व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचा विश्वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?

तुमचा विश्वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?

तु म्ही एक ख्रिस्ती आहात का? तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर तुम्ही पूर्ण जगभरात असणाऱ्या २०० कोटीपेक्षा जास्त लोकांमधून एक आहात. आज स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे हजारो पंथ आहेत. पण त्यांच्या शिकवणी आणि त्यांची मतं मात्र वेगवेगळी आहेत. त्यामुळे तुमचा विश्वासदेखील कदाचित इतर ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्यांपेक्षा वेगळा असू शकतो. पण तुमचा विश्वास काय आहे, याबद्दल एवढा विचार करायला हवा का? हो, कारण तुमची ओळख असे ख्रिस्ती म्हणून असायला हवी ज्यांचा विश्वास बायबलवर आधारित आहे.

पहिल्या शतकातील येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना “ख्रिस्ती” म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. (प्रेषितांची कृत्ये ११:२६) त्यांना दुसऱ्या कुठल्या नावाची गरज नव्हती कारण त्या वेळी फक्त एकच ख्रिस्ती विश्वास होता. सर्व ख्रिस्ती लोक एकजुटीने ख्रिस्ती विश्वासाची स्थापना करणाऱ्या येशूच्या शिकवणींचं आणि मार्गदर्शनाचं पालन करायचे. तुमच्या चर्चमध्येसुद्धा असंच केलं जातं का? येशूने जे शिकवलं आणि पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांचा ज्या गोष्टींवर विश्वास होता, तुम्हीसुद्धा त्याच गोष्टींवर विश्वास करता का? तुमचाही तोच विश्वास आहे, याची तुम्ही खात्री कशी करून घेऊ शकता? याचा एकच योग्य मार्ग म्हणजे आपला विश्वास बायबलमधून पडताळून पाहणं.

यावर विचार करा: शास्त्रवचनं देवाकडून प्रेरित असल्यामुळे येशू ख्रिस्ताला त्यांच्याविषयी गाढ आदर होता. माणसांनी बनवलेल्या परंपरांना जास्त महत्त्व देऊन, बायबलमधल्या शिकवणींना हलकं मानणारे लोक येशूला पसंत नव्हते. (मार्क ७:९-१३) म्हणूनच येशूच्या खऱ्या शिष्यांचा विश्वास बायबलवर आधारित असायला हवा. यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारायला हवा, ‘माझ्या चर्चमध्ये जे शिकवलं जातं ते बायबलवर आधारित आहे का?’ या प्रश्‍नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपण आपल्या चर्चच्या शिकवणींना बायबलमधून पडताळून पाहायला नको का?

आपण देवाची करत असलेली उपासना बायबल सत्यावर आधारित असली पाहिजे असं येशूने म्हटलं. (योहान ४:२४; १७:१७) तसंच, सत्याचं “परिपूर्ण [अचूक]” ज्ञान मिळवलं तरच आपलं तारण होईल, असं प्रेषित पौलाने म्हटलं. (१ तीमथ्य २:४) त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपला विश्वास अचूक बायबल सत्यावर आधारित असला पाहिजे. कारण आपलं तारण सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे.

आपण आपला विश्वास बायबलमधून कसा पडताळून पाहू शकतो?

खाली दिलेले सहा प्रश्न वाचा आणि बायबलमध्ये त्यांची काय उत्तरं दिली आहेत तेसुद्धा पाहा. दिलेली वचनं बायबलमधून पाहा आणि त्यात दिलेल्या उत्तरांवर विचार करा. मग स्वतःला विचारा, ‘माझ्या चर्चच्या शिकवणी बायबलमध्ये जे लिहिलं आहे त्याप्रमाणे आहेत का?’

हे सहा प्रश्न तुम्हाला सर्वात महत्त्वाची तुलना करण्यास मदत करतील. तुमच्या चर्चमधील इतर शिकवणींसुद्धा तुम्ही बायबलमधून पडताळून बघायला तयार आहात का? तुम्हाला बायबलमधील सत्याचं परीक्षण करण्यास मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होईल. तुम्ही एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराला तुमच्यासोबत मोफत बायबल अभ्यास करायला सांगू शकता किंवा jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. (wp16-E No. 4)