाईचा आणि दुःखांचा अंत होईल. (प्रकटीकरण ११:१८; नीतिसूत्रे २:२२) खरंच हा मोठा आशीर्वादच असेल!

तसंच त्सुनामी, भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक यांमुळे निरपराध लोकांचा बळी जातो. पण येणाऱ्या ‘मोठ्या संकटामुळे’ कोणत्याही निरपराध व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागणार नाही. कारण “देव प्रीती आहे,” असं बायबल म्हणतं. बायबलच्या मूळ लिखाणांत या देवाचं नावं ‘यहोवा’ असं दिलं आहे. त्याने असं अभिवचन दिलं आहे की, “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.” (१ योहान ४:८; स्तोत्र ३७:२९) मग येणाऱ्या या ‘मोठ्या संकटापासून’ तुम्ही कसं बचावू शकता, आणि देवाने दिलेल्या अभिवचनाचा आनंद कसा घेऊ शकता? याची गुरुकिल्ली म्हणजे: येणाऱ्या धोक्याच्या पूर्व इशाऱ्याकडे लक्ष देणे.

जगाच्या बदलत्या चित्राकडे लक्ष द्या

जगातील सर्व दुष्टाईचा आणि दुःखांचा अंत नेमका केव्हा आणि कोणत्या दिवशी होईल, हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. कारण येशूने म्हटलं, “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाही नाही.” पण येशूने आपल्याला एका गोष्टीचा आर्जव मात्र केला. तो म्हणाला “जागृत राहा.” (मत्तय २४:३६; २५:१३) येशू असं का म्हणाला? ‘मोठे संकट’ येण्यापूर्वी जगात कोणकोणत्या घटना घडतील, याबद्दल बायबल आपल्याला सविस्तर रीत्या सांगतं. समुद्रात झालेल्या अचानक बदलांमुळे सिमलू बेटावरील लोकांना येणाऱ्या त्सुनामीबद्दल समजलं, त्याच प्रकारे जागतिक पातळीवर होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे ‘शेवट’ जवळ आहे, हे आपल्याला समजतं. बायबलमध्ये सांगितलेल्या शेवटच्या काळातील काही चिन्हं या लेखातील चौकटीत दिली आहेत.

हे कबूल आहे की, वरील चौकटीत दिलेल्या काही घटना भूतकाळातदेखील घडल्या होत्या. पण येशू ख्रिस्त म्हणाला, जेव्हा तुम्ही एकसाथ “ह्या सर्व गोष्टी पाहाल” तेव्हा अंत जवळ आहे असं समजा. (मत्तय २४:३३) तुम्ही स्वतःला विचारा, ‘इतिहासात या सर्व गोष्टी (१) जागतिक पातळीवर, (२) एकसाथ, (३) आणि, शिगेला केव्हा पोहोचल्या?’ स्पष्टच आहे, आत्ताच! आपण त्याच काळात जगत आहोत.

देवाच्या प्रेमाचा पुरावा

अमेरिकेच्या एका माजी राष्ट्रपतींनी असं म्हटलं होतं, “धोक्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा . . . जीव वाचवते.” २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीनंतर तिथं धोक्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा बसवली गेली. या मागे हेतू हा, की भविष्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये. त्याचप्रमाणे देवानेदेखील येणाऱ्या मोठ्या संकटापासून बचावण्यासाठी पूर्व सूचना देण्याची व्यवस्था केली आहे. बायबल म्हणतं: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

मागील अवघ्या एका वर्षात, यहोवाच्या साक्षीदारांनी २४० देशांमध्ये जवळजवळ ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रचार केला आहे. यासाठी त्यांनी १ अब्ज ९० कोटी पेक्षा जास्त तास प्रचारात खर्च केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेलं प्रचाराचं काम या गोष्टीचा पुरावा आहे की, या जगाचा ‘शेवट’ जवळ आला आहे. इतरांना देवाचा तो न्यायाचा दिवस लवकर येत असल्याची सूचना सांगण्यासाठी यहोवाचे साक्षीदार एकही संधी गमावत नाहीत. कारण त्यांचं लोकांवर प्रेम आहे. (मत्तय २२:३९) या माहितीमुळे तुम्हाला येणाऱ्या संकटापासून बचाव करता येईल, हा यहोवा देवाचा तुमच्यावर प्रेम असल्याचा पुरावा नाही का? “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) मग देवाच्या या प्रेमळ सूचनेकडे तुम्ही लक्ष देऊन त्यानुसार पाऊल उचलाल का?

सुरक्षित ठिकाणाकडे पळ काढा!

भूकंपाचा हादरा बसल्यानंतर, सिमलू बेटावरील लोकांनी समुद्राचं पाणी जेव्हा मागे जाताना पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेचच सुरक्षेसाठी डोंगराकडे पळ काढला. समुद्राचं पाणी पुन्हा किनाऱ्याकडे येण्याची ते वाट पाहात बसले नाहीत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचा जीव वाचला. लवकरच या जगावर येणाऱ्या ‘मोठ्या संकटापासून’ बचावण्यासाठी, उशीर न करता तुम्हालादेखील एका अर्थी उंच ठिकाणी सुरक्षेसाठी पळून जाण्याची गरज आहे. म्हणजे नेमकं काय करण्याची गरज आहे? यशया संदेष्ट्याने असं आमंत्रण दिलं: “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर . . . जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (यशया २:२, ३) हे आमंत्रण “शेवटल्या” काळातील लोकांसाठी आहे म्हणजेच आपल्यासाठी आहे.

उंच डोंगरावर गेल्याने तुम्हाला येणाऱ्या धोक्यांकडे लक्ष देणं शक्य होतं आणि तुम्ही सुरक्षित राहता. त्याचप्रमाणे आज जगभरातील लाखो लोकांनी, बायबलचा अभ्यास केल्यामुळे स्वतःच्या जीवनात चांगले बदल केले आहेत. (२ तीमथ्य ३:१६, १७) एका अर्थानं ते “[देवाच्या] पथांनी चालू” लागले आहेत आणि त्याची स्वीकृती मिळवून, त्याच्याकडून मिळणाऱ्या सुरक्षेचा आनंदही घेत आहेत.

या आमंत्रणाचा तुम्हीही स्वीकार कराल का, आणि या शेवटल्या काळात सुरक्षेसाठी देवाच्या प्रेमळ तरतुदीचा फायदा करून घ्याल का? या लेखामध्ये दिलेल्या चौकटीतील “शेवटल्या काळी” घडणाऱ्या चिन्हांचं तुम्ही परीक्षण करावं, असा आम्ही तुम्हाला आर्जव करतो. (२ तीमथ्य ३:१) याबाबतीत दिलेली शास्त्रवचने समजण्यासाठी व ती लागू करण्यासाठी, तुमच्या परिसरातील यहोवाचे साक्षीदार तुम्हाला हवी असलेली मदत करतील. किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी www.pr418.com/mr ही वेबसाईट पाहा. ▪ (w16-E No.2)

^ परि. 3 २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे सुमारे २,२०,००० लोक मृत्यूमुखी पडले. आजवर माहीत असलेल्या त्सुनामींमध्ये ही सर्वात विनाशकारी त्सुनामी होती.